विंडोज 7 काढून विंडोज XP टाकण्याबद्दल ...

Submitted by आक्या on 26 April, 2012 - 12:45

मी विंडोज 7 खूप छान , खूप छान असं ऐकलं होत म्हणून मी XP काढून विंडोज 7 इंस्टॉल केलं पण आता मला वाटतय की हे XP पेक्षा स्लो आहे . म्हणून मला आता XP टाकायचं आहे.
पण जेव्हा मी XP ची CD टाकून बूट करतो(मी आधी BIOS settings मध्ये जाऊन फर्स्ट बूटेबल device CD ROM select केला आहे) तेव्हा PC चा मॉनिटर ब्लॅक होतो आणि मग पुढं काहीच होत नाही.
Setup सुरू होतच नाही.
मग परत power off केल्याशिवाय PC परत restart होत नाही.
मला windows XP टाकायचच आहे लवकरात लवकर,
पण काय करावे ते काळात नाहीये.
प्लीज चर्चा करून उत्तर कळवावे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आक्या,

XP ची कुठली आवृत्ती आहे? SP1 असेल तर काही SATA driver (CD ROM सकट) जुने असण्याची शक्यता आहे. मी सुचवेन की विंडोज 7 ने बूट करून XP SP3 ची slipstreamed bootable CD बनवावी.

हे न जमल्यास बूटिंगच्या वेळेस F6 दाबून Factory Set Drivers चढवता येतील का ते बघू शकाल.

वरील दोन्हींचा स्रोत :
http://social.technet.microsoft.com/Forums/eu/w7itprogeneral/thread/7039...

slipstreaming tutorial : गुगलून बघितलं तर हे सापडलं
http://lifehacker.com/386526/slipstream-service-pack-3-into-your-windows...

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद पैलवान साहेब,
माझ्याकडे SP1 आहे . SP3 कसे घ्यावे(हे नेटवर फ्री मिळेल का ? मिळत असल्यास लिंक सांगावी ) आणि मी 1दा SP1 अपडेट करण्याचा म्हणजे sp3 मारण्याचा प्रयत्न केला होता पण काही तरी एरर आला होता.
विंडोज 7 ने बूट करून XP SP3 ची slipstreamed bootable CD कशी बनवावी तेही सांगा प्लीज . . . .

आक्या,

XP SP3 इथे मिळेल : http://www.microsoft.com/en-us/download/details.aspx?id=24
XP SP2 इथे मिळेल : http://www.microsoft.com/en-us/download/details.aspx?id=28

वांधा असा आहे की XP SP1 फार अस्थिर आहे. त्यामुळे त्याच्या सहाय्याने bootable CD बनवणे लाभदायी नाही (किंवा नसावे).

मला वाटतं की XP SP2 वापरून slipstreamed bootable CD बनवावी. यासंबंधी इथे माहिती उपलब्ध आहे. : http://www.winsupersite.com/article/product-review/slipstreaming-windows...

हे सर्व करतांना आपली OS Win 7 असेल. एकदा का XP SP2 ची bootable CD बनली की ती CD drive मध्ये टाकून मशीन बूट करता येईल.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै. तुम्ही वर दिलेली माहीती तशी फारच उपयुक्त आहे. मात्र XP SP2 ची सीडी वगैरे बनविणे असे द्राविडी प्राणायम करत बसायची काय गरज आहे. विकत मिळते की WXP SP2 सीडी फक्त १००/ रुपयात. ती वापरा. आणी हो ही सीडी त्याच्या KEYसह मिळते! वापरा आणि मजा करा! Happy

विजय आंग्रे,

तुमचा उपाय सर्वात ब्येष्ट! Happy मात्र त्यातून काही शिकायला मिळेल असं वाटंत नाही. बहुतेक आक्याचा तोही एक हेतू असावा!

तसेच बाजारात विकत घेतलेल्या CD त OEM Drivers नसण्याची शक्यता आहे.

आ.न.,
-गा.पै.

विजय आंग्रे ,
धन्यवाद विजय पण खरच ही CD 100 रुपयात मिळू शकते का ?
आणि कुठे ?
आणि मी नक्की XP SP3 ची CD बनउ इच्छितो thank you, गामा पैलवान !!!
पण गामाजी इथून(लिन्क वरुन) मला cd image मिळेल का आणि ती फक्त मला BURN कराची आहे का ?

आक्या,

दुर्दैवाने (SP1 फार अस्थिर असल्याने) तुम्हाला SP2 slipstreaming करून इमेज बनवून ती बर्न करावी लागेल. मी दिलेल्या दुव्यांवर केवळ SPs आहेत. फुल इमेज मिळाली तरी लायसेन्सिंग की चा लोच्या होण्याची दाट शक्यता असते.

अन्यथा विजयभाउंचा मार्ग एकदम सोयीस्कर. Happy

आ.न.,
-गा.पै.

लिनक्स वापरुन बघा. काही मदत हवी असेल तर मी करेन. लिनक्स लिगली फुकट असते आणि व्हायरसचा प्रोब्लेम नाही.
इन्स्टॊल करायला आणि वायरायला फारच सोपे आहे. नुकतेच युबुंटु लिनक्सचे लेटेस्ट व्हर्जन आले आहे. तुम्ही कार्यालायीन काम, नेट सर्फ करणे, गाणि ऐकणे, व्हिडिओ, वैगरेसाठी वापरू शकता.
आणखी माहिती हवी असल्यास मी देइन आणि या संदर्भात मला कधिही कॊल करु शकता.