उपयुक्त संगणक प्रणाली

फेसबुककडून फसवणूक होते का ?

Submitted by Kiran.. on 20 February, 2012 - 19:19

ऑर्कुटचं अकाऊंट डिलीट करून दोनेक वर्ष झाली तरी मी फेसबुक जॉईन केलं नव्हतं. मित्रांच्या एका ग्रुपने ओपन करायला लावलं म्हणून हल्लीच फेसबुक वर आलो. अकाऊंट ओपन करताना जीमेल मधले सगळे कॉण्टॅक्ट्स फेबुने वापरले. काही दिवसांनी पाहतो तो मी आपोआपच कवितांच्या काही ग्रुप्सचा मेंबर झालो होतो. माझं जीमेल अकाऊंट या सगळ्या कवितांनी भरून गेलं होतं. हे सगळे मेल डिलीट करता करता भरपूर वेळ गेला. पण पुन्हा त्याच वेगाने ते भरत गेलं.

मराठी विकीपीडिया वापरणार्‍यांकडून माहिती हवी आहे!

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 20 November, 2011 - 07:17

मुंबईत १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान पहिली विकी कॉन्फरन्स झाली त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होते. त्या निमित्ताने एक सदर करण्यासाठी ही माहिती हवी आहे -

मराठी विकीपीडिया माहीत, वापरत (रेग्युलर) असलेले मायबोलीकर आहेत का?

विकीपीडिया वापरण्यात काही अडचणी येतात का?

संपर्क करा -
मीनाक्षी कुलकर्णी

kulkarni.minakshi.r@gmail.com

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब

Submitted by जागोमोहनप्यारे on 2 June, 2011 - 01:26

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब

सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग शिकलं तर ऑन लाईन जॉब मिळू शकतात का? मध्ये मी एक अशी वेब साइट पाहिली होती. तिच्यावर घेतलेलं काम काही दिवसात पूर्ण करुन द्यायला लागायचं.

ज्याला प्रॉग्रॅमिंग माहीत नाही, त्याने शिकताना कसे आणि काय शिकावे?

नको असलेल्या 'वेब साईट्स' आता कुलुपबंद करु शकता!!!

Submitted by भ्रमर on 10 May, 2011 - 01:11

सर्वांनाच सतावत असलेली एक समस्या आंतरजालाची व्यसनाधीनता. आपल्या व्यसनाधिनतेवर आपणच काबु ठेवु शकतो हाच त्यावर उपाय आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत संगणकावर आपण नियंत्रण ठेवणे हा एक कठोर उपाय आपल्याला नाईलाजास्तव अवलंब करणे भाग पडते. तसेच फेसबुक सारख्या 'सोशल नेटवर्कींग साईट्स किंवा 'पोर्नोग्राफिक साईटस' चे व्यसन आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्या यावर काहीतरी उपाय हवा असे सर्वच सुजाण पालकांना वाटत असते. मायबोलीवर होणार्‍या अनेक चर्चांमधुन हा मुद्दा अधोरेखित होत असतो.

विडीओ रेकॉर्डिंग मधला थोडा भाग सेव्ह करून पाठवता / अपलोड करता येतो का ?

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 11 March, 2011 - 01:38

माझ्या मुलीच्या शाळेच्या स्नेह संमेलनाची सीडी मिळाल्ये, नवरा परदेशात आहे, मी सीडी मधला फक्त तिच्या नाचाचा भाग कुठे अपलोड करून त्याला पाठवू शकते का ?

ऑर्कूट ढेपाळतंय का ?

Submitted by Kiran.. on 28 December, 2010 - 12:56

ऑर्कूटवरचे बरेच जण इथं आहेत. तसंच माबोवर भेटलेल्यांचेही ओर्कूट प्रोफाईल आता माहीत होत चाललेत.
ऑर्कूटवरच्या जुन्या बॅचला मात्र आता चैतन्य हरवल्यासारखं वाटू लागलय. ब-याचशा कम्युनिटीज ओस पडल्यात. काही ठिकाणी सदस्यसंख्या घटली नसली तरी सदस्य फिरकतच नाहीत. ज्यांच्या लेखण्यांमुळं काही कम्युनिटीज नावारूपाला आल्या त्या लेखण्याही थंड पडल्यात.

प्रोफाईल व्हिजीटर्सची संख्या लक्षणीय रित्या घटलीय. वैयक्तिक स्क्रॅप्स कमी झालेत. ( नव्या ऑर्कूटमधे स्क्रॅप्स टू ऑल नावाचा प्रकार आहे जो अगदीच रद्दी वाटतो. स्पॅम वाढलेत त्याने).

यु ट्युब वरचे व्हिडीओज कसे डाउनलोड करतात??

Submitted by निमिष_सोनार on 21 December, 2010 - 06:40

यु ट्युब वर विविध विषयांवरील माहितीपर व्हिडीओ उपलब्ध असतात.
उदा: लहान मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग, नृत्य शिकवणार्‍या स्टेप्स, विविध बालगीते वगैरे.

यु ट्युब वरील व्हिडीओ आपल्या कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड कसे करतात याबद्दल कुणाला माहित असल्यास कृपया येथे सांगावे.
सर्वांना त्या माहितीचा उपयोग होईल.
धन्यवाद!

संगणकावर काम करण्यासाठी काहि ऊपयुक्त कमांड्स..

Submitted by गुंड्याभाऊ on 11 August, 2010 - 05:12

संगणकावर झटपट काम करण्यासाठी काहि रन कमांड्स देत आहे. जे कदाचित तुम्हाला ठाऊक असतील किंवा नसतील. पण जर हे वापरण्याची सवय करुन घेतलीत तर काम करायला मजा येईल.. याची खात्री.
करायचे काय तर START वर टिचकी मारा आणि RUN सिलेक्ट करा किंवा शॉर्टकट ( विंडोज कि + R)...त्यानंतर खाली दिलेल्या पैकी हवा तो कमांड टाईप करा...बस लगेच ति खिड्की तुमच्या समोर ऊघडलेली असेल......... जे कामाचे आहेत ते पाठ करा. खूप ऊपयोगी पडतील.
Windows Run Commands

Accessibility Controls---- --- access.cpl
Add Hardware Wizard------ - hdwwiz.cpl
Add/Remove Programs---- --- appwiz.cpl

शब्दखुणा: 

संगणकावर / फोनवर देवनागरी

Submitted by webmaster on 14 June, 2010 - 22:46

संगणकावरची /फोनवरची देवनागरी लिपी, युनिकोड, फाँट आणि त्या अनुषंगाने येणार्‍या इतर विषयांवरचं हितगुज.

ओपन ऑफिसमधील स्वयंसुधारणा

Submitted by shantanuo on 21 May, 2010 - 00:18

मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्‍या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे. मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा ओपन ऑफिससाठी मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.

http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi

वर दिलेल्या पत्त्यावरून acor_mr-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आणि रायटर पुन्हा चालू करा.

Pages

Subscribe to RSS - उपयुक्त संगणक प्रणाली