झोप

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पानांचे खोपटे अजून मिटलेले
पंखाची उब पक्षांच्या घरट्यात
उजळत आहे... उमलत आहे
निळसर चांदण्यांची अर्धपहाट

साखरझोप दाट विरघळते
शीण ओसरल्या शरीरपेल्यात
शुभ्रफुलांचा दरवळतो वारा
सारतो अलगद कश्मीरी शाल

कोरशी निज डोळ्यात साठवून
कुशीतून गुडघे हळूच निसटतात
आनंदकंदी दिवस वेचावयाला
जड पापण्यांनिशी गात्र आतूरतात.

प्रकार: 

ह्म्म्म... गोंधळलेली बाहुली
कोरक्षी म्हणजे काय ? जडावलेल्या पापण्या म्हणजे झोप येतानाची स्थिती असते ना ? कुशीतून गुडघे निसटतात म्हणजे नेमकं काय ते ही कळलं नाही ?वारा शाल सारतो - घालतो अंगावर की अंगावर असलेली शाल सरकवतो म्हणायचंय ?
किती हे प्रश्न? कोणीतरी समजावून सांगा प्लीज ...

शोनू, माझ्यामते जडावलेल्या पापण्या म्हणजे नुकतीच झोपेतून उठलेली स्थितीही. इथे बी ला ही अभिप्रेत असावी.

बी, ते 'पिस्त्यासारख्या काळोखाचं' प्रकरण काही कळलं नाही.
कोरक्षी नीज म्हणजे काय ते पण समजलं नाही.
'कुशीतून गुढघे निसटतात' म्हणजे ज्याला आपण 'फीटस पोजिझन' म्हणतो तसं कुणीतरी झोपलंय, आणि उठताना पाय सरळ करून घ्यावे लागतात असं समजायचं का?

बी, शेवटच्या ५ ओळिंमधलं काय बी कळलं नाय बॉ

कविता वाचल्याबद्दल धन्यवाद!

१) ईंग्रजीत आपण 'पिच डार्क' असे म्हणतो त्याचाच शब्दशः अनुवाद मी 'पिस्त्यासारखा काळोख' असा केला आहे.
२) वार्‍यामुळे अंगावरचे पांघरुण बाजुला सारू शकते. सारणे .. सरकवणे.. अंगावरची शाल अंगाबाहेर जाणे असा अगदी सरळ सरळ अर्थ आहे.
३) बरेचजण पाय गुडघ्यात दुमडून मग गुडघे कुशीत घेतात आणि झोपतात. झोपेतून उठताना साजजिकच कुशीतले गुडघे काढून पाय सरळ करावे लागतात.
४)"मी निशेने ग्रस्त होता तू उषा होऊन ये कोरशी प्राजक्त वेणी कुंतली खोवून ये" अशी बोरकरांची एक कविता आहे. मी कोरशी ऐवजी कोरक्षी असा शब्द लिहिला कारण माझ्या घरी आम्ही असाच त्याचा अपभ्रंश करतो.

धन्यवाद.

सायो, हो मला तोच अर्थ अभिप्रेत आहे. कित्येकदा मी डोळ्यात झोप साठवून उठतो आणि माझी सकाळची कामे उभ्याने ..अर्थात चालत चालातच झोप पुर्ण करतच होतात.

>>> ईंग्रजीत आपण 'पिच डार्क' असे म्हणतो त्याचाच शब्दशः अनुवाद मी 'पिस्त्यासारखा काळोख' असा केला आहे.

माझ्यामते चुकीचा अनुवाद आहे. मिट्ट काळोख/ काळाकुट्ट अंधार म्हणाला असतास तर गोष्ट वेगळी.

हो पण तेच तेच शब्द नकोत म्हणून खास शब्दांच्या हट्टापायी जसाच्या तसाच अनुवाद केला ...

पिच डार्क.... यातला पिच म्हणजे पिस्ता नाही रे बी! किंवा पीचचे फळ पण नाही. टार उकळल्यानंतर जे काळेकुट्ट रसायन तयार होते त्याला पिच म्हणतात. त्याच्या रंगावरून इंग्रजीत हे 'पिच डार्क' आले असावे. त्याचा पिस्त्याशी कसला संबंध?

बी pitch dark चा मराठीत अर्थ आणि भाषांतर घनदाट काळोख्/अंधार ईतकाच होइल. तु peach आणि pitch मधे गोंधळ करतो आहेस का?
pitch या शब्दाचा (एक) अर्थ :
Any of various thick, dark, sticky substances obtained from the distillation residue of coal tar, wood tar, or petroleum and used for waterproofing, roofing, caulking, and paving.
(ही माहिती www.thefreedictionary.com इथे मिळाली.)
यावरुनच घनदाट काळोख इतकाच अर्थ बरोबर वाटतो.
दुसरे म्हणजे अगदी peach dark अस जरी तू समजून पिस्त्या सारखा काळोख लिहिलेस ते कसे? पीच आणि पिस्ता ही वेगवेगळी फळे आहेत.
नवीन शब्द आणि उपमा वापरायची हौस आहे तर निदान थोडा अभ्यास का नाही करत त्यावर?

आता कोरशी शब्दाचा अर्थ तूच सांग! (नुसता बोरकरांचा दाखला देऊन भागणार नाही.) Happy

नवीन शब्द वापरायची हौस आहे तर निदान थोडा अभ्यास का नाही करत त्यावर? ) कवितेवरची चर्चा छान चालु आहे .

.....

कवितेत बदल केले आहेत.
हवाहवाई - कोरशी म्हणजे एक चतुर्थांश किंवा त्याच्यापेक्षा जरा कमी.

धन्यवाद बी. मग चंद्रकोरीशी काही संबन्ध असेल का?

बी ने केलीय ना आता कविता , किती वेळा तो बिचारा ती बदलणार ? Happy
--------------------------------------------------------------
- सक्षम दळवी

सक्षम मी बदलायला कुठे काय संगितले आहे? कोरशी शब्दाचा अर्थ त्याने सांगितला, मी ऐकला. माझ्या हाताशी मराठी शब्दकोश नाहीये म्हणून त्याला थोडी आणखी माहिती विचारली. तुम्हाला काही प्रॉब्लेम यात?

बी, असं आहे होय, अर्थ सांगितलात त्याबद्दल धन्यवाद. खरे म्हणजे मी तो शब्द कोरक्षीऐवजी चुकून कोराक्षी वाचला होता आणि चंद्रकोरीप्रमाणे रेखीव डोळे असा अर्थ घेतला, आणि ही कल्पना मला आवडली पण होती. म्हणजे बघा माझं रसग्रहण किती उच्च! :d

गजा--- Rofl

बी मला कविता छान वाटली Happy

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

कोरी सारखी, कोरजशी या अर्थाने कोरशी म्हणतोयस का तू?
मग ते जरा उलगडून सांग ना तसं. आधी कोरक्षी लिहलं होतंस त्यामुळे मी गोंधळात पडले होते.

अगदी सरळ सरळ अर्थ असा की थोडीशी झोप डोळ्यात उरलेली आहे. म्हणजे ६ तासांपैकी ५ तास झोप झाली आहे. १ तास झोप उरली आहे, ती तशीच डोळ्यात ठेवून आणि कुशीतले गुडघे काढून पाय सरळ करून.. जड पापण्यांनी (कारण अजून झोप शिल्लक आहे म्हणून) दिवसभराचा आनंद लुटायला उठायचे. झोपेची तमा न बाळगता.

बघा कळला का अर्थ.. पण मला माहिती आहे माझी प्रतिभा एकदम तोकडी आहे.

ए मला कल्पना आवडली... कारण माझ्यासाठी हे रोजचे आहे.. डोळ्यात झोप साठवून उठायचे.. Happy
फक्त मी इतकी अलगद अर्धपहाटे नाही उठत.. उन्हं पार डोळ्यांशी आली की ताडकन उठावे लागते... झोपही बिचारी खाडकन जाते.. Rofl

असो.. कवीता आवडली.. एकदा अशी सकाळ व्हायला पाहीजे..