रैनि गई मत दिनु भी जाइ

Submitted by समीर चव्हाण on 12 February, 2013 - 13:18

अलीकडेच कबीराची एक सुंदर कविता वाचनात आली.
(Songs of Kabir, Translated by Arvind Krishna Mehrotra, Everyman Publication,
with a preface by Wendy Doniger)
एका महाकवीचे मरणाचे अप्रतिम डिस्क्रीबशन आहे,
डोळे दिपवणारे आहे. कबीर म्हणतो:

रैनि गई मत दिनु भी जाइ
भंवर उडे बग बैठे आइ

थरहर कंपै बाला जिउ
ना जांनौं क्या करिहै पीउ
कांचै करवै रहै न पानी
हंस उडा काया कुम्हिलांनी
कउवा उडत भुजा पिरांनी
कहै कबीर यहु कथा सिरानी

काही अर्थ सांगतो की ज्याने कविता समजायला सोपी जाइल.
एकतर मत इथे सुध्दा अश्या अर्थाने आलेले दिसतेय.
बग म्हणजे हेरोन.
बाला - ब्राइड (म्हणजे आत्मा असा अर्थ निघू शकतो)
जीउ - हृदय
तर पीउ म्हणजे पती.
कांचै म्हणजे मातीचे मडके (अपेक्षित) असावे.
थरहर कंपै - थरकाप होणे,
कांचै करवै रहै न पानी - मडक्यातुन पाणी ठिबकणे,
हंस उडा - हंस उडणे,
काया कुम्हिलांनी - शरीर कोमेजणे,
कउवा उडत - कावळे उडवणे,
भुजा पिरांनी - तळव्यांची आग होणे
ह्या घटना मृत्यूकडे बोट करतात.
शेवट तर निव्वळ अप्रतिम आहे:
कबीर म्हणतो कथेचा अंत (जवळच) आहे.

बरेच दिवस ही कविता डोक्यात घोळत होती.
ती इन्टरप्रिट करताना असे काही सुचले:

रात्रही गेली तसा दिवसही जाइल
कुठवर तृषा तुझी रिझवत राहिल

चल अव्हेरून पाहू
जरा रेंगाळून पाहू
भय-हर्ष एकमेकी घुसळून पाहू

मन बुजवून पाहू
जरा भेगाळून पाहू
भय-हर्ष एकमेकी घुसळून पाहू

रात्रही गेली तसा दिवसही जाइल
कुठवर व्यथा तुझी झिरपत राहिल


समीर चव्हाण

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर,
मी आधी तुझी रचना वाचली. ती मला एक वेगळी कविता म्हणून खरंच खूप भावली.
नंतर तू दिलेला मूळ कवितेचा भावार्थ वाचला आणि तरीही तुझीच रचना आवडली.

मन बुजवून पाहू
जरा भेगाळून पाहू
भय-हर्ष एकमेकी घुसळून पाहू>> ही संकल्पनाच किती तरल आहे. असं करण्याचाचह मोह पाडायला लावणारी

आभारी आहे...

सर्वावंशी सहमत
यानिमित्ताने कबीराची रचना वाचायला अभ्यासायला मिळाली हे जास्त आवडले तुमची कविता या कवितेवरून आली आहे हे समजत नाही आहे तुमची कविता वेगळीच वाटते

तुमची कविता या कवितेवरून आली आहे हे समजत नाही आहे तुमची कविता वेगळीच वाटते

कवितेची पहिली ओळ कबीराची जसेच्यातसे घेतली आहे. ह्याव्यतिरिक्त पूर्ण कवितेत
थरहर कंपै बाला जिउ
ना जांनौं क्या करिहै पीउ

ह्या ओळींचा भाव भरून राहिलाय, असे जाणवते.
कबीराच्या कवितेच्या जवळपासही जाणे अशक्य दिसते.

धन्यवाद.

अशक्य दिसते.>>> नाही अगदी तसेच नाही वाटत
मला वाटते याच्या अनुवादास्तव ग्रेस /गुलजार हवा (वैयक्तिक मत)

ज्ञानोबा माउली सर्वोत्तम ठरतील बहुधा !!
ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या लेखनात असे काहीतरी आलेच असेल
तुमचा अभ्यासही आहेच पडताळून पाहून आम्हांसोबत इथे शेअर कराल का समीरजी Happy

ज्ञानेश्वरांचे फारच थोडे वाचलेय.
तुकारामाच्या लेखनात नक्कीच असे काही आलेय.
मात्र मला म्हणायचे होते की कबीराने ह्या कवितेत फारच कमाल केलीय.
त्याच्या भाषेचा लहजा, त्याच्या चित्रदर्शी प्रतिमा, त्याच्या विचारांची बैठक, सगळेच जबरदस्त.
मला वाटत नाही की कुठल्याही भाषेत ह्या कवितेला काही जोड आहे.

छान वाटला अनुवाद.
या निमित्ताने कबीराचे विचार वाचायला मिळाले. धन्यवाद.

वैभवप्रमाणेच मलाही वाटले, क्षमस्व.कबीरजींच्या मूळ कवितेतील शब्दार्थांप्रमाणे अर्थानुवादही (गद्य)दिलात तर जी प्रक्रिया तुमच्या मनात घडलीय ती पोचेल, अन्यथा ही एक स्वतंत्र रचना म्हणून जास्त भावतेय..

धन्यवाद.
मेहरोत्रा यांचा सुंदर इंग्लिश अनुवाद देतोय, जेणेकरून अर्थ अधिक स्पष्ट होईल.

The night has passed,
The day will too;
A heron nests
Where the black bee hummed.
Like a young bride thinking
Will he? Won't he?
The soul trembles with fear.

This raw clay pitcher
From which water leaks
And color runs
Is good for nothing
Once the swan has flown.

My time goes in shooing crows
The arms ache from it
And the palms burn.
That's the end of the story,
Kabir says.