सदिच्छा ..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 06:22

सदिच्छा ..

असे उजाडावे | मनाच्या क्षितीजी |
नुरावी काळजी | नावालाही ||

लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||

मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||

स्वैर वारा वाहे | किंवा झरा मुक्त |
व्हावे बंधमुक्त | चित्त तसे ||

असावा तयात | प्रेमाचा ओलावा |
सुखाचा गारवा | सदोदित ||

हीच एक आस | मनी तोचि ध्यास |
न करी उदास | जगदीशा ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओव्या आवडल्या.

लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||

मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||

खूप सुंदर लिहीलंस शशांक...

इतकं पॉझिटीव्ह वाटलं ना वाचून की, बस्स..!!
जियो Happy

सुन्दर

सुंदर अभंग रचना !
काही शब्दसमुहांतून एकच अर्थ पुनरूक्त झाला आहे. पण तो ओघवता असल्याने फारसा जाणवत नाही , यात आपले यशच आहे.

भवसागराला टाळून वैराग्य मिळवण्यासाठी किँवा गृहस्थाश्रमातून वानप्रस्थ , संन्यासाश्रमाकडे वाटचाल करण्याची इच्छा प्रभावी शब्दांत व्यक्त झाली आहे.

एकूणच रचना खूप आवडली.

सुंदर !