साहित्य

चांदोबाही हसतो....

Submitted by पुरंदरे शशांक on 29 October, 2012 - 07:20

चांदोबाही हसतो....

काळा काळा पिंजलेला कापूस गेला
गोरा गोरा चांदोबा आकाशात आला

गोरा गोरा चांदोबा बघ्तो डोकावून
जागतंय कोण कोण चांदण्यात बसून

आटीव दुधाची आज आहे मज्जा
खेळ गाणी खूप खूप जोडीला गप्पा

दूध पिऊन सोनूच्या ओठावर मिशी
चांदोबाही हसतो वर फिशीफिशी....

'दरजा'

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

पुर्वप्रसिद्धी- 'माहेर' दिवाळी अंक २०११.
इथे माझ्या ब्लॉगवर (रंगीबेरंगीवर) पुन्हा प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेरच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख यांचे आभार.

***
***

प्रकार: 
शब्दखुणा: 

चांदोमामा चांदोमामा....

Submitted by पुरंदरे शशांक on 28 October, 2012 - 23:14

चांदोमामा चांदोमामा....

लपाछपी गमतीची
खेळतो कसा
चांदोबा ढगाआडून
बघतो कसा

गोल गोल पुरीसारखा
दिस्तो कसा
हळुहळु करंजी
होतो तू कसा

कोरीतून पुन्हा तू
हस्तो कसा
चांदोबा आमचा हा
मामा न्हेमीचा

ससा हरिण मांडीवर
घेतो कसा
आवडतो मला हा
मामा गोरासा .....

स्वातंत्र्यवीर सावरकर-लिखित शिवरायांवरील पोवाडा

Submitted by मी-भास्कर on 28 October, 2012 - 04:26

एक पिल्लू माऊचं

Submitted by पुरंदरे शशांक on 22 October, 2012 - 00:32

Image1085.jpg

एक पिल्लू माऊचं
काळ्या-पांढर्‍या ठिपक्याचं

बसलं बागेत केव्हाचं
उन खात सकाळचं

फुलपाखरु भिर्भिरताना
कित्ती माना वळवायचं

आळसानं भरभरून
तिथेच पडून रहायचं

वास येताच दुधाचा
घरात पळत जायचं

दूध लप्लप पिताना
डोळे मिटून घ्यायचं

मग मात्र अंग सारे
चाटून साफ करायचं

अस्सं पिल्लू माऊचं
आमच्याच घरी असायचं...

शत जन्म शोधिताना.. अर्थ आणि रसग्रहण

Submitted by श्रीयू on 19 October, 2012 - 16:23

शत जन्म शोधिताना.. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर काव्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा सुरु केला आहे. मायबोली वरील मान्यवरांनी कृपया या कवितेचा अर्थ,संदर्भ,रसग्रहण इथे लिहावे. शिवाय या कवितेवरील माहिती, इतर संदर्भ, मान्यवर कवी/लेखकांनी केलेले रसग्रहण इथे टाकल्यास स्वागतच..

शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||

कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर

विषय: 

गन

Submitted by बाबूराव on 19 October, 2012 - 03:58

तो घोद्यावरून येत होता. त्याच्या चेहर्यावर कस्लेच भाव नव्हते. दोक्यावर्च्या तोपीमुले त्याचा दाधीचे खुटं वाधलेला चेहरा नीट दिसत नवता. त्यात त्याने मान खालि घातलि होति. त्याचं घोदं पन जीव गेल्यासारकं खुरडत हलुहलु चाल्लं होतं. गावात नविन दिसत होता. याचं काहि खरं नाहि असं बगना-याला वातत होतं. घोदं सन्थ गतीनं शान ए मायबोलिच्या समोर येउन थाम्बलं तेवा गल्ल्यावर्च्या गोरतेल्या मानसाने फक्त एकदा पाहुन न पहिल्यासार्खं केलं. आलेल्या स्वारानं घोद्याला ताच मार्लि तेवा आतुण एक पहिलवान आला. त्यच्या हातात स्तेनगन होति. खान्द्याल मॅगेझिन अदकवलेलं होत.

विषय: 

अळीची चळवळ

Submitted by पुरंदरे शशांक on 18 October, 2012 - 23:17

7750331-cartoon-illustration-of-a-happy-green-caterpillar.jpg

अळीची चळवळ

वळवळ वळवळ
अळीची चळवळ
किती ती धावपळ
करे ना खळखळ

चालते कस्ली
खालीवर खालीवर
लाटच जशी
फिरते अंगभर

हिर्वी हिर्वी चादर
पांघरते अंगावर
कधी कधी रंगीत
ठिपके त्यावर

उचलून डोके
बघते कायतर
शेंगा पान फुले
खाऊ तो कुठवर

मटार सोलता
सोनूची धावपळ
कथ्थक डिस्को
नुस्ती तारांबळ...

शब्दखुणा: 

थंडी किती झोंबायची

Submitted by वैवकु on 18 October, 2012 - 11:26

मी किती सांगायचो पण ती कुठे ऐकायची
जायची सोडून...मागे आठवण ठेवायची

मी विदूषक व्हायचो दुनियेस हसवावे म्हणुन
मी जरी रडलो.. तिला ती मस्करी वाटायची

पेन्शनीच्या चार पैशांवर कुठे भागायचे
मग तशी आजी जुने पितळी डबे मोडायची

रोज मी मागायचो सुख ...दुःख तो धाडायचा
नेहमी त्याची अशी देण्यात गफलत व्हायची ........... [ सौजन्य : शामजी ]
_________________________________________

अजनबीसा लागतो वाटू स्वत:चा चेहरा
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची

किंवा

कुणी नसणार आई....

Submitted by वैवकु on 16 October, 2012 - 12:33

कसा दिसणार होतो म्हणा मी साजणीला
बिलगला चंद्र होता तिच्या त्या चाळणीला

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
तसे मग सूख बसले मनाच्या वळचणीला

'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी केलाच नाही
गझल मुकलीच माझी खर्‍या साकारणीला

कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य