पणजी विरुद्ध पणतवंड

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पणतूची नवीकोर जीन्स
गुडघ्यावर फाटलेली
मागूनही फाटकेली
गणपतीची सोंड
दंडावर गोंदलेली
भुवईत त्याच्या
भिकबाळी ठोकलेली
कानात त्याच्या
वायरी खोचलेल्या
सदरा त्याचा
नाभीपर्यंतच शिवलेला
'ही कंची बाई फॅशन'
नऊवारीतली पणजी
बुचकळ्यात पडलेली!!!

पणतीच्या केसांना
निळा-जांभळा कलप
नाभीत तिच्या
डुल पीअर्सलेला
पोलक्याच्या बाह्या
गळ्यासकट कापलेल्या
करातले ब्रेसलेट्स
निसटत चाललेले
एका पायातले पैजण
नेहमीच हरवलेले
कटीभोवती विंचवाच्या
नांग्या काढलेल्या
पायतल्या वहाणा
हातभर उंचावलेल्या
'काय बाई हा ताल'
पणजी काळजीत पडलेली

पिढीपिढीतला बदल
पणजीला पहावेना
घरादारात तिचे
कुणी आता ऐकेना
कानांना तिच्या
जॅझ साहवेना
पणतवंडापुढे
तिला बसवेना
बिचारी पणजी
करुणा भाकते
'ने मज ने' तुझ्या घरी
देवाला रोज म्हणते Happy