मला भारतीय रेल्वेची एक गोष्ट अगदी लहानपणापासून आवडत आलेली आहे. ती म्हणजे त्यांना दिलेली नावे. नद्यांची नावे, ग्रंथांची नावे, इतिहासातील प्रसिद्ध घटनांची नावे, ज्यांनी देशासाठी आयुष्य वेचले अशा महान नेत्यांची नावे, कवींची नावे, लेखकांची नावे. देशातील एका गावातील लोकांना दुसर्या गावात पोचवताना रेल्वे आपल्या सोबत भाषा, संस्कृती, माणसे, धर्म, अन्नधान्य -- काय काय वाहून नेते!
मी इथे भारतीय रेल्वेवर एक कविता लिहित आहे जी अजून पुर्ण व्हायची आहे. मला वाटतं या कवितेत कडवे जमवायला मला तुमची देखील मदत मिळू शकेल. बघा प्रयत्न करुन. धन्यवाद!
पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे