बाळाचं नाव सुचवा : ध्येयवादी - संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम

Submitted by cvijayn on 1 July, 2019 - 19:51

आम्हाला बाळ होणार आहे, एकाच नाव असा सुचवा कि मुलगा किंवा मुलगी ला बोलता येईल असं २ किंवा ३ अक्षरी नाव सुचवा किंवा छानस बाळाचं टोपण नाव सुचवा, नाव संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम, हि विनंती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रद्युम्न
सात्यकि
शशिधर
सत्वशीला
प्रणया

ञग्वेद,
भार्गव,
ऋषि,
ऋचा,
समिधा,

Sanchit

फेनिल म्हण जे माझ्या अंदाजाने समुद्राच्या लाटा किनार्‍यावर येतात तेव्हा जो फेस येतो तो .

Fenil mhanaje fes>>> मोबल्यावरून लिहिताना चूक झालीय.फेन म्हणजे फेस असेच लिहाययचे होते.फेनक म्हणजे फेस आणणारा.

आयुष - आयुषी
वेदांग - वेदांगी, वेदिका
तन्मय - तन्मया
प्रणव - प्रांजली ,प्रणिता , प्रणोती

<<प्रणव - प्रांजली ,प्रणिता , प्रणोती
Submitted by जिद्दु on 2 July, 2019>>

प्रणोती नाव नका ठेवू plz. हिन्दीभाषी जनता 'पनौती' असा उच्चार करते.
तसेच 'लावण्या' नावाचे पण होते. लावंण्या / लावण्ण्या असा उच्चार न करता सरळ सरळ लावण्या (तमाशाचा फड ) म्हणतात

तसेच 'लावण्या' नावाचे पण होते. लावंण्या / लावण्ण्या असा उच्चार न करता सरळ सरळ लावण्या (तमाशाचा फड ) म्हणतात > लावण्या , काव्या या नावांबद्दल मला नेहेमी हेच वाटते. जर उच्चार जमत नसेल विचित्र वाटते.

सिद्धार्थ - सिद्धी
वरद - वरदा

मनुस्मृती
पाणिनी
दक्षिणायन
उत्तरायन
रुपम
दॄष्यम
रुद्रम
रुद्राणी
मनःचक्षु

ञग्वेद,
<<
की ?

हे गंग्वेद काय आहे नक्की??

अहो दादा/ताई, किमान मराठी मुळाक्षरांची ओळख तरी करून घ्या. मायबोली आहे ना ती आपली?

ऋ टाईप करायला इतका कठीण आहे का? की तुम्ही क ख ग घ ङ, च छ ज झ ञ अशा बाराखडीतून ञ हे स्वरदर्शी अक्षर निवडले? आजकालच्या व्हॉट्सॅप फॉर्वर्डात ञ हा त्र ऐवजी सर्रास वापरलेला पाहिलाय. ऋ ऐवजी पहिल्यांदाच पाहिला. 29.gif

खाली ऋचा बरोबर लिहिलंय की तुम्ही! मग वरतीच हे असे का?

ञग्वेद >>>
आफ्रिकन नाव असेल. Ngong, mbangwa सारखा उच्चार करत असतील Happy

Biggrin
अमेरिकन इंग्लिश मध्ये favourite चं favorite केलेलं चालतं मग आफ्रिकन संस्कृतातला ञग्वेद का जड झाला? आफ्रिकेत काय ञषिमुनी नव्हते .. Wink

दृष्टद्युम्न, यद्नोपवित, ब्रम्हदत्त, मनु, गंधर्व, ज्ञ, अज्ञा, आविष्कार, विनोद, प्रताप, प्रणयोत्पात, प्रणित, लसूण

सत्यकाम जाबाल.
आता खूप नावे झाले बारश्याचे पेढे वाटा ध्येयवादी राव.

दृष्टद्युम्न, यद्नोपवित,
<<
धृष्टद्युम्न.

यज्ञोपवित : म्हणजे जानवे! 21.gif

अन हे हाईट्ट आहे =>
pranayotpat.jpg106.gif म्हणजे काय??

अहम् 'ध्येयवादी' इति संस्कृतभाषायाम् सूचयितुम् इच्छामि|

तुम्ही म्हणालात ध्येयवादी - संस्कृतमध्ये सुचवा. तेच वर केलं आहे.

Pages