सॉफ्टवेअर टेस्टींग
मला( सॉफ्टवेअ) टेस्टींग शीकायचे आहे .ऑन लाईन काही साईट आहेत का अभ्यासा साटी
मला( सॉफ्टवेअ) टेस्टींग शीकायचे आहे .ऑन लाईन काही साईट आहेत का अभ्यासा साटी
मार्केट मध्ये सध्या उपलब्ध असणार्या टॅबलेट्स बद्दल इथे चर्चा (अनुभव, वैशिष्ट्ये, किमती, तुलना इ.) करूया.
घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागून आवाज आला,
“या विजयराव, चहा घेऊ.”
त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्डरच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रंगाचा टी-शर्ट अन रंगीबेरंगी बर्मुडा घालून बहुदा माझीच वाट बघत बसले होते.
मायबोली हे संकेतस्थळ कोणत्या प्रणालीवर आधारीत बनवले आहे?
मराठी मंडळ कोरियाचे अश्याच प्रकारचे संकेत-स्थळ बनवण्याचा विचार आहे,त्याकरीता संकेतस्थळ बनवणारे निष्णात तज्ज्ञ असणे गरजेचे आहे का की ज्याला थोडाफार अनुभव आहे, तोही (मर्यादीत प्रमाणात का होईना) बनवु शकेल?
अगावू धन्यवाद
मायबोलीसारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अॅटो करेक्ट, अॅटो टेक्स्ट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ऑफलाईनला पर्याय नाही. खाली दिलेली सॉफ्टवेअर वापरून मराठीत टंकलेखन करणे अगदी सुलभ आहे. हे सॉफ्टवेअर उतरवून घ्यायला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. (इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून) पण एकदा का डाऊनलोड झाले, की इन्स्टॉल मात्र काही मिनिटांत होईल.
iPhone आणि iPadवर देवनागरीत लिहीण्यासाठी हिंदी कळफलक उपलब्ध झाला आहे़ .
Settings - general - keyboard - add new keyboard
हिंदी कळफलक टाका आणि मराठीत लिहा . 
mSauda (एम-सौदा) हे इंटरनेटवर खरेदी-विक्रीच्या उलाढालीसाठीचं (ई-कॉमर्स) आणि ग्राहकांना एकत्र येण्यासाठी बनवलं गेलेलं व्यासपीठ- असं म्हणता येईल. समीर करंडे हे mSauda चे सह-संस्थापक. समीर यांना जवळजवळ १६ वर्षांचा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासोबत काम करण्याचा अनुभव आहे. सुरुवातीला 'पर्सिस्टंट सिस्टिम्स'ची 'टेलेकॉम बिझिनेस' शाखा सांभाळत होते, ज्यात संपूर्ण जगभरातून जवळजवळ १००० लोक काम करत होते. यानंतर त्यांनी 'मोबाईल आणि वायरलेस बिझिनेस युनिट'ही सांभाळून त्याची उलाढाल अनेक पटींनी वाढवली. MobiPrimo या कंपनीचेही संस्थापक तेच होते.
ऑफीसच्या लॅन व्हॅन मॅनेजरशी दोस्ती ठेवा
नाहीतर येता जाता ३ जी मधे बॅलन्स ठेवा
दोन्हीही जमले नाही तर एक ऑप्शन ठेवा
माबोला विसरून जा नि कामाशी काम ठेवा
प्रगती होईल झक्क रे
तब्येत होईल टक्क रे
ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका
माबोवर येऊन तरी नेमके काय करणार लाला ?
बाहेर विचारते कोण? इथे येऊन फ्री बोला
मानसपक्षी वेडा भडभडे रिनाभितुला
कट्ट्यावर भरते रोज उखाळ्यांची पाखळी शाळा
सुमती होईल आपली रे
सोबत होईल तुपली रे
ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका
मळमळ वाढली तर इनो नेहमी जवळ ठेवा
ऑरेंज असो अथवा लेमन त्याची चव ठेवा
नव्या डिशेसाठी पोट नेहमी साफ ठेवा
हल्ली एम. एस. ई. बी. बील भरणे ऑनलाईनच्या सुविधेने अतिशय सुलभ झाले आहे. आपण घरबसल्या एम. एस. ई. बी. बील भरु शकतो. फक्त आपल्याकडे कंझ्युमर नं आणि प्रोसेस सायकल नं आपल्या जवळ बाळगावा लागतो. www.mahadiscom.com च्या साईटवर जाउन pay your bill online च्या ऑप्शनला क्लीक केलं की कंझ्युमर नं आणि प्रोसेस सायकल नं विचारला जातो. आपल्या बीलावरच दोन्ही नं लिहीलेले असतात. बील भरण्याकरीता लांबलचक रांग लावायची गरज नाही.