मामा - हे का ते ???

मामा, मामा - हे का ते ???

Submitted by पुरंदरे शशांक on 19 February, 2013 - 23:29

मामा, मामा - हे का ते ???

कान छोटे गोल गोल
लुकलुक मणी दोन दोन

पळतात मामा सुळकन
लपतात कसे झपकन

घरात दिस्ता स्वारी यांची
दाणादाण सगळ्यांची

आधी उडते घाबरगुंडी
मग धावतात यांच्या पाठी

काठी कुंचा येतो हाती
चला व्हा बाहेर म्हणती

कधी होते गमाडी गंमत
याच मामांना बाप्पांची संगत

चंगळ होते इतकी तर
आरती प्रसाद वरचेवर

बाप्पांबरोबर जाता मामा
सग्ळे म्हणती पुन्हा याना ...

Subscribe to RSS - मामा - हे का ते ???