पणजी विरुद्ध पणतवंड

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पणतूची लो-वेस्ट जीन्स
गुडघ्यावर फाटलेली
मागूनही फाटकेली
कमरेखाली चाललेली
गणपतीची सोंड
दंडावर गोंदलेली
भुवईत त्याच्या
भिकबाळी अडकवलेली
कानात त्याच्या
वायरी खोचलेल्या
सदरा त्याचा
नाभीपर्यंतच शिवलेला
'ही कंची बाई फॅशन'
नऊवारीतली पणजी
बुचकळ्यात पडलेली!!!

पणतीच्या केसांना
निळा-जांभळा कलप
बेलीबटनात तिच्या
डुल पीअर्सलेला
पोलक्याच्या बाह्या
गळ्यासकट कापलेल्या
करातले ब्रेसलेट्स
निसटत चाललेले
एका पायातले पैजण
नेहमीच हरवलेले
कटीभोवती विंचवाच्या
नांग्या काढलेल्या
पायतल्या वहाणा
हातभर उंचावलेल्या
'काय बाई हा ताल'
पणजी काळजीत पडलेली

पिढीपिढीतला बदल
पणजीला पहावेना
घरादारात तिचे
कुणी आता ऐकेना
कानांना तिच्या
जॅझ साहवेना
पणतवंडापुढे
तिला बसवेना
बिचारी पणजी
करुणा भाकते
'ने मज ने' तुझ्या घरी
देवाला रोज म्हणते!!!!

अरे बी जॅझ चांगले असते रे, तुला पॉप, रॅप किंवा रॉक म्हणायचे आहे का?
अन ते लो वेस्ट जिन्स नाही घेतलेस कवितेमध्ये. Proud

बी, कवितेतलं मला कै समजत नाही. पण ह्या आज्ज्या फार भारी असतात. नातवंडे **ली तरी कौतुकाने जवळ घेतील अशा. तेव्हा शेवटचं कडवं चुकलच जरा Happy

केदार
त्या जीन्सना शुद्ध मराठीत ए बी सी डी म्हणतात रे - अग्गो बाई च.. दिसतेय Happy

बी कैच्या कैच मस्तच...

शोनू Lol हे नवीनच कळल मला.

मला ए बी सी डी माहिती होतं पण शोनुने च नंतर तीन टिंबे का दिलीत ?

बी, लै भारी कविता! Happy बरंच बारकाईने निरिक्षण चाललय हं आजकाल! Happy

सिंडे, तीन टिंबात तुला (कवितेतलं) हवं ते बसव. (म्हणजे पणतु, पणती, पणजी, बेंबी वगैरे वगैरे)

बी, टाईमपास कविता. Happy
जोरात एकदम निरीक्षण चालले हं. मग पणजी नावावर खपवून चाललेय हां. अरे तो नैवेद्यातला बदल राहीलाच की. तू पिढी पिढीतला बदल म्हणालास म्हणून आठवण करतेय. (ह. घे.) Happy

टण्या लेका काय गोंदवून घेतलेयस नि काय ठोकून घेतलेयस .. सात्र नि काफ्का काय म्हणतील ? Lol

असाम्या, इथे मी कुठे आलो? कुणाचा पणतु म्हणुन? Proud बाकी सार्त्रे आणि काफ्काचे नाभी, डूल, गोंदणे, पोलके, पैंजण इत्यादी गोष्टींवर काय भाष्य आहे हे बघायला पाहिजे (नाही म्हणायला तो ग्रेगर साज्माचा किडा झाला होता तो त्या कटीवरल्या विंचवाचा कुणी असेल तर कल्पना नाही)

बी, तुझे फारच 'बारीक' लक्ष दिसतेय सगळीकडे आजकाल.. मेक-अप कीट बद्दल खुलासा विचारुन झाला की नाही?

मला ए बी सी डी माहिती होतं पण शोनुने च नंतर तीन टिंबे का दिलीत ?>>> Biggrin Biggrin
कविता छान आहे, पण टायटल वाचले आणी वाटले की गोवा मुक्तीसंग्राम वैगेरे वरची आहे काय कविता Wink

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

कविता छान आहे, पण टायटल वाचले आणी वाटले की गोवा मुक्तीसंग्राम वैगेरे वरची आहे काय कविता
>>>>
आणि गोव्यात पणतवंड म्हणून ठिकाण कुठे आहे रे बाबा?
बी, शेवटच कडावं सोडल्यास मला आवडली कविता. Happy

--------------
नंदिनी
--------------

लो वेस्ट जिन्स नाही घेतलेस>>>
घसरली असेल म्हणुन घेता नाही आली. Lol

बी, जोरात चालु दिसतंय पक्षीनिरीक्षण. Lol

केपी Lol
************
द्रवरुप हेलियमच्या निर्मितीतून घातलेला 'क्रायोजेनिक्स्'चा पाया व 'सुपरकंडक्टिव्हिटी' या संशोधनातून भौतिकशास्त्राला दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी - हेक ओन्न - नोबेल (१९१३)

नक्की कोण घसरली/घसरला ते आधी नमूद करा काका Proud

बाकी तुम्ही लो वेस्ट जीन्स काय घेउन बसलाय, तिकडे लंगोट घसरायला लागलेत.

लंगोट नाहीत टण्या, लंघोट. वाच बरं नीट.

बी छान रे...

केपी Happy

ए बी सी डी म्हणतात रे - अग्गो बाई च.. दिसतेय >> च नंतर टींब तिथे लंगोटाव दोन दोन कविता आहेत Lol

अख्या माबोवर लंघोट लटकले आहेत...

बी, मस्त रे Happy
कांद्या Proud
>>>अख्या माबोवर लंघोट लटकले आहेत...
आणि आतले पैलवान!!

अख्या माबोवर लंघोट लटकले आहेत...>>>

माबो म्हणजे धुणी वाळत घालायची दोरी असल्यासारखं वाटतंय.....

कविने ही कविता "पणजोबाच्या भुमिकेत" शिरुन केल्यासारखी वाटत्ये! Proud
असो, ज्याचे त्याचे विचारस्वातन्त्र्य! Happy
तेवढी "गणपतीची सोन्ड" बदलली तर(च) मग कविता चान्गली हे!
(अन्यथा त्याच सोन्डेने कविची गठडी वळावी लागेल Lol )

मला पण पहिल्यान्दा पणजी अन तिथल्याच कुठल्या दुसर्‍या गावाबद्दलची असेल कविता असे वाटले होते
वाचुन बघितले तर निघाले भलतेच

बायदिवे, ए बी सी डी म्हणजे काय?
...;

*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

ही कविता वर वर फार विनोदी वाटत असली तरी तिचा आतला गाभा एक फार केविलवाणी वस्तूस्थिती आहे. चवथी पिढी पहायला मिळणे म्हंटले तर फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रत्येक पिढीपिढीमधे जो यांत्रिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक बदल होत असतो त्यामुळे पिढीपिढीत तिढे निर्माण होतात. हे बदल पचवणे इतके काही सोपे नाही. कारण विचार करा, आपल्या पणजीला आत्ताच्या पिढीबद्दल काय वाटतं असेल? आपण तिला असे म्हणू की ती नविन पिढीला नावे ठेवते पण खरचं ते नावे ठेवणे नसते तर तिची एक आतली एक खंत असते. त्यात बरेच तिढे असतात. वय झालेली माणसे थकलीभागलेली असतात. ती तरुण पिढीपुढे काय टिकणार. मी असे अनेक वृद्ध बायामाणसे पाहिलेत की घरात त्यांची अडचण होते. ती निरुपयोगी होतात. ते outdated तही होतात. कारण त्यांच्यावेळेसचे नविन पिढीत फार असे काहीच रुजलेले नसते. मग अशा वृद्ध लोकांना शेवटी हीच करुणा भाकावी लागते की बाबारे माझे आता सर्व काही झाले आहे. काहीच मागे उरले नाही. तू मला ने.. हा शेवट करताना मलाही भरुन आले होते. पण मी वस्तूस्थितीशी बेईमानी नाही करू शकलो. म्हणून निदान एक हसरा चेहरा सर्वात शेवटच्या ओळीत टाकला.

असो.. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभारी आहे.

>>>> outdated
अरे बी, हल्लीच्या काळि आऊटडेटेड व्हायला आजी/पणजी/खापरपणजी बनायची वाट बघायला नाही लागत
स्वतःच्या पोरान्च्या पुढेच आपण बघता बघता आऊट डेटेड बनतो
स्वानुभव हे! (आमच्या बापाला आम्ही "मागास" समजत होतो, आता आमच्या पोरान्कडून आम्हि "मागास" ठरतोय)
एक खर, की एकाच पिढीत जर हे होत असेल, तर जिवन्त शिल्लक आजी/पणज्यान्च काय मातेर होत असेल?
आजुबाजुला नीट बघितले तर दिस्तेच ते!
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

(आमच्या बापाला आम्ही "मागास" समजत होतो, आता आमच्या पोरान्कडून आम्हि "मागास" ठरतोय)

>> अवघ्या दहा वर्षानी लहान असलेला मामेभाऊ आम्हाला "जुनी पिढी तले लोक तुम्ही" म्हणतो!!!

--------------
नंदिनी
--------------

बी सही लिहीलं आहेस !

शोनू , केपी, Lol Lol

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

>>आमच्या बापाला आम्ही "मागास" समजत होतो, आता आमच्या पोरान्कडून आम्हि "मागास" ठरतोय << अतिशय खरंय.. Sad

खल्लास रे भाउ लय भारि लय लय भारी बर का?