साहित्य

मामा, मामा - हे का ते ???

Submitted by पुरंदरे शशांक on 19 February, 2013 - 23:29

मामा, मामा - हे का ते ???

कान छोटे गोल गोल
लुकलुक मणी दोन दोन

पळतात मामा सुळकन
लपतात कसे झपकन

घरात दिस्ता स्वारी यांची
दाणादाण सगळ्यांची

आधी उडते घाबरगुंडी
मग धावतात यांच्या पाठी

काठी कुंचा येतो हाती
चला व्हा बाहेर म्हणती

कधी होते गमाडी गंमत
याच मामांना बाप्पांची संगत

चंगळ होते इतकी तर
आरती प्रसाद वरचेवर

बाप्पांबरोबर जाता मामा
सग्ळे म्हणती पुन्हा याना ...

गोष्ट मेंढा गावाची - लेखक - मिलिंद बोकील

Submitted by दिनेश. on 19 February, 2013 - 08:30

गोष्ट मेंढा गावाची - लेखक - मिलिंद बोकील

हे पुस्तक मला पुण्यातल्या मित्रमंडळींनी भेट दिलेय. याचे प्रकाशक आहेत, ग्रामसभा, मेंढा (लेखा), पो. हेटी, ता. धानोरा , जि. गडचिरोली ४४२६०६, महाराष्ट्र आणि अर्पण केलेय, "भारतीय जनतेस...". या दोन बाबींवरुनच
हे पुस्तक खुपच वेगळे आहे, हे जाणवलेच. आहे केवळ १४० पानांचे. एवढ्या आकाराचे पुस्तक, मला
वाचायला फारतर २ तास लागतात. पण हे पुस्तक मी गेले महिनाभर थोडे थोडे करत वाचतोय. कारण ते
तसेच वाचावे लागते.

असे काय आहे या पुस्तकात ?
हि गोष्ट असली तरी काल्पनिक नाही. ज्या गावच्या ग्रामसभेने ते प्रकाशित केलेय, त्याच गावाची सत्यकथा.

आमचें गोंय - भाग ११- कोंकणी भाषा: इतिहास आणि आज

Submitted by टीम गोवा on 17 February, 2013 - 23:49

अजून एक चिऊतै...

Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 23:19

अजून एक चिऊतै...

चिऊतै चिऊतै
....नाचतात थुई थुई

चिव चिव किती बाई
....अंगणभर बाग्डत जाई

दाणा खाई पाणी पिई
....गोड गोड गाणे गाई

घरटे छान छोटे सही
....पिल्लू इव्लू ओरडत राही

अंधार जरा होताच
.....पंखाखाली गाईगाई ....
.....(आई-कुशीत गाईगाई)

सदिच्छा ..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 06:22

सदिच्छा ..

असे उजाडावे | मनाच्या क्षितीजी |
नुरावी काळजी | नावालाही ||

लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||

मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||

स्वैर वारा वाहे | किंवा झरा मुक्त |
व्हावे बंधमुक्त | चित्त तसे ||

असावा तयात | प्रेमाचा ओलावा |
सुखाचा गारवा | सदोदित ||

हीच एक आस | मनी तोचि ध्यास |
न करी उदास | जगदीशा ||

शब्दखुणा: 

अंत कहाणी (कबीर)

Submitted by -शाम on 15 February, 2013 - 06:01

"बैरी पिया बडा बेदर्दी.." शाहरुखच्या देवदासमधलं अप्रतिम गीत. एक एक शब्द प्रेयसीची प्रियकराबाबतची लडीवाळ तक्रार मांडणारा.पण काव्यात शब्दांचे अर्थ तंतोतंत तेच असतात असं नाही.उपमा,उत्प्रेक्षा,रूपके,प्रतिमा, यांचे वेगळे अर्थही मिसळलेले असतात. तसेच काव्यनिर्मात्याच्या भूमिकेवरही बरेच अवलंबून असते. "बैरी पिया बडा बेदर्दी.." हेच एखाद्या संतकवीने लिहून ठेवले असते तर?

मनाचा पिसारा..!

Submitted by झुलेलाल on 14 February, 2013 - 13:33

आज नाथाला नेहमीपेक्षा लवकरच जाग आली. आळोखेपिळोखे देत तो बेडवरून उतरला आणि ब्रश करून गॅलरीत जाऊन उभा राहिला. ही त्याची नेहमीची सवय. नाथानं बाहेर बघितलं. रोजचचं दृश्य. समोरच्या बदामाच्या झाडावर कावळ्यांचे थवे कलकलाट करत होते. नाथाची नजर बदामाच्या झाडावर स्थिरावली. आणि त्याला धक्का बसला. ..
.. हे झाडसुद्धा नाथाच्या डोळ्यादेखतच लहानाचं मोठं झालं होतं.. त्याच्यावर लगडलेली बदामाची फळं मटकावायला पोपटांचे थवे दिवसभर मुक्काम ठोकून असायचे.

विषय: 

(तस्वीर-तरही)..जिणे निष्पर्ण झाडागत..

Submitted by वैवकु on 13 February, 2013 - 06:33

जिणे निष्पर्ण झाडागत...मला बहरायचे आहे
फुलोर्‍यांच्या तळ्यामध्ये मला डुंबायचे आहे

शिवाराचा दुकाळी हिरवळीचा हट्ट ; माझाही....
जरी आडात ना पाणी मला शेंदायचे आहे

नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
मला इकडे तुला तिकडे निघत गाठायचे आहे

मला हे माहिती नव्हते शिकवताना तुम्ही बाई
उद्या आयुष्य ह्याच्यातुन मला घडवायचे आहे

इथे अब्जावधी तारे तरी अंधार का सगळा
मनातुन विठ्ठला.. .काळ्या ...तुला काढायचे आहे

________________________

रैनि गई मत दिनु भी जाइ

Submitted by समीर चव्हाण on 12 February, 2013 - 13:18

अलीकडेच कबीराची एक सुंदर कविता वाचनात आली.
(Songs of Kabir, Translated by Arvind Krishna Mehrotra, Everyman Publication,
with a preface by Wendy Doniger)
एका महाकवीचे मरणाचे अप्रतिम डिस्क्रीबशन आहे,
डोळे दिपवणारे आहे. कबीर म्हणतो:

रैनि गई मत दिनु भी जाइ
भंवर उडे बग बैठे आइ

थरहर कंपै बाला जिउ
ना जांनौं क्या करिहै पीउ
कांचै करवै रहै न पानी
हंस उडा काया कुम्हिलांनी
कउवा उडत भुजा पिरांनी
कहै कबीर यहु कथा सिरानी

काही अर्थ सांगतो की ज्याने कविता समजायला सोपी जाइल.
एकतर मत इथे सुध्दा अश्या अर्थाने आलेले दिसतेय.
बग म्हणजे हेरोन.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य