आज कोण खाणीमधे तांबे खेळितो
धारपांच्या भयकथेत पत्रे लिहीतो
चौर्य इये साहीत्यिया नगरी घडवितो
वरुनि गोड दवणीय अश्रू ढाळितो
खुंटीला पंच्यासवे स्वाभिमान गं
आयडी वधता क्षणी झणी टांगितो
आमंत्रणे धाडूनिही निग्रही असे
रोज रोज चार चार क्लोन बनवितो
कोण असे गुणवंत ओळखा हरी
भस्मासूर कोण तुम्हा हात लावितो
हेमा शेखर पोतदार
कारभार ऑनलाइन
कोणीही करू शकतो
कोठूनही करू शकतो
हवा असलेला व्यवहार
ऑनलाइन फिरू शकतो
नको वाटणार्या विलंबासह
होणारे खेटेही घटले जातील
अन् सरकारी कामं करण्यासाठी
ऑनलाइन ऑफिस थाटले जातील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
ऑनलाइन
हल्ली वेग-वेगळ्या गोष्टींसाठी
ऑनलाइन महत्व वाढत आहे
कित्तेक कामांचा क्रियाकलाप
ऑनलाइन वरती नडत आहे
हव्या हव्या त्या गोष्टींसाठी
ऑनलाइन आधार घेतला जातो
तर कधी ऑनलाइन मधूनच
कुणाला गंडाही घातला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे.
तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ? नाही तर किमत काय ?
तसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का? कोणी करीत आहे का?
मी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..
मिसाइल मॅन
महासत्ताक भारतासाठी
ध्येयवादी झंझावात होता
स्वत: स्वप्न पाहता-पाहता
इतरांचे स्वप्न रंगवत होता
विद्यार्थ्यांचा प्रेरणास्रोत
अडचणींचा सामना होता
प्रत्येक-प्रत्येक ध्येयासाठी
हर्षभरित कामना होता
कित्तेक ह्रदयांची आशा होऊन
कित्तेक ह्रदयांत झिरपला आहे
कित्तेक ह्रदयांना चुरका लाऊन
आज मिसाइल मॅन हरपला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सेल्फी,...
फॅशन म्हणा,व्यसन म्हणा
सेल्फीचा वापर वाढतो आहे
लहानांपासुन थोरांपर्यंतही
सेल्फी लोकप्रिय होतो आहे
जरी काढलेल्या सेल्फीमुळे
सेल्फी काढणारा खुश असतो
तरीही मात्र प्रत्येक सेल्फी
हा केवळ सेल्फीश असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
माहिती हवी आहे.
जसे इंग्लिश चुका दुरुस्ती साठी स्पेल चेक असते तसे मराठीत ह्रस्व दीर्घ ई. व्याकरण विषयक चुका दुरुस्ती साठी काही मार्ग आहे का.(कोम्पुतेर टायपिंग करताना )
छूप्या कँमेर्याचे सत्य,..!
कुणा-कुणाच्या नैतिकतेत
नको तितकी खोट असते
त्यांच्यामुळेच माणूसकीला
पून्हा-पून्हा गाल-बोट असते
जणू अनैतिकतेच्या परामर्शाने
विचारच त्यांचे नासवलेले असतात
म्हणूनच महा-कोडगांच्या औलादींनी
कुठे छूपे कँमेरे बसवलेले असतात,..
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सन्मान,...
चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात
त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
घेरलेलं बजेट,...
बजेट जाहिर करताना
भावना म्हणे दूजी आहे
महा-बजेट वरती सुध्दा
कुठे महा-नाराजी आहे
बजेट आणि नाराजीचं
असं हे सुत्र ठरलेलं असतं
प्रत्येक-प्रत्येक बजेटला
नाराजीनं घेरलेलं असतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
१९ मार्च २०१५ दै. प्रजापत्र