विश्वास नाही बसत माझा
अशाने घोर पडतो सतत माझा
म्हणुन नाही मला मी म्हणत माझा
तुझ्या प्रेमात असल्याचे समजले
स्वतःवर जीव नव्हता जडत माझा
जगाच्या सरळधोपट पायवाटा
असा का पाय आहे वळत माझा
तुझे सांगून झाले हरतर्हेने
मला मुद्दाच नाही पटत माझा
कुणासाठीतरी जगलो सदा मी
अता मरणार आहे जगत माझा
तुझ्या विश्वामधे स्वारस्य नाही
मला माझेपणा दे परत माझा
जसा मी विठ्ठलाचा होत जातो
तसा मग शेर जातो बनत माझा
मला सोडून तू गेलीस आई ......
अजुन विश्वास नाही बसत माझा
________________________________
विठठलाचाच शेर... बदल आवश्यक वाटल्यास ...........
