उपयुक्त संगणक प्रणाली

ढिंगचिका चिक चिक

Submitted by Kiran.. on 2 October, 2012 - 07:51

ऑफीसच्या लॅन व्हॅन मॅनेजरशी दोस्ती ठेवा
नाहीतर येता जाता ३ जी मधे बॅलन्स ठेवा
दोन्हीही जमले नाही तर एक ऑप्शन ठेवा
माबोला विसरून जा नि कामाशी काम ठेवा

प्रगती होईल झक्क रे
तब्येत होईल टक्क रे

ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका

माबोवर येऊन तरी नेमके काय करणार लाला ?
बाहेर विचारते कोण? इथे येऊन फ्री बोला
मानसपक्षी वेडा भडभडे रिनाभितुला
कट्ट्यावर भरते रोज उखाळ्यांची पाखळी शाळा

सुमती होईल आपली रे
सोबत होईल तुपली रे

ढिंगचिका चिक चिक, ढिंगचिका चिका चिका

मळमळ वाढली तर इनो नेहमी जवळ ठेवा
ऑरेंज असो अथवा लेमन त्याची चव ठेवा
नव्या डिशेसाठी पोट नेहमी साफ ठेवा

एम. एस. ई. बी. बील ऑनलाईन भरणे बाबत.

Submitted by टकाटक on 23 August, 2012 - 07:43

हल्ली एम. एस. ई. बी. बील भरणे ऑनलाईनच्या सुविधेने अतिशय सुलभ झाले आहे. आपण घरबसल्या एम. एस. ई. बी. बील भरु शकतो. फक्त आपल्याकडे कंझ्युमर नं आणि प्रोसेस सायकल नं आपल्या जवळ बाळगावा लागतो. www.mahadiscom.com च्या साईटवर जाउन pay your bill online च्या ऑप्शनला क्लीक केलं की कंझ्युमर नं आणि प्रोसेस सायकल नं विचारला जातो. आपल्या बीलावरच दोन्ही नं लिहीलेले असतात. बील भरण्याकरीता लांबलचक रांग लावायची गरज नाही.

प्रांत/गाव: 

घरगुती कामासाठी चांगला प्रिंटर कोणता?

Submitted by कु. कमला सोनटक्के on 7 July, 2012 - 11:52

घरगुती कामासाठी चाम्गला प्रिंटर कोणता?

साधारणपणे १००-२०० प्रिंट दर महिना अपेक्षित आहे.

इंक जेट की टोनर.. किमती कशा असतात?

इंक जेटात फक्त काळी शाई भरून वापरता येतो का? फक्त काळी शाई रिफिल करुन प्रिंटर चालतो का?

टोनर प्रिंटरमध्ये स्वस्त मॉडेल कोणते?

डॉलर रुपया बोंबलल्यामुळे सगळी काँप्युटर मशिनरी ५००-१००० ने महाग झाली आहे. ५८०० चा टोनर प्रिंटर आता ६७०० झाला आहे.. Sad

विंडोज 7 काढून विंडोज XP टाकण्याबद्दल ...

Submitted by आक्या on 26 April, 2012 - 12:45

मी विंडोज 7 खूप छान , खूप छान असं ऐकलं होत म्हणून मी XP काढून विंडोज 7 इंस्टॉल केलं पण आता मला वाटतय की हे XP पेक्षा स्लो आहे . म्हणून मला आता XP टाकायचं आहे.
पण जेव्हा मी XP ची CD टाकून बूट करतो(मी आधी BIOS settings मध्ये जाऊन फर्स्ट बूटेबल device CD ROM select केला आहे) तेव्हा PC चा मॉनिटर ब्लॅक होतो आणि मग पुढं काहीच होत नाही.
Setup सुरू होतच नाही.
मग परत power off केल्याशिवाय PC परत restart होत नाही.
मला windows XP टाकायचच आहे लवकरात लवकर,
पण काय करावे ते काळात नाहीये.
प्लीज चर्चा करून उत्तर कळवावे.

विंडोज ७

Submitted by जागोमोहनप्यारे on 29 March, 2012 - 11:53

विंडोज ७

माझ्या पी सी वर एक्स पी होते.. तेंव्हा माझे काही सॉफ्टवेअर्स ( शेअर मार्केट बाबत) व्यवस्थीत सुरु होते... त्यावेळी .नेट ३.५ अ‍ॅडिशनली इन्स्टॉल केलेले होते.

मग विंडो करप्ट झाली.

पुन्हा एस्क पी टाकले. पण .नेट ३.५ ते काही केल्या घेत नाही आहे. ( लायसन की नॉट वॅलिड येत आहे... मग पूर्वी कसे चालले ? Happy ) त्याशिवाय ते सॉफ्टवेअर चालणार नाही.

शब्दखुणा: 

फेसबुककडून फसवणूक होते का ?

Submitted by Kiran.. on 20 February, 2012 - 19:19

ऑर्कुटचं अकाऊंट डिलीट करून दोनेक वर्ष झाली तरी मी फेसबुक जॉईन केलं नव्हतं. मित्रांच्या एका ग्रुपने ओपन करायला लावलं म्हणून हल्लीच फेसबुक वर आलो. अकाऊंट ओपन करताना जीमेल मधले सगळे कॉण्टॅक्ट्स फेबुने वापरले. काही दिवसांनी पाहतो तो मी आपोआपच कवितांच्या काही ग्रुप्सचा मेंबर झालो होतो. माझं जीमेल अकाऊंट या सगळ्या कवितांनी भरून गेलं होतं. हे सगळे मेल डिलीट करता करता भरपूर वेळ गेला. पण पुन्हा त्याच वेगाने ते भरत गेलं.

मराठी विकीपीडिया वापरणार्‍यांकडून माहिती हवी आहे!

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 20 November, 2011 - 07:17

मुंबईत १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान पहिली विकी कॉन्फरन्स झाली त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होते. त्या निमित्ताने एक सदर करण्यासाठी ही माहिती हवी आहे -

मराठी विकीपीडिया माहीत, वापरत (रेग्युलर) असलेले मायबोलीकर आहेत का?

विकीपीडिया वापरण्यात काही अडचणी येतात का?

संपर्क करा -
मीनाक्षी कुलकर्णी

kulkarni.minakshi.r@gmail.com

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब

Submitted by जागोमोहनप्यारे on 2 June, 2011 - 01:26

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब

सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग शिकलं तर ऑन लाईन जॉब मिळू शकतात का? मध्ये मी एक अशी वेब साइट पाहिली होती. तिच्यावर घेतलेलं काम काही दिवसात पूर्ण करुन द्यायला लागायचं.

ज्याला प्रॉग्रॅमिंग माहीत नाही, त्याने शिकताना कसे आणि काय शिकावे?

नको असलेल्या 'वेब साईट्स' आता कुलुपबंद करु शकता!!!

Submitted by भ्रमर on 10 May, 2011 - 01:11

सर्वांनाच सतावत असलेली एक समस्या आंतरजालाची व्यसनाधीनता. आपल्या व्यसनाधिनतेवर आपणच काबु ठेवु शकतो हाच त्यावर उपाय आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत संगणकावर आपण नियंत्रण ठेवणे हा एक कठोर उपाय आपल्याला नाईलाजास्तव अवलंब करणे भाग पडते. तसेच फेसबुक सारख्या 'सोशल नेटवर्कींग साईट्स किंवा 'पोर्नोग्राफिक साईटस' चे व्यसन आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्या यावर काहीतरी उपाय हवा असे सर्वच सुजाण पालकांना वाटत असते. मायबोलीवर होणार्‍या अनेक चर्चांमधुन हा मुद्दा अधोरेखित होत असतो.

विडीओ रेकॉर्डिंग मधला थोडा भाग सेव्ह करून पाठवता / अपलोड करता येतो का ?

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 11 March, 2011 - 01:38

माझ्या मुलीच्या शाळेच्या स्नेह संमेलनाची सीडी मिळाल्ये, नवरा परदेशात आहे, मी सीडी मधला फक्त तिच्या नाचाचा भाग कुठे अपलोड करून त्याला पाठवू शकते का ?

Pages

Subscribe to RSS - उपयुक्त संगणक प्रणाली