सलमान करतो ती श्टाईल

Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 June, 2019 - 10:36

सलमान करतो ती श्टाईल

त्याने चड्डी घातली काय

नि तो उघडा फिरला काय

कुणीच काय बी बोलायचं नाय

सलमान हाय भाय त्यो सलमान हाय

बोलायचं काय बी काम नाय

जिथं तिथं असतो त्याचाच बोलबाला

इथं कोण इचारतंय आम्हाला

साधं कुत्रं ओळखत नाय साला

मी पण एकदा अंगावरती

नाव कोरलं सल्लू

शर्ट काढूनि फेकून दिल्ल्ल

नि बाहेर पडलो हल्लू

वाटलं कुणीतरी आयटम साल्ली

बॉललं हन्नी हन्नी

बोलताक्षणी फिरवू तिल्ला

गल्लीबोळी वन्नी

फिरून चटकून गाव हुंगलं

नाय भेटली कुणी मन्नी ,

दादा , मला नाय भेटली मन्नी

चकरा मारून चक्कर आली

बसलो झाडाला टेकून

तेरे नामची गाणी म्हटली

उघडी छाती दाखवून

बाप माझा शोधात हाय

हे सांगत आला टिल्लू

धरणीकंप त्यो झाल्यावानी

जमीन लागली डुल्लु

अंगावरचं सल्लू जाउनी

लिहून घेतलं म्या " पिल्लू "

दादा, लिहून घेतलं म्या " पिल्लू "

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चला वाचा आणि कळवा बरे अभिप्राय

ओढले तरी हरकत नाही आमचे

दोन लांबलचक पाय

तुमच्यासाठीच जन्म घेतला

अजून दुसरे काय