हर्ट यांचे रंगीबेरंगी पान

सिंगापुरातील गणपती - सन २००९ - वर्ष १५ वे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नमस्कार, सिंगापुरातील मराठी लोकांनी एकत्रीत येऊन मनोभावे यावर्षी देखील गणपतीची प्रतिष्ठापणा केली. मी गणपतीचे काही छायाचित्र इथे देतो आहे. तुम्हाला ते आवडतील अशी अपेक्षा.

OgAAAFtSIfHgeW8MKbFhzq-hbUEN22vd-eLIlfWLiYVEeQWoVXUh6raKO2qnwHZmmYhu-DvhfTcFY47UjNCEPHyWuPoAm1T1UBYko08FwsL3Jx5KocBqj4v9cRDb.jpg

ही देवासमोरची रांगोळी:

प्रकार: 

चन्नपटना चे रंग..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जिथे हल्दिराम भुजियावाला, चितळे बंधु यांच्या शाखा शहराशहरात आणि विदेशात देखील प्रसिद्धी मिळवतात तिथे धारवाडचा पेढा, बेळगावचा कुंदा आणि चन्नपटनाची खेळणी आपला विस्तात का वाढवत नाही म्हणून खंतही वाटते आणि ती वाटता वाटता असेही वाटते की खूप बाजारीकरण झाले की त्या गोष्टीचे महत्त्व पुर्वीइतके राहत नाही.

chan.jpg

विषय: 

मस्कारा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

श्रुंगार करण्याची प्रसाधनं बदलली असे वाटत असले तरी खजुराहोच्या देवळामधील कमनीय बांधा असलेली ही सुंदरी डोळ्यांना मस्कारा लावत आहे आणि तल्लीन झालेल्या रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांना भुरळ पाडत आहे...

Eye Mascara.jpg

विषय: 

संशोधनकार्यात मदत हवी आहे...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नमस्कार दोस्तहो,

प्रकार: 

रंग

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काही रंग नवे... काही तसेच जुने
जयपुरचा गुलाबी, कुरुक्षेत्राचा रक्तलाल
मुंबईचा चंदेरी, पुण्याचा गुलाली मांदार
मथुरेचा श्यामल, पंजाबचा गव्हाळ
कश्मीरचा रक्तरंजित, बंगळुरचा रेताळ
गोव्याच्या निळसर, आग्र्याचा संगमवरी
हिमालयाचा धवल, चारीधामचा धुपसिक्त
कोल्हापुरचा तांबडा, शिमल्याचा हिरवा
केरळचा शहाळी, गयेचा कषाय
खांडववनाचा धगधगता, झाशीचा वादळी
काही झाले फिके... काही झाले दाट
काळाच्या फुलपाखराला माझा सलाम!

प्रकार: 

तृष्णा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

परतीच्या वाटेवर भेटली
करकरीत तिन्हीसांजेची राणी
सोनसळली झाडी ऐकवतात
दडलेल्या पक्षांची वेल्हाळ गाणी

चारी क्षितिज ओलेओलेसे
निवांत ओघळत चाललेले
निश्चल निळ्या तळ्यात
रंग अस्मानी उतरलेले

सांजेची मिटते पापणी

प्रकार: 

पणजी विरुद्ध पणतवंड

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पणतूची लो-वेस्ट जीन्स
गुडघ्यावर फाटलेली
मागूनही फाटकेली
कमरेखाली चाललेली
गणपतीची सोंड
दंडावर गोंदलेली
भुवईत त्याच्या
भिकबाळी अडकवलेली
कानात त्याच्या
वायरी खोचलेल्या
सदरा त्याचा
नाभीपर्यंतच शिवलेला
'ही कंची बाई फॅशन'
नऊवारीतली पणजी
बुचकळ्यात पडलेली!!!

पणतीच्या केसांना
निळा-जांभळा कलप
बेलीबटनात तिच्या
डुल पीअर्सलेला
पोलक्याच्या बाह्या
गळ्यासकट कापलेल्या
करातले ब्रेसलेट्स
निसटत चाललेले
एका पायातले पैजण
नेहमीच हरवलेले
कटीभोवती विंचवाच्या
नांग्या काढलेल्या
पायतल्या वहाणा
हातभर उंचावलेल्या
'काय बाई हा ताल'
पणजी काळजीत पडलेली

पिढीपिढीतला बदल
पणजीला पहावेना

झोप

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पानांचे खोपटे अजून मिटलेले
पंखाची उब पक्षांच्या घरट्यात
उजळत आहे... उमलत आहे
निळसर चांदण्यांची अर्धपहाट

साखरझोप दाट विरघळते
शीण ओसरल्या शरीरपेल्यात
शुभ्रफुलांचा दरवळतो वारा
सारतो अलगद कश्मीरी शाल

प्रकार: 

पणजी विरुद्ध पणतवंड

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पणतूची नवीकोर जीन्स
गुडघ्यावर फाटलेली
मागूनही फाटकेली
गणपतीची सोंड
दंडावर गोंदलेली
भुवईत त्याच्या
भिकबाळी ठोकलेली
कानात त्याच्या
वायरी खोचलेल्या
सदरा त्याचा
नाभीपर्यंतच शिवलेला
'ही कंची बाई फॅशन'
नऊवारीतली पणजी

खाणे

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

काय खावे काही कळत नाही
वजन माझे वाढत नाही;
सुपं पिणार्‍यांचे कळेना
वजन कसे उतरत नाही!!!!

पाच किलोचा पिल्सबरी
पंधरा दिवस पुरत नाही
पातेलंभर डाळभाजी
चमचाभर उरत नाही!

बालपणीचे छायाचित्र
जुने मुळीच वाटत नाही;

Pages

Subscribe to RSS - हर्ट यांचे रंगीबेरंगी पान