उपयुक्त संगणक प्रणाली

आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 18 April, 2016 - 23:13

गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी..

HealthApps.jpg

मायक्रोसॉफ्ट विन्डोज १० - अनुभव?

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 March, 2016 - 08:45

ऑफिस संगणंकावर आम्ही Winows 7 Pro वापरतो. ऑफिशियल कामासाठी Windows 8.1 चांगले नाही वाटले म्हणुन Winows 7 हेच वापरतो (नविन संगणकांवर Windows 8.1 आलेले ते Windows 7 ला downgrade केले).

पण आता सारखा Message येत असतो, "Microsoft recommends to upgrade to Windows 10. Upgrading to Windows 10 is free for limited time."
PC Compatibility Check केली, report प्रमाणे compatible आहे.
ऑफिस मधील काही computers ची RAM 4 GB आणि काहींची 8 GB आहे.

Windows 10 चा कुणाला अनुभव आहे का? Windows 7 च्या तुलनेत ते कसे आहे?
Upgrade करावे की नाही?

शब्दखुणा: 

लिनक्स क्विकस्टार्ट - २ - जीवंत परिक्षण!

Submitted by अभि_नव on 20 March, 2016 - 02:16

इतरत्र पुर्वप्रकाशीत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 

लिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरसमज आणि वा.वि.प्र.

Submitted by अभि_नव on 15 February, 2016 - 05:46

लिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र - वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे.

आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अ‍ॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दुर राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

वझीर.. खेल खेल मे..!!

Submitted by उदय८२ on 11 January, 2016 - 08:46

खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.

बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.

शब्दखुणा: 

फ्री बेसिक्स - विरोध नोंदवण्याची मुदत ७ जानेवारी पर्यंत वाढवली.

Submitted by घायल on 29 December, 2015 - 01:44

अनेक लोक फ्री बेसिक्ससाठी आपला आवाज उठवतांना दिसत आहेत. तसे नोटीफिकेशन्स दर मिनिटाला, सेकंदाला येताहेत. जे लोक फ्री बेसिक साठीच्या मोहीमेवर क्लिक करून आपला आवाज ट्राय कडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आपण कशासाठी आवाज उठवला याची कल्पना आहे का ?

हा व्हिडीओ पहा.

https://www.facebook.com/marathimaticom/videos/10154065432884311/

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

स्क्रीन रे़कॉर्डर - संगणकाच्या पडद्यावरील कार्याचा व्हिडियो कसा घ्यावा?

Submitted by निनाद on 19 November, 2015 - 20:11

संगणकाच्या पडद्यावरील कार्याचा व्हिडियो घ्यायचा आहे.
पण तो कसा घेतला जातो याची अजिबात कल्पना नाही.
स्क्रीन कास्ट कसा घ्यावा या बाबत काही मार्गदर्शन कराल का?
कोणती प्रणाली चांगली आहे? त्यातही मुक्त आणि मोफत असेल तर उत्तम.
मला CamStudio सापडले पण मग अजून वाचल्यावर कळले की त्यात व्हायरसेस असू शकतात. म्हणून ते सोडले.
Windows Media Encoder वापरून पण असे व्हिडियो घेता येतात का? कारण हे फार जुने आहे. ते नवीन ओएस वर चालेल का असाही प्रश्न आहेच.

तुम्ही रेकॉर्ड करत असाल तर ते कसे करता?

कोण असे गुणवंत ओळखा हरी

Submitted by हेमाशेपो. on 6 November, 2015 - 09:38

आज कोण खाणीमधे तांबे खेळितो
धारपांच्या भयकथेत पत्रे लिहीतो

चौर्य इये साहीत्यिया नगरी घडवितो
वरुनि गोड दवणीय अश्रू ढाळितो

खुंटीला पंच्यासवे स्वाभिमान गं
आयडी वधता क्षणी झणी टांगितो

आमंत्रणे धाडूनिही निग्रही असे
रोज रोज चार चार क्लोन बनवितो

कोण असे गुणवंत ओळखा हरी
भस्मासूर कोण तुम्हा हात लावितो

हेमा शेखर पोतदार

तडका - कारभार ऑनलाइन

Submitted by vishal maske on 24 October, 2015 - 10:15

कारभार ऑनलाइन

कोणीही करू शकतो
कोठूनही करू शकतो
हवा असलेला व्यवहार
ऑनलाइन फिरू शकतो

नको वाटणार्‍या विलंबासह
होणारे खेटेही घटले जातील
अन् सरकारी कामं करण्यासाठी
ऑनलाइन ऑफिस थाटले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - उपयुक्त संगणक प्रणाली