मस्कारा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

श्रुंगार करण्याची प्रसाधनं बदलली असे वाटत असले तरी खजुराहोच्या देवळामधील कमनीय बांधा असलेली ही सुंदरी डोळ्यांना मस्कारा लावत आहे आणि तल्लीन झालेल्या रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांना भुरळ पाडत आहे...

Eye Mascara.jpg

विषय: 

अरे वा!
बी, खजुराहोला गेला होतास का? का? Proud
रच्याकने, एकच प्रकाशचित्र का टाकलेस.. अजून टाक.. आणि प्रवासवर्णन पण लिही .. Happy

ही ही शंतनू..

खजुराहो म्हंटल्यानंतर मायबोलिवरचे सर्व तरुण तुर्क इथे प्रतिसाद देतील अशी एक अपेक्षा आहे.. कलेसाठी कला म्हणून Happy

काहीतरीच काजळ हे डबीतून बोटाच्या अग्राला लावून मग ते डोळ्यात घालतात.

वैशाली तू डोळ्यात तेल घालून चित्र किंवा माहिती पहात/वाचत जा Happy

ते काजळच आहे!!!!!!!! अश्या खडूसदॄश वस्तुनं मस्करा लावला तर पापण्यांचे केस चिकटून नाही का बसणार एकमेकांना? Proud

फोटो खरच छान आहे बी. Happy

काजळ असो वा मस्करा. उगाच मस्करी करु नका. क्ष, अजून फोटो का हवेत कळतंय हं. Wink

फोटो मस्त. ते काजळच आहे असे वाटते. एवढ्या जाड वस्तूने मस्कारा लावला तर डोळे सुंदर न दिसता भूत दिसायला होईल.

काहीतरीच काजळ हे डबीतून बोटाच्या अग्राला लावून मग ते डोळ्यात घालतात.
>> जरूरी नाहिये बी. बारीक काडीने अथवा ब्रधने पण काजळ लावतात. या फोटोतली शिल्पबालिका बहुतेक सुरमा लावतेय. Happy किंवा काजल स्टिक वापरतेय.

तिचे डोळे आलेत.
>>>>>>>>.
तिचे नाही तुमचेच डोळे आलेत अस वाटतय मला. एवढ भारी चित्र बघायच सोडुन .......;)
<<<<<कलेसाठी कला म्हणून >>>>>
कलेसाठी कला नाही सर्वांसाठी कला Biggrin

बी, तुझे काजळ कसे लावतात व कुठल्य कुठल्या पद्धतीने ह्यावर ज्ञान कमी आहे रे. तुझ्या त्या खास चायनीज मैत्रीणींना कॉन्टॅक्ट करून पुन्हा मेकअप,प्रसाधनं व त्याचा वापर ह्यावर एक क्रॅश कोर्से कर. Happy
दृष्टी छान आहे हं तुझी. कलेची हं. Happy पण एकच पुतळा पाहून भान हरपले का का?
अजून नाही काढले का फोटो?

आपले माबोकर्स पण किती अरसिक आहेत ,
एवढे तिचे सुंदर डोळे आहेत , त्यांच्याविषयी कोणी बोलतच नाहीत , सगळे जण आपले त्या कांडीच्या मागे लागलेत. मस्कारा असो नाही तर लश्कारा असो , मला तर तिचे डोळे आवड्ले बुवा त्या काडीपेक्षा ...:):दिवा:

मी खजुराहोला कधीच गेलो नाही पण नक्की एकदा तरी जायचे आहे. हा फोटो मला श्री. विनायक वैद्य यांच्याकडून मिळाला.

कलेचा कडालोट (कलालोट) करु नका. म्हणजे मिळवले.
<<<कलेसाठी कला हे अगदीच कलम ३७७ वाट<<<>>>
लोकांचे विचार क.३७७ पर्यंत जाऊ लागलेत. म्हणुन म्हणतो त्याचे पुढे जाल तर त्याचा कडालोट होईल बर!
जपुन चाल जरा जपुन चाल!

मी खजुराहोला कधीच गेलो नाही पण नक्की एकदा तरी जायचे आहे. हा फोटो मला श्री. विनायक वैद्य यांच्याकडून मिळाला. >>> जाऊ पण नकोस नाही तर काहीतरी भलते सलते फोटु घेशील , ते इथं डकवशील आणि समस्त मायबोलीकरांवर बॉम्ब टाकशील.:P

हा फोटो मला श्री. विनायक वैद्य यांच्याकडून मिळाला.
>>>>>>>>>>>
ताकाला जायच आण भांड लपवायच. Wink Biggrin
हे बर नाही दिसत. Happy

मी पण, मी पण तरूण तुर्क. (उगीच प्रतिसाद दिला नाही, म्हणून म्हातारा अर्क, असे व्हायला नको. Proud )

खजूराहोचे भरपूर फोटो पाहिलेत, पण पुराणकाळात पण भमे करणार्‍या असाव्यात(च) हे आताच लक्षात आले. Happy
पण ते मस्करा, की मस्कारा? (माहिती नाही म्हणुन विचारतो आहे.)