जुनी कुटुंबपद्धती विरुद्ध आधुनिक कुटुंबपद्धती?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2021 - 10:25

आज मायबोलीवर आलो आणि दोन धागे नजरेस पडले.
दोन्हींचा सारांश असा होता की,
रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा अमुक तमुक पदार्थच केले जातात कारण त्याने वेळेची बचत होते.

पण ही वेळेची बचत का करावी लागते?

म्हणजे बॅचलर असाल तर ठिक आहे. दिवसभर काम करायचे आणि रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण बनवायचे, मग स्वयंपाकघर आवरायचे, भांडी घासायची, ती जागेवर लावायची वगैरे वगैरे.. आता चांगले कमावत असाल तर काही कामांसाठी मदतनीस ठेऊ शकतोच. पण त्यातही स्वयंपाकासाठी कोणी ठेवायचे म्हटल्यास सतरा अडचणी आणि प्रत्येकाच्या अठरा आवडीनिवडी असतात. त्यामुळे लोकं ईतर धुणीभांडी आणि साफसफाईला मदतनीस ठेवतात, पण स्वयंपाकाचे स्वतःच काहीतरी करण्याकडे कल असतो. त्यात सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धकाधकीच्या आयुष्यात दिवसभर शारीरीक आणि मानसिक थकवा येणारे काम केल्यावर रात्री पुन्हा जाऊन स्वयंपाक करणे जीवावर येतेच.

आता या प्रॉब्लेमवर पूर्वी खूप सोपे सोल्युशन होते. छानपैकी लग्न करावे. जेवणाची चिंता बायकोवर सोडून द्यावी आणि घर चालवायला पैसे कमवायची जबाबदारी नवर्‍याने घ्यावी. दोघांनीही आपापले ईगो न कुरवाळता एकमेकांच्या कामाचा आदर करत मजेत राहावे. थोडक्यात याबाबतीत आपली जुनी कुटुंबपद्धतीच बेस्ट होती.

पण सध्या नवराबायको दोन्ही कमावू लागल्याने हे जेवणाचे हाल सुरू झालेत लोकांचे. दुपारचे एकवेळचे जेवण बाहेरच होते तर रात्रीच्या एकवेळच्या जेवणाला असे शॉर्टकट शोधावे लागतात. संध्याकाळी चहा कोण करणार यावरून मारामार्‍या होतात त्या वेगळ्याच.. रोजच्या पोहे, उपमा, घावणे, ईडल्या वगैरे नाश्त्याची बोंबच, बाहेरूनच वडे समोसे मागवले जातात किंवा पावाच्या दोन तुकड्यामध्ये कच्च्या भाज्या कोंबून काहीतरी पौष्टीक खातोय म्हणून मनाचे समाधान करावे लागते.

तरीही आधुनिकता जपायचीच असेल तर उलटे करावे. पत्नीने कमवायची जबाबदारी घ्यावी आणि पतीने स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा. पण नाही. जो कमावतो त्यालाच या समाजात मान मिळतो अशी काहीशी भावना मनात असल्याने आणि चार बूकं शिकलोय तर ते शिक्षण न कमावता फुकट कसे घालवणार या विचाराने स्त्री किंवा पुरुष कोणीही याबाबत मागे हटायला तयार नसतो आणि मग जेवणखाण्याबाबत कॉम्प्रोमाईज करण्याला पर्याय उरत नाही.

याऊपर जेव्हा दोन माणसे घराबाहेर कमवायला पडतात तेव्हा दुप्पट वा जास्त प्रदूषण करतात, निसर्गाचे जास्त रिसोर्सेस वापरतात ते वेगळेच. पण हे करून मिळते काय? तर दुप्पट कमाई? पण एकवेळच्या जेवणाची घिसाडघाई? कुटुंब वाढल्यावर मुले झाल्यावर हे प्रॉब्लेम्स आणखी वाढतात. आता काय डिटेल देत बसणार. ही तर घर घर की कहाणी आहे.

बघा अगदीच बेसिक आहे.
जसे क्रिकेटच्या संघात बॅटसमन आणि बॉलर दोन्ही आपापले काम चोख बजावणारे असतील तरच त्याला संतुलित संघ म्हणतात. सारेच प्लेअर बॅटींगला हावरे झाले आणि आम्ही रन्स बनवायचे कामच करणार असेच बोलू लागले. तर जगातले सर्वोत्तम अकरा फलंदाज घेऊनही ती टीम कधीच सामना जिंकू शकणार नाही.

आपली कुटुंबपद्धतीही या काळात अशीच होत चालली आहे. म्हणायला आपण म्हणतोय की प्रत्येकाने अष्टपैलू बनावे (कमवायला आणि स्वयंपाक करायला दोन्ही शिकावे), पण प्रत्यक्षात फॅक्ट हे आहे की सर्वांना फलंदाजीची (कमवायची) हाव सुटली आहे, गोलंदाजीची (स्वयंपाकाची) जबाबदारी कोणी खांद्यावर घ्यायला तयार नाही.

जर समाजात जगतानाही आपण आपले धान्य आपण पिकवत नाही, ते काम शेतकर्‍यांवर सोडतो. आपण आपला ईंजिनीअरींगचा जॉब करतो, आपल्या आरोग्याची काळजी करायची जबाबदारी डॉक्टरांवर सोडतो, मुलांना शिकवायची जबाबदारी शिक्षकांवर सोडतो, सार्वजनिक जागांची काळजी घ्यायला प्रशासनाची निवड करतो.... तर मग घर चालवताना, एक कुटुंब म्हणून जगताना अशी विभागणी टाळायचा अट्टाहास का दिसतो..

हो, आता अपवाद असतील. ते दाखवायची चढाओढही लागेल. पण थांबा. शांतपणे विचार करा. आणि प्रामाणिकपणे सांगा. आपली जुनी जीवनपद्धती, जुनी कुटुंबव्यवस्थाच योग्य नव्हती का? दोघांपैकी एकाने कमवावे, आणि एकाने घर सांभाळावे.. आणि आज जे आहे, तो आपला नाईलाज आहे, गोड मानून घ्यावे लागतेय.

तळटीप - धागा कोणीही वैयक्तिक घेऊ नये. कोणावर हे आरोप नाहीत. कोणाला यात दोष द्यायचा हेतू नाही. सध्या आजूबाजूला जे बघतोय आणि जे एकेकाळी जगलोय, त्यातील भेद प्रामाणिकपणे मांडायचा हा एक प्रयत्न आहे ईतकेच.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्डियात बेस्ट आहे. डबा लावावा! घरगुती कमी तेलात करुन देणारे मिळतात.शिवाय बर्याच जणांचे जेवण बनवले तर जास्त चविष्ठ होते व
एका चुलीत झाल्याने एन्व्हायर्मेन्टली सस्टेनेबल. आसपास चौकशी करा!

मला वाटते भाषेच्या मुलभूत चुका झालेल्या आहेत.
जर जुनी असा शब्द असेल तर त्याला विरूद्धार्थी नूतन, नवीन असा शब्द आहे.
जर आधुनिक शब्दच वापरायचा असेल तर त्याला पूरक विरोधी म्हणून पारंपारीक असा शब्द वापरावा लागेल. शीर्षक दुरूस्त केले म्हणजे मजकुराकडे जाता येईल.

ऋन्मेष, ह्यात डबल मिनींग नाही ना काही?
>>>>

बिलकुल नाही. आपण स्त्रीपुरुष समानतेबाबत आधुनिक विचार अंगीकारत आहोत, करीअरबाबत महत्वाकांक्षी होत आहोत, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्व देत आहोत... पण त्याचवेळी विवाहस्थंस्था आणि कुटुंबरचनेची चौकट त्याला साजेशी बदलत नाहीये. ना ईकडे ना तिकडे, आपण मधल्या स्थित्यंतरावर असंतुलित अवस्थेत अडकलो आहोत. स्पेशली मध्यमवर्गीय वा नव ऊच्चमध्यमवर्गीय चाकरमान्यांना हे लागू.

तुझं म्हणणं बरोबर आहे ऋ, पण तेव्हाच्या राहणीमानात आणि आताच्या खूप फरक पडलाय , त्यामुळे डबा लावणे अथवा स्वयंपाकाला कुक लावणे हेही सामान्य आहे आता बऱ्याच लोकांसाठी आणि त्यात काही चुकीचे नाही, जे तू चौकटीबाहेरचे म्हणतो आहेस, तसं मला तरी वाटत नाही.
आणि राहीला प्रश्न मुलं झाल्यावर काय, तर आजतरी निदान आपल्याकडे प्रत्येक वर्किंग आई त्या काळात रजा घेतेच आणि नंतर बाई लावायचा ऑप्शन असतोच तर ती काळजी पण मिटते.

आधुनिक कि उत्तर-आधुनिक म्हणायचे आहे ? आधुनिकतेचा प्रवास १९०० सालानंतरचा. त्या आधी आधुनिक आणि आधुनिकता यातला फरक लक्षात घ्यायला पाहीजे. जर हा फरक लक्षात आला तर कुठल्याही टप्प्यावर आधुनिक काय आणि पारंपारीक काय हा प्रश्न उत्पन्न होईलच.
असे करत करत एकाने घरी राहण्याच्या कारणाचा शोध घेतला तर पुरूषाने जंगलात शिकार करायला गेले पाहीजे आणि स्त्री ने गुहा सांभाळली पाहीजे. स्त्री ही कुटुंबाची कर्तीधर्ती असून तिच्या छत्रछायेखाली गुहेत दोन तीन पुरूषांना आसरा मिळू शकतो. हे एक कुटुंब. ती सांगेल त्याप्रमाणे पुरूष बाहेरची कामे, शिकार, सरपण, लाकूडफाटा इत्यादी कामे करतील.

ही जुनी कुटुंबपद्धत आहे. स्त्री ने घरात रहायचे आणि पुरूषाने शिकारीसारखी हाय रिस्क कामे न करता शेतीला पाणी देणे किंवा ऑफीसला जाणे हे आधुनिक झाले.

तळटीप - धागा कोणीही वैयक्तिक घेऊ नये. कोणावर हे आरोप नाहीत. कोणाला यात दोष द्यायचा हेतू नाही.>> याची काही गरज होती का?? अशाने गैरसमज वाढतात, संशयाचे वातावरण निर्माण होते.
गैरसमज, संशय ही देखील एकत्रीत कुटुंबपध्दतीच्या नाशाला कारण ठरले असावेत.

खरं आहे, गौरी खानने रोज पोळी-भाजी करावी, शाहरूख ते अब्राहम सर्वांना डबे द्यावे इ इ. पण तिने तिचा व्यवसाय सुरू केला आणि शाहरूख पण पोहे, उप्पीट करत नाही.... नि किती आता प्रॉब्लेम्स झाले.... Light 1 नि जया बच्चन घरी राहिल्या तर सारं कसं छान पार पडलं. करेक्ट आहे, जुनी पद्धतच बरी होती. Proud

भारतात स्वयंपाक करताना जेव्हढा वेळ जातो तसा पाश्चिमात्य नागरिकांचा जात नाही. गरम चारी ठाव जेवणाचे आपल्याला फार कौतुक असते. ते संपले तर आयुष्य सुसह्य होईल. बर आपण जे काही खातोय ते फार पौष्टिक आहार आहे हा आपला गैरसमज आहे. घरचे डबे खाणारे लोकही व्यवस्थित पोट सुटलेले असतात. सगळे कार्बोहायड्रेट्स तर असतात आपल्या जेवणात.

आणि त्यात काही चुकीचे नाही,
Submitted by भाग्यश्री१२३ on 15 November, 2021 - 22:52
>>>>

चुकीचे असे नाही. पण आधुनिक विचारातून आलेल्या आधुनिक जीवनशैलीचे साईडईफेक्ट आहेत हे, वा त्याची किंमत अशी मोजावी लागतेय.

@ शांत माणूस, सहमत आहे.+७८६

@ निलेश, आम्ही आमच्या घरी काय करतो ते प्रातिनिधीक नाहीये, नसू शकते, असे उदाहरण लेखात दिले तर धागा त्याभोवतालीच फिरत राहतो म्हणून टाळले. तरी तुम्हाला जाणून घ्यायची ईच्छा असेल तर सांगू शकतो. त्यात काही अडचण नाही.

@ सीमंतिनी, शाहरूख-गौरी वा तत्सम सेलेब्र्रिटींचे आयुष्य वेगळेच असते. त्यांचे निकष येथील चर्चेला नाही लाऊ शकत. जिथे सामान्य माणसे हिंंदू-मुसलमान सोयरीक सहज विचारही करू शकत नाहीत तिथे ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

भारतात स्वयंपाक करताना जेव्हढा वेळ जातो तसा पाश्चिमात्य नागरिकांचा जात नाही. गरम चारी ठाव जेवणाचे आपल्याला फार कौतुक असते. ते संपले तर आयुष्य सुसह्य होईल.
>>>>>>>

यात कोणी चूक वा कोणी बरोबर ठरवण्यापेक्षा छान गरमागरम जेवण्यात जो आनंद आपल्याला मिळतो तो मान्य करावा हेच उत्तम असे मला वाटते.
चपाती तव्यावरची ताटात येते तेव्हा तिची मजा औरच. जर ती करून तासाभराने खाल्ली तरी ताजीच असते. आणि ओव्हनमध्ये गरमही करता येते. पण त्यातली मजा जाते हे खरे आहे हे मान्य करायला काय हरकत आहे. आता भारतीयांना याचे कौतुक आहे आणि पाश्चिमात्य नागरीकांना नाही हे यात आणायचेच कश्याला.
अवांतर - जगात भारतीय आणि पाश्चिमात्य याव्यतिरीक्तही लोकं आहेत. आपण तुलनेला नेहमी पाश्चिमात्यच का घेतो कल्पना नाही. बहुधा आपल्याला त्यांचे जास्त कौतुक आहे Happy

घरातल्या सगळ्या जबाबदऱ्या सगळ्यांनी वाटून घेण्यासारखा सोपा उपाय नाहीय का?
>>>>>
प्रत्येक जबाबदारी निम्मी निम्मी करून वाटण्यापेक्षा ठराविक जबाबदार्‍या प्रत्येकाला नेमणे ही पद्धत योग्य नाही का असा मुद्दा आहे. जिथे शक्य आहे तिथे ठराविक कालाने याबाबत रोल चेंजही करू शकतोच.

बायकोला गरम पोळी खाण्याचा आनंद ती जेवायला बसल्यावर तू देत असशीलच.

जे वधा वेळ धागे वळण्यात घालवतो सा, तेवढ्या वेळात कुणाला त्रास न देता आपला स्वैपाक आपण करून गरम ताज खाऊ शकतोस.

त्यांच्याकडे दोन्हीवेळच्या स्वयंपाकाला मावशी आहेत. परवडतं त्याला. बायको, आई, स्वतः, मुलं, पाहुणे सर्वांना एकत्रच गरम चपात्या मिळतात.

गरम चपात्या कुटुंबाला करून घालायची पोस्ट आली की काही आयडींचा फेमिनीस्ट मोड का चालु होतो कुणास ठाऊक. ह्या कधी दोन मायेचे गरम घास कुटुंबाला वाढत नसतीलंच काय?

आमचं धनी दिवसभर दमून भागून रातच्याला घरला येत्यात.
म्या दिवसभर सोमि,टिवी,भटकनं करून, घरातली कामं, कामवाल्या मावश्यांकडनं करून घेऊन ,सांच्याला धन्याला तव्यावरनं ताटात गरम गरम चपाती वाढली तर त्यात गलत काय म्हणायचं??
त्यो कमवायची जबाबदारी घेतो म्या त्यानं कमवलेलं उडवायची जबाबदारी घेते.

मुळात करिअरिस्ट जोडप्याने स्वतःचे घर , वेगळा संसार थाटावाचं कशासाठी? नवीन घर घ्या, त्याच्या कर्जाचे हफ्ते फेडत आयुष्य काढा, कामांच्या वाटणी वरून मतभेद / वाद घाला , त्यापेक्षा सरळ पेइंग गेस्ट / होस्टेलवर राहावे जिथे नाश्ता, दोनवेळा ताजे जेवण, लॉंड्री , साफसफाई कर्मचारी, मुले (होऊ दिली तर, शक्यतो होऊ नाही दिली तर बरं , कारण त्यांना पुन्हा योग्य वेळ कोणी द्यावा? ) सम्भाळण्यासाठी पाळणाघर अशा सोयी असतील. यात खर्च कमी, ताणतणाव कमी, वाद भांडणे कमी. दिवसा मस्त मरमर काम करावे, संध्याकाळी मस्त एन्जॉय करावे. वीकेंडला आळीपाळीने एकमेकांच्या पालकांना भेटून संध्याकाळी परत यावे.
हाय काय नाय काय

जुनी कुटुंबव्यवस्थाच योग्य नव्हती का? दोघांपैकी एकाने कमवावे, आणि एकाने घर सांभाळा >>>> दुसऱ्या ठिकाणी एकीने हवे, असो टायपोच असेल असे समजतो.

पण जुन्या जीवन पध्दतीचा नीट अभ्यास केलेला दिसत नाही. त्यात फक्त दोघांपैकी एकाने कमवावे आणि एकीने घर संभाळावे एवढेच नव्हते. तर दर दोन अपत्यांपैकी एकाने पूर्ण शिकावे आणि एकीने का उगाच जास्त शिकावे?, वयात आल्यावर लग्न करे पर्यन्त दुसरी कडचे रीती रिवाज अंगवळणी पडणे कठीण जाते म्हणुन लहानपणीच लग्न लावून शिंग फुटायच्या आत दोघां पैकी एकीने नांदायला जाणे, म्हणजे तिकडच्या रीती रिवाजांची आधीच सवय होऊन ते शिंग फुटायचा आत अंगवळणी पडतात इत्यादि दूरदृष्टी होती.

तर जुन्या कुटुंब पद्धतीतील फक्त एखादे उचलून ते अमलात आणण्याचा प्रयत्न करून काही हशील होणार नाही.
तेव्हा बालबिवाह करण्यापासून सुरवात करावी असे मी सुचवतो. तसेच दोघांपैकी एकाने अमुक आणि एकीने तमुक ही पद्धत शेवटी फेल गेलीच आहे. परत तेच केले तर परत फेल होईल. तेव्हा जुनी पद्धती आणताना एका आणि एकी यांच्या रोल मध्ये अदलाबदल करणेच उचीत राहील असे मला वाटते.

अगदी. गर्रम गर्रम जेवणच हवं असल्या मागण्या आमच्याकडे तरी नाहीयेत ब्वॉ. मी कधी स्वयंपाक करते तर नवरा सूप सँडविचेस कधी बनवतो. त्यामुळे जॉब आणि घर असा दुहेरी थकवा अजिबात येत नाही. परस्परांत सांमजस्य हवे - जे की दुर्मिळ असते. बाकी किती का बाबतीत नवर्‍याशी मतभेद असोत पण याबाबत मी भाग्यवान आहे.

बायकोला गरम पोळी खाण्याचा आनंद ती जेवायला बसल्यावर तू देत असशीलच.
>>>
त्यांच्याकडे दोन्हीवेळच्या स्वयंपाकाला मावशी आहेत. परवडतं त्याला. बायको, आई, स्वतः, मुलं, पाहुणे सर्वांना एकत्रच गरम चपात्या मिळतात.
>>
Proud

जोक्स द अपार्ट,
आमच्याकडे घरकामाला बाई आहेत, पण स्वयंपाकाला नाही. कारण मलाच मुळात घरचे सोडून बाहेरच्या कोणाच्या हातचे जेवण आवडत नाही. असतात एकेकाचे लाड म्हणा पण हे असे आहे ते आहे.

बाकी मला चपात्या बनवता येत नसल्याने मी त्या कोणाला गरम काय थंडही देऊ शकत नाही. पण चहा मात्र देतो, आणि तो चपात्यांपेक्षा जास्त गरम देतो Wink
आणि हे कधीतरी नाही तर रोजच. जवळपास चारपाच वेळा चहा होते घरातल्यांची, प्रत्येक वेळी मीच देतो. यात रोज रात्रीची कॉफीही जोडा, ती सुद्धा मीच बनवतो. माझे वर्कफ्रॉम होम चालू असताना घरचे मी कामातून ब्रेक कधी घेतोय याची वाट बघतात कारण सर्वांना माझ्याच हातची आयती गरमागरम चहा प्यायची सवय लागली आहे Happy
कधीतरीच अपवादाने असे होते की मी थकल्याने बायकोला बोलतो, चहा आज तू घे.
गंमत बघा, आजच तो अपवादाचा क्षण होता. आज दुपारपासून ईतक्या स्ट्रेसफुल मिटींग होत्या की संध्याकाळी कानाचा हेडफोन काढला आणि अक्षरशा आडवा झालो बेडवर. तिथे बायको छोट्या मुलाला चपाती भरवत होती. तिला म्हटले, दे ते ताट माझ्याकडे मी भरवतो. पण आज प्लीज चहा तू घे. माझी पाठ मोडून निघालीय आज. माझी स्थिती बघून बायकोने माझे ऐकले आणि चहा बनवायला गेली. मग मी उताणा झोपलो आणि मुलाला माझ्या पाठीवर बसवून भरूवू लागलो. जेणेकरून माझीही पाठ शेकून निघेल Happy

आता थोड्यावेळाने मी मस्त आंघोळीला जाईन. आल्यावर मग पुन्हा चहा लागेलच. तो मात्र नेहमीप्रमाणे माझाच टर्न असेल. फक्त बनवायचे कष्ट वाचतील. मगाशीच बायकोने जास्त बनवलेली ती आता सर्व्ह करावी लागेल सर्वांना.

ता क - उन्हाळा सुरू झाला की रोजचे ताक बनवायचे कामही माझ्याकडेच असते. पण ते मात्र गरमागरम नाही तर थंडच देतो Sad

पोळीचे तापमान हा मायेचा निकष असेल तर थाली रेस्टाँरंट मधला पोळीवाला मदर टेरेसाच म्हणायचा. हडळे, काहीही काय गं. 'गरम पोळीने छान पोट भरलं' पेक्षा 'सोबतच बसू गं जेवायला' हे म्हणण्यात-ऐकण्यात किती माणूसकी आहे ...... . पण आता हडळीला माणूसकी कशी समजवू - ती अनुभवावीच लागते.

जुनी कुटुंबव्यवस्थाच योग्य नव्हती का? दोघांपैकी एकाने कमवावे, आणि एकाने घर सांभाळा >>>> दुसऱ्या ठिकाणी एकीने हवे, असो टायपोच असेल असे समजतो.
>>>>

@ मानव पृथ्वीकर,
असे का वाटले दुसर्‍या ठिकाणी एकीने असेल? तो टायपोच असेल असे का समजले?

दोघांपैकी एकाने असेच लिहीले आहे ते.
यात घर सांभाळायचे काम बायकांवर टाकावे असे गृहीत धरूनच चर्चा करत असाल तर त्याला अर्थ नाही.

गम्मत बघा,
आपल्याकडे स्वयंपाकालाही मावशीच ठेवतात. घरकामाला मदतनीस म्हणून बाईच ठेवतात. कोणी बाप्या ठेवत नाही.
पण तेच ड्रायव्हर ठेवायचा असेल तर मात्र तिथे बाईवर विश्वास न दाखवता पुरुषावर दाखवतो.
प्रामाणिकपणे सांगा, घरकामे आऊट सोर्स करताना आपणही हा लिंगभेद करता की नाही?
किती जणांकडे घरकामाला आणि स्वयंपाकाला एकही बाई नसून पुरुषच कामाला आहेत. आणि कोणाची ड्रायव्हर ईथे महिला आहे?

यात कोणी चूक वा कोणी बरोबर ठरवण्यापेक्षा छान गरमागरम जेवण्यात जो आनंद आपल्याला मिळतो तो मान्य करावा हेच उत्तम असे मला वाटते...असे आपल्यावर बिंबवले गेलय.
बर्‍याचदा बाहेर/विकतचे/तयार फ्रिजमधले खाणार्‍यांना उगीचच गिल्ट असतो. न्युट्रीशनिस्टला विचारुन योग्य ते पोर्श्नस स्वतच्या सोयीने खावेत. घरच्या स्वयंपाकाच्या स्ट्रेसमुळे स्वयंपाक करणार्‍या व्यक्तीची (बायकांची) वाट लागते.
मला पाश्चिमात्य माहीत आहेत म्हणुन , मी पुर्वेकदील देशात कधी गेले नाहिये. भरपुर व्यायाम करणारे पाश्चिमात्य आपले रोलमॉडेलस असायला काहीच हरकत नाही.

ड्रायव्हर ठेवावा इतकी श्रीमंती नाही अजून त्यामुळे त्याबद्दल नाही लिहीता येणार पण मुंबईत लेडीज टॅक्सीने प्रवास केला आहे. नातेवाईकांनी ही टॅक्सी कंपनी महिला ड्रायव्हर पाठवते म्हणून सोय केली होती. भारताबाहेर उबरमध्ये तर सर्रास महिला चालक पाहिल्या आहेत. रूम घेऊन रहाणारे बॅचलर्स (मुले व मुली) अनेक वेळा पुरूष मदतनीस ठेवतात हे पाहिले आहे. कुटूंब असल्यास पुरूष मदतनीसाचे प्रमाण कमी असते हे मान्य आहे. याचे कारण झाडणे, पुसणे, सैपाक इ कामे कॉर्पोरेट लेव्हल वर केली तर अधिक पैसा मिळतो त्यामुळे पुरूष मदतनीस घरगुती कामापेक्षा असे कॉर्पोरेट काम करताना दिसतात.

'गरम पोळीने छान पोट भरलं' पेक्षा 'सोबतच बसू गं जेवायला' हे म्हणण्यात-ऐकण्यात किती माणूसकी आहे
>>>>>>
सोबतही गरम पोळ्या खाता येतातच की. म्हणजे आमच्याकडे तरी तेच होते. बायकोने वा आईने कोण किती चपात्या खाणार हे विचारून पटापट सात-आठ चपात्या करून झाल्या की सोबतच जेवतो. डब्यात एकमेकांवर एक पडल्या की वरपासून खालपर्यंत सगळ्या चपात्या अगदी गरमच राहतात. सध्या आईचा हात जरा दुखावल्याने मी तिला चपातीचे तुकडे करून देतो. तेव्हा जाणवते की चपात्या एकमेकांवर रचून तुकडे करताना अक्षरशा चटके बसतात बोटांना ईतक्या गरम असतात.

हे म्हणजे बायको चपात्या करतेय याचा अर्थ नवरा पाटावर बसलाय. बायको एकेक गरम चपाती करून आणून त्याला ताटात देतेय, आणि नवरा ढेकरवर ढेकर देत खातोय. मग नवर्‍याचे जेवण झाल्यावर बायको त्याची ताटवाटी धुवून आपले ताट बनवायला घेतेय असे चित्र का डोळ्यासमोर लगेच आणायचे. आमच्याकडे म्हणाल तर आई/बायको चपात्या झाल्यावर मला आवाज देते. मी काम थांबवून ऊठतो आणि तिघांची ताटं करायला घेतो. भाजी आधीच झाली असते. ती थंड झाली असल्यास ताटं करेपर्यंत पुन्हा गरम करायला गॅसवर ठेवतो. चपात्या गरमागरम मिळाव्यात म्हणून भाजी आधी केली जाते. आणि माझे काम कधी संपतेय त्यानुसार चपात्या करायला घेतल्या जातात.

सीमंतिनी, लेडीज टॅक्सी चालक आपण नाही ठेवत तर त्या महिला हा जॉब निवडतात. आपण घरचा ड्रायव्हर म्हणून पुरुषालाच पसंती देतो.
बॅचलर्स मुले जर पुरुष मदतनीस ठेवत असतील तर त्यामागे कारण हे की त्यांना घरकामाला बाई मिळणे कदाचित अवघड जात असेल.
अर्थात आपली चर्चाच कुटुंब व्यवस्थेवर चालू असल्याने हे बॅचलर्स आणि टॅक्सीचालक मुद्दे बाद आहेत.
किंबहुना ते आणावे लागले यातच माझ्या मुद्द्याला बळकटी येते की मी जे म्हटलेत ते खरेच अपवादाने होते.

किंबहुना तुमच्या प्रतिसादावरूना हे देखील समजते की भिन्न लिंगी व्यक्ती हे काम करण्यास सक्षम असूनही आपण घरकामाला माणसे ठेवताना हा भेद करतोच हे विशेष.

असे चित्र का डोळ्यासमोर लगेच आणायचे. >> कारण हडळीने तसं लिहीलं आहे - तव्यावरून ताटात. जर तिला तव्यावरून डब्यात/ कॅसरॉलमध्ये मग ताटात असं अपेक्षित असतं तर तसं लिहीलं असतं तिने. तशी ती एकदम रोखठोक आहे.
टॅक्सी आपण हायर करतो म्हणजे काही काळापुरता ड्रायव्हर ठेवतो. त्यामुळे काही काळ महिला ड्रायव्हर हायर करतो. पुरूष मदतनीस विश्वासाचे असल्यास कुटूंबातही हायर केले जातात. पण तशी उदाहरणे कमी आहेत कारण तो 'पिंक कॉलर' जॉब आहे. पिंक कॉलर जॉब्स सहसा कमी मोबदल्याचे असतात. तेच काम कंपनीत केले की ब्ल्यू कॉलर जॉब होतो जो अनेक पुरूष मंडळी करतात.

मला वाटले ते तव्यावरून ताटात म्हणजे अगदी ताजी गरमागरम असे दर्शवायला लिहीतात. असो, मी तरी तशीच वाचली ती पोस्ट. माझी पुढची पोस्ट तशीच लागू Happy

Pages