मुक्तस्रोत(Open Source)

कलियुग

Submitted by सेन्साय on 7 October, 2018 - 05:32

कलियुग
~~~~~

कलियुगात भेटला एकदा अजब चित्रकार
रेखाटले त्याने सुंदर स्वप्नांचे कल्पित आकार
निरखुन पाहता चित्रातून झाले भविष्य साकार
अकल्पित अघटित सर्वच तेथे अंधकार !

छाटलेल्या शिश्नाचाही दिसू लागला आविष्कार
घड़तो तिसऱ्या पंथाकडूनही तेथे बलात्कार
सुंथा केलेला, न केलेला राही निर्विकार
हाच असेल का बरे कलियुगाचा चमत्कार !

स्पर्श घृणावणारा लपवतो अस्फुट चित्कार
पोटाची खळगी बनतात येथे लाचार
राजरोस सुरु झाला पहा हां व्यभिचार
खुलेआम भरतो आता चमड़ीचोरांचा बाजार !

मायाजाल

Submitted by pritikulk0111 on 27 August, 2018 - 03:11

बऱ्याच दिवसांपासून या विषयावर लिहायचा विचार चालू होता पण लिहायला मुहूर्त लागत नव्हता.अश्याच काहि सेन्सेटिव्ह केसेसवर एक मित्र काम करतोय, त्याच्याशी बोलताना पुन्हा काहि धक्कादायक गोष्टी नव्याने समोर आल्या म्हणून आज लिहायला सुरुवात केली.

बकेट चॅलेंज किंवा आत्ता हल्लीचं किका का कुका काय चॅलेंज आलंय ते सर्वांना माहिती असेलच. यापूर्वी ही असे गेम येऊन गेले आहेत यातून घडलेल्या गंभीर घटना अनेकांनी वाचल्या/ऐकल्या ही असतील, सेम अश्याच प्रकारचे वेगवेगळ्या चॅलेंज देणाऱ्या साईट आहेत (काहि उघड तर काहि डार्क वेबची पयदायिश).

शब्द माझ्या मनातले

Submitted by Hemali Mhatre on 14 August, 2018 - 03:39

नको ना असं करु. बस्स्स झाले.. सोड ना आता.. किती हा त्रास .. मला,तुला,फॅमिलीला ,आणि आपल्या फ्युचर ला सुद्धा... काय मिळतय यातून.. टेंशन नि फक्त टेंशन .. बाकीचे सर्व एंजोय करतात लाईफ.. त्यांना ही प्रोब्लेम्स् असतात..म्हणून असं नाही जगत रे ते .. मग आपणच का ? आपलं तर क्षुल्लक भांडण आहे रे ... तू ही ताणलं मी ही ताणलं तर कसं रे होईल...

शब्दखुणा: 

लेवा साहित्यिक

Submitted by Asu on 29 July, 2018 - 10:12

लेवा साहित्यिक

साहित्यिक आम्ही लेवा
बहिणाईची गुणी लेकरं
पांग फेडू या मायेचं
गाठू यशाची उंच शिखरं

एक सूर अन् एक ताल
एक असे आमची चाल
शत्रूंच्या आक्रमणाला
पुढे करू आमची ढाल

सामर्थ्य असे लेखणीचे
ढालीचे, ना तलवारीचे
प्रेम घेऊ अन् प्रेम देऊ
जग सारं जिंकून घेऊ

समाजस्थिती घडवू ऐसी
स्वर्गात् अपि गरीयसी
उंच गगनी जाईल लेवा
देवांनाही होईल हेवा

-प्रा.अरुण सु.पाटील (असु)

शब्दखुणा: 

गुरू

Submitted by Asu on 27 July, 2018 - 01:40

गुरुपौर्णिमेनिमित्त चराचरातील सर्व गुरूंना विनम्र अभिवादन !

गुरू

बाह्य जगी जरी असे वेगळा
अंतर्यामी मनु मातीचा गोळा
निसर्ग असे गुरूंची शाळा
घट घडविण्या गुणी आगळा

वृक्षाचे उदार दातृत्व घ्यावे
नदीचे पोषक नेतृत्व घ्यावे
ताऱ्यांचे घ्यावे चमचमणे
वाऱ्याचे जगी असून नसणे

आईची घ्यावी निःस्वार्थ माया
पत्नीची शीतल चंदन छाया
बाळाचे घ्यावे निष्पाप हसणे
बाबांचे जीवनी कष्ट उपसणे

शब्दखुणा: 

विषवृक्षाची फळे

Submitted by Asu on 25 July, 2018 - 08:04

विषवृक्षाची फळे

रस्ते पेटले, वस्त्या पेटल्या
खूनखराबा, अंदाधुंदी
मानवतेचा मुडदा पडला
माणुसकीला इथे बंदी

वणवा पेटला तनीमनी
हिंस्त्र श्वापद दंगल करी
भयभीत झाले सारे प्राणी
हरणांची चिंता कोण करी !

जातीपातीची बीजे पेरली
विषवृक्ष गेला गगनावरी
फळे खाऊन मादक भेदक
डोके फिरते अधांतरी

मोडतोड, जाळपोळ
झाला आमुचा राष्ट्रीय खेळ
कशासाठी आणि कुणासाठी
काही जमेना कुठेच मेळ

वसुंधरा विवाह

Submitted by Asu on 23 July, 2018 - 03:29

वसुंधरा विवाह

सूर्य बांधता लग्नमंडपी
मंगल तोरण इंद्रधनुचे
निरोप गेला कानोकानी
शुभमंगल आज वसुंधरेचे

सजला मांडव पानाफुलांनी
फेर धरला लता तरूंनी
पक्षी गाती लगीन गाणी
वारा उधळी अत्तर पाणी

सूर्य उगवता जागा झाला
निसर्ग राजा सजला धजला
स्वार होऊन वाऱ्यावरी
वारू निघाला लगीन घरी

धूम धडाम ढोल ताशे
नभ उजळी त्या प्रकाशे
वीज चमकता रोषणाई
नर्तन करिते धुंद पायी

नभी ढगांची लगीन घाई
वरात निघाली दुडक्या पायी
अशी सगळी गडबड घाई
काय करावे उमजत नाही

शब्दखुणा: 

आषाढी एकादशी

Submitted by Asu on 22 July, 2018 - 15:30

आषाढी एकादशी

माऊली आलो माहेरी, मुखे म्हणता हरी हरी
मायबाप तुमचे द्वारी, पंढरी आम्हा पुण्यनगरी ||धृ||

आषाढी एकादशीचा, दिन आला सोनियाचा
साधुसंत झाले गोळा, विठुरायाचा हा सोहळा ||१||

एकादशीच्या पवित्र वारी, सजली पंढरपुरनगरी
दिंड्या पताका भरमार, घुमतो विठुरायाचा गजर ||२||

वारकऱ्यांचा पूर लोटला, चंद्रभागेच्या तीरा
बेहोष नाचती भक्तजन, घोष गेला दिगंतरा ||३||

विठू माऊली तुझे राऊळी, उभा आतुर भक्त वृंद
वारकरी आम्ही साधे भोळे, आम्ही ना साधुसंत ||४||

शब्दखुणा: 

मायबोली वर फोटो कसे पोस्त्त करतात???

Submitted by pritikulk0111 on 19 July, 2018 - 11:07

मला आपली मदत हावी आहे...मायबोली वर पोस्ट मध्ये फोटो कसे टाकतात...कोणी सांगू शकेल काय??? खूप शोधून सुधा लिंक काम करत नाही आहे ....कृपया कोणी मदत करेल का ???

शब्दांचे खेळ

Submitted by अक्षय. on 11 July, 2018 - 23:36

शब्दांनी नाती जोडली जातात
शब्दांनी नाती तुटतात
शब्द म्हणजे दुधारी तलवार
करावा त्याचा नाजूक वापर

समजावूनी मी थकलो
नाही उरला आता त्राण
पांडुरंगा तू बघतोयस मजा
वाटतीय मला आता ही सजा

घालतोय साकडे आता
शब्दाचा खेळ माझ्याने थांबेना
होतील ज्यामुळे सतत वाद
करतोस का असे सगळेच शब्द बाद

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)