सरणावरील सुमने Submitted by हिमांशु on 16 December, 2012 - 14:22 सरणावरील सुमने सरणावरील सुमने सुकतात ना कधीही - अग्नीफुले तयांची होतात अर्थवाही: ज्वाळादळी तयांच्या मकरंद जीवनाचा, वसतो तिथेच आत्मा - राखेस रंग त्याचा! जे जे मिळे प्रपंची, त्याचाच धूर होई... शोधा धुरात आत्मा, राखेत सर्वकाही! विषय: काव्यलेखनसाहित्यशब्दखुणा: कविताहिमांशु