हर्ट यांचे रंगीबेरंगी पान

वर्तुळ

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्याभोवती माझ्या
नैसर्गिक मर्यादांचे
कुंपण वेढलेले आहे
त्यापलिकडे
मला माझे आकाश
विंधायचे आहे
नवे चंद्र शोधायचे आहेत!

माझ्या
सिमित स्वकेंद्रीय वर्तुळात
गुरफटून
माझा अभिमन्यू झाला आहे
ठरलेल्या चाकोरीच्या
आत आत घुटमळणारा
श्वास नकोसा झाला आहे!!!!

माझ्या अस्थिर जिवाची
अविरत अथक धडपड
सुरु असतानाच
'हे विश्वची माझे घर'
असे मला आकळते
आणि ओंजळभर चंद्र
वार्‍यावर भिरकावून
फक्त एक
स्थिर बिंदु
होऊन जावेसे वाटते आहे...

- बी

प्रकार: 

कविता महाजन अभिनंदन!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'भिन्न' सारखे नवीन काहीतरी पुस्तक वाचून मला ते पुस्तक विचार करायला प्रवृत्त करणारे वाटले. फक्त पुस्तक लिहिण हे एकवेळ सोप काम असेल पण जे लिहिल तस आयुष्य जगण हे फार अवघड काम आहे. 'भिन्न' वाचून कविता महाजनांविषयी मला फार आदर वाटायला लागला. नंतर फेसबुवकर त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांचे लेखन मला जादू सारखे संमोहित करुन टाकणारे वाटू लागले. त्यांचे शब्द आणि वाक्य अतिशय तरल असतात म्हणून पदोपदी सवड मिळाली की माझी गाडी त्यांच्या वॉलवर जाते. अलिकडे त्यांची 'कुहु' पाहिली. त्यांच्या 'कविता' त्यांचे नाव सार्थ करतात. आज वाचले...

विषय: 
प्रकार: 

कंबोडियातील 'बान्ते सराई' - एक अपुर्व शिल्पकृती

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कंबोडियातील शहर 'सियाम रिप'पासून २०-२५ कि.मी. अंतरावर 'बान्ते सराई' नावाचे एक मंदिर आहे. लाल रंगाचा दगड ज्याला ईंग्रजीत 'रेड सॅन्डस्टोन' म्हणतात; हा दगड वापरुन हे प्राचीन मंदिर दहाव्या शतकात (सन ९६७) उभारले आहे. असे म्हणतात फक्त स्त्रिच्या नाजूक बोटातूनंच कठिण पाषाणावर इतके नाजूक कोरीव काम घडू शकते! म्हणून ह्या मंदिराचे नाव 'बान्ते सराई' अर्थात 'स्त्रियांचे गाव' असे आहे. ह्या मंदिराचे मुळ नाव 'त्रिभुवनेश्वर' असे आहे कारण मंदिराच्या आतमधे शिवलिंग आहे जे मात्र आता तिथे नाही. त्या शिवलिंगाचा उल्लेख 'त्रिभुवनेश्वर' असा केला जातो. हे मंदिर 'ईश्वरपुर' गावात वसलेले आहे.

नाटककार विजय तेंडुलकर ह्यांच्यावरची एक मराठी डॉक्युमेंटरी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

नाटककार विजय तेंडुलकरांवरचा हा एक माहितीपट मला फार आवडला.
इथे पहा:

http://www.youtube.com/watch?v=Jv475KO5jfw

धन्यवाद

विषय: 
प्रकार: 

पुलंच आत्मकथन भाग - १ ते ११

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी इथे दोन चित्रफिती देत आहे फिल्म डिविजननी तयार केलेल्या आहेत. त्या अवश्य पहा:

पु लं आत्मकथन भाग - १: https://www.youtube.com/watch?v=kEwnm5f2lkY&feature=related

पु लं आत्मकथन भाग - २: https://www.youtube.com/watch?v=Ddmzhmy05ro&feature=related

पुढचे ९ भाग तुम्हाला तेथेच सहज दिसतील.

धन्यवाद

विषय: 
प्रकार: 

एक कविता

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मला आवडते
झुंजुमुंजु पहाटे होणारी
तुझ्या बांगड्यांची किणकिण
आणि निरव रात्री
झोपेत होणारा
तुझ्या पैजणांचा आवाज

मला आवडतात तुझ्या
बनारसी रेशिम साडीवरचे
जरतारी सोनेरी बुंदके
आणि राजस्थानी ओढणीचे
नरम मुलायम चंदेरी काठ!

मला आवडतो
थंडगार काळ्या फरशीवर
उमटलेला तुझ्या
चारवेढी जोडव्यांचा ओरखडा
आणि मला आवडतो
तुझ्या हनुवटीवर गोंदलेला
पाच ठिपक्यांचा डाग हिरवा!

मला आवडते
तू रंगवलेल्या मधुबनी चित्रातले
पिवळसर हिरवपोपटी रान
आणि पदराआडून दिसणार्‍या
मीरेच्या चेहर्‍यावरील उत्कट भाव!

मला आवडते
तुझ्या नाकात टोचलेल्या
बेसरबिंदीची जांभळी झाक
आणि कानात घातलेल्या

प्रकार: 

कंबोडियातील चिमुरडी मुलेचं माझ्यासाठी एक सुवेनियर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी जेंव्हा कंबोडियाला गेलो तेंव्हा पाहिले अनेक छोटी छोटी मुले आमची सुवेनियर विकत घ्या ना म्हणून सारखी पर्यटकांच्या मागेच असतात. ह्या मुलांना शाळेत न जाता बर्‍यापैकी छान ईंग्रजी येत. पण ही मुले शाळेत जात नाही. कारण दयनीय गरिबी. आपल्या वस्तू विकण्यासाठी ही मुले नाना तर्‍हेचे हावभाव करतात. मला ही मुलेच एक सुवेनिअर वाटलीत. म्हणून मी त्यांची छायाचित्रे घेतलीत. ती परत परत बघताना त्यांचीशी माझा झालेला संवाद आठवतो आणि एक चांगली आठवण म्हणून मी कंबोडियाचे आभार मानतो.

प्रकार: 

कंबोडियातील बाजार आणि गावकुस!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी कंबोडियामधे २०११ ला अंकोरची मंदिरे बघायला गेलो होतो. मी कुठल्याही नवीन ठिकाणी जेंव्हा फिरायला जातो तेंव्हा त्या त्या देशाचा भाजीबाजार, पहाटेचे जनजीवन, रात्री शहराची निरवानिरव, एखादे खेडेगाव आणि तेथील लोकांचा नित्याचा व्यवहार ह्या गोष्टी अनुभवण्याचा हौसेने प्रयत्न करतो. ह्याच माझ्या हौसेतून काढलेली काही छायाचित्रे मी तुम्हाला दाखवत आहे.

१) हा आहे पाम-गुळ. ही बाई हा गुळ झाडाच्या पानात छान गुंडाळूत आहे.

248655_1957280142311_1551964083_2070861_4152555_n.jpg

विषय: 

रंगसंगती

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

वर्तमान रंगवत असताना
एखादा हवा असलेला
रंग सापडतच नाही!
त्या सारखा
इतर कुठलाच रंग
हव्या असलेल्या
रंगसंगतीशी जुळत नाही.

अवचितच भुतकाळ
हात धरत धरत
खूप खूप मागे नेतो

तिथे भेटतात
कधीकाळी चितारलेली
वेड्यासारखी रंगवलेली
काही स्वप्ने!

फक्त त्या स्वप्नांपाशीच असतो
हवा असलेला तो रंग
पण तो मी घेणार
इतक्यात आवाज येतो
"ती तर केंव्हाच भंग झाली आहेत"

प्रकार: 

कंबोडिया आणि ईंडोनेशिया भेट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मला वाचायला जितक आवडत त्याहून कैक पटीने मनातले भाव लिहून काढायला फार फार आवडतात. मी साहित्य पाडणार्‍यातला नाही हे मला खूप चांगले माहिती आहे. त्यामुळे जग काय म्हणेल अशी तमा मला लिहिताना मुळीच नसते. आपण जे जग बघतो तेच जग अनेक जण बघत असतात पण इथे प्रत्येकाची सवेंदना वेगळी आहे. हे स्वान्तसुखाय म्हणून लिहिताना जितके मला दरवेळी जाणवते तेवढे इतर वेळी जाणवत नाही. खूप दिवसांपासून कंबोडियाबद्दल मला लिहायचे होते. काल परवाच मी ईंडोनेशिया वरुन परत आलो. मग तिथे जे काही पाहिले त्याबद्दल प्रवास वर्णन वगैरे नाही पण जे अनुभवल त्याबद्दल लिहू असे वाटायला लागले.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - हर्ट यांचे रंगीबेरंगी पान