ती वागली कशीही म्हण चांगलीच आहे
काहीतरी तिची ही जादूगरीच आहे
माझ्या मनात इच्छा आता तिचीच आहे
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात पाहिले मी
प्रतिमा उभी तिथे ती घनसावळीच आहे
दो शब्द बोलण्याचे काळीज मागते ती
ही बातमी म्हणे की आहे खरीच आहे
कसला असा अबोला रुसवा कश्यामुळे हा
मी प्राण सोडताहे ती चाललीच आहे
हा कायदाच आहे निष्ठूर जिंदगीचा
ती वागली कशीही म्हण चांगलीच आहे