नियते

आव्हान

Submitted by मी_अनामिक on 3 July, 2019 - 12:24

संपव तु वटवृक्षाच अस्तित्व माझं
तरीही लहानस बीज होईन म्हणतो...

गाड मातीत मला क्रूरतेने
होऊन अंकुर इवलसं उगवीन म्हणतो...

कर आभाळाचे घाव तू
पोलादी छातीवर झेलीन म्हणतो...

घेऊनी त्यांनाच पदाखाली
तयावर उभा राहीन म्हणतो...

उधळले कैक हजार डाव जरी तू
आणिक एक खेळीन म्हणतो...

पडेन कितीदा मोजणार नाही
नेटानं पुन्हा उभा राहीन म्हणतो...

काट्या-कुट्यांच खाच-खळग्यांच घेणं नाही
त्याच पथावर अविरत चालीन म्हणतो...

असशील तू विधीलिखित जरी
तुलाच आव्हान देईन म्हणतो...

Subscribe to RSS - नियते