iPhone आणि iPadवर देवनागरी !

Submitted by अभी on 17 November, 2012 - 07:11

iPhone आणि iPadवर देवनागरीत लिहीण्यासाठी हिंदी कळफलक उपलब्ध झाला आहे़ .

Settings - general - keyboard - add new keyboard

हिंदी कळफलक टाका आणि मराठीत लिहा . Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तर आयफोन, आयपॅड च्या iOS ४.३ पासनं आहे... नविन नाही!
आता, म्हणजे iOS 5 आल्यापासून मराठीत वेळ आणि वार पण ठेवता येतात...

अभि धन्यवाद.
मला माहित नव्हते. करुन पाहते.त्यावरुन देवनागरी टाईप करणे हे बर्‍यापैकी कटकटीचे वाटते मला.

मला मराठीत टायपाचं आहे. पण. मराठी की बोर्ड नकोय. जसं मायबोलीवर लिहितो तसं .
फोनेटिक्स प्रमाणे असं म्हण्तात का त्याला?
मी आत्तापर्यंत बरहा वापरत होते. पण काही कारणाने माझा तो लॅपटॉप माझ्याजवळ नाही.
सध्या माझ्याकडे आय पॅड. आहे.
त्यावर गुगलवर जाऊन मराठी टायपायचा प्रयत्न केला. व्यवस्थित टाइप होतंय. पण ते
कुठेही सेव्ह होत नाहीये. .... उदा. वर्ड. मधे.
किंवा कॉपी पेस्ट ही होत नाहीये.......कॉपी पेस्ट काहीच अ‍ॅक्टीवेट होत. नाही.
या आयपॅड वर काही इन्स्टॉल करायला लागतं़का इनिशिअली?
़कृपया मदत करा.
अगदी समजा मायबोलीवरूनही. ऑनलाइनच टाइप केलं तरी ते इतर्त्र कुठेच सेव्ह होत नाही.

कॉपी पेस्ट करता येतं. जे टाईप केलेले आहे त्यातल्या एखाद्या शब्दावर टॅप + होल्ड करा. आधी सिलेक्श्न चा ऑप्शन येईल हवं तेवढं सिलेक्ट करून झालं की आपोआप कट, कॉपी पेस्ट चे ऑप्शन्स येतात.

दुसरा मुद्दा जरा सविस्तर सांगा...

महागुरु,
मी मराठी Editor" असे शोधून पाहिले पण नाही मिळाले.
मी "Marathi Editor" असेही शोधून पाहिले पण नाही मिळाले.

महागुरु - ह्या शिष्याला जरा उलगडून सांगाल का? माझ्याकडे आहे मराठी एडिटर पण अजून गट्टी जमली नाहिये मिनी आयपॅड आहे.

सुप्रिया जाधव, युरेका!!! सापडलं.

'ल' ची की दाबून धरली की वर काही पर्याय येतात आणी त्यात 'ळ' आहे.