चन्नपटना चे रंग..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

जिथे हल्दिराम भुजियावाला, चितळे बंधु यांच्या शाखा शहराशहरात आणि विदेशात देखील प्रसिद्धी मिळवतात तिथे धारवाडचा पेढा, बेळगावचा कुंदा आणि चन्नपटनाची खेळणी आपला विस्तात का वाढवत नाही म्हणून खंतही वाटते आणि ती वाटता वाटता असेही वाटते की खूप बाजारीकरण झाले की त्या गोष्टीचे महत्त्व पुर्वीइतके राहत नाही.

chan.jpg

माझ्या बालपणी दिवाळी जवळ आली की गांधी रोड वर पसाभर जागा शोधून कुठुन तरी दुरवरून आलेली गरीब माणसे पोत्यात मातीची सुबक आणि रंगीबेरंगी खेळणी विक्रिला ठेवत. ऐरवी माझे वडील हौसेला मोल नसते म्हणून उगीच पैसे खर्चे करायला हात आखूड करत असतं पण दिवाळी आली की आमच्या घरात ही मातीची खेळेणी दोन तीन वेळा ते आणत. माझा मातिचा रायगड, विशालगड, पन्हाळगड, चितोडगड त्या खेळण्यांसमोर एकदम फिका ओकाबोका मला वाटे. यावर तोडगा म्हणून माझा गड मी बहिणीच्या घरकुंडामधे करायला लागलो. (पुर्वी वाड्यामधे घरे असायची. वाड्याची भिंत घरासाठी संरक्षक असायची. घरकुंड हा असाच एक प्रकार विदर्भात चिकन माती वापरून दिवाळीला मुली करतात. मुलं आणि किल्ला बनवतात.) आज चन्नपटनाची खेळणी मला भेट म्हणून मिळाली आणि म्हणून हे एक प्रकाशचित्र तुमच्यासाठी टाकण्याचा मोह मला आवरला नाही. इतकी सुंदर, सुबक, कलाकुसरीत, सुशोभित, गुळगुळीत आणिक किती विशेषणं बरे!!!!!

विषय: 

ही खेळणी मातीची नाहीत. चन्नपटना हे बंगलोरपासुन ६० किमी अंतरावरील गाव असुन येथे लाकडी खेळण्यांचे कारखाने आहेत. बंगलोरहुन मैसुरला जाताना वाटेत हे गाव लागते.

बी तूला एव्हढी खेळणी कुणी व का दिली? का नेटवरचा फोटो आहे?

ही खेळणी लाकडापासून बनवलेली आहेत. मला जी खेळणी मिळालीत ती माझ्या भाच्यांसाठी मिळाली ती भांडी वगैरे आहेत. ज्या व्यक्तीनी खेळणी दिलीत त्याच व्यक्तीकडून फोटो पण मिळाला. माझे श्रेय त्यात नाही. मी फक्त इथे माहिती म्हणून हा फोटो आणि दोन ओळी खरडल्या आहेत.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

तेच तर.. कारण तिथे मस्त खेळणी मिळतात व एकाच प्रकारची खेळणी तूला देण्यात काय फायदा? मी तिथुन एक दोरी ओढली की हात पाय हलवणारा माणुस, भोवरा आणी काय काय आणले होते. Happy

खुपच छान आहेत खेळणी , मेड इन चायना घेण्यापेक्षा ही कैक पटीने चांगली आहेत.
मुख्य म्हणजे आपल्याकडे योग्य मार्केटिग होत नाही त्यामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी जगासमोर च येत नाहीत.
धन्यवाद बी.

आपल्या कडे सा'वाडीलापण मिळतात हो अशी खेळणी. आमच्या मित्राच्या मुलीसाठी आम्ही गोल गोल फिरवलं की दाणे टिपणार्‍या कोंबड्या घेतल्या होत्या.
मलाच खरंतर ते इतकं आवडलं होतं की देताना जीवावर आलं. Happy

>>आपल्या कडे सा'वाडीलापण मिळतात हो अशी खेळणी

हो. वरील खेळणी सुंदरच आहेत. पण सावंतवाडीलाही खूप आकर्षक खेळणी मिळतात. इकडे येताना आईने दोन लाकडी गाड्या आणल्या होत्या. त्या इतक्या सुबक आहेत की बोलून सोय नाही. Happy

हो हो सावंतवाडीची खेळणी ब्येष्ट. आणि एकही खिळा न वापरता करतात म्हणे.
नीरजा- ते गोल गोल कोंबड्यांच अल्टिमेट खेळणं आहे. मी शोधतेय इरासाठी.

बी मस्त विषय.

सावंवाडीची खेळणी बेस्टच. माझ्या लहानपणी अक्खी रेल्वे लाकडाची बनवलेली, मस्त रंगवलेली होती. भांडी पण सुरेख. गोव्याला गेलो मावशीकडे कि आधी तिला विचारायचो की तू खेळणी काय आणून ठेवलीस. ती मग लगेच त्या स्पेशल बाजाराच्या दिवशी खेळण्याच्या त्या भागात घेवून जायची. एवढी सुंदर खेळणी बनवतात हि लोकं पण काही विशेष मोल मिळत नाही अजूनही वाटते. ५ वर्षापुर्वी गौरीचे मुखवटे मावशीने ओळखीच्या माणसाकडून बनवून घेतला होता. त्याचा फोटो टाकते इथे. इतका सुंदर आहे....

अरे,
अशीच खेळणी मुलांना खेळायला दिली पाहिजेत.
मध्यंतरी स्वस्त चायनीज खेळण्यांवरचे रंग घातक असतात म्हणून अमेरिकेने त्यावर बंदी लादली.
भारतात मात्र चीनी खेळण्यांनी दुकाने भरून गेली आहेत. लोकांनाही त्याची सवय झाली आहे.
कुठे गेली ती आपली लाकडी बाहुली 'ठकी'
बहुधा बार्बीच्या आगमनाने नामशेष झाली असावी. Sad

मी गेले कोकणात की आणिन रैने तुझ्या इरासाठी. माझी होतेच चक्कर अधूनमधून. आता जाणारे गणपतीच्या दरम्यान मोस्टली.

या खेळण्यांना कुठेच खिळे नाही. खाचा करुन एकमेकांना चिकटवली आहेत. आणि रंग पण फळ भाज्या खोड यांचे आहेत.

ती डुगडुगणारी मान व कमर हलवणारी लाकडाच्या बाहुलीचे काय कौतूक वाटायचे. माझी ती सर्व खेळणी मी देवून टाकली. आता गेलो की आणली पाहीजे स्वतालाच. ही खेळणी इतकी क्यूट असतात ना की मोठ्याना पण घ्यावेसे वाटेल.

सुरेख आहेत खेळणी.
देशात गेल्यावर सावंतवाडीला मधे काजू, कोकम सरबताबरोबर आता ही खेळणी खरेदीही मस्ट Happy

ही फोटोतली खेळणी मुंबईत प्रदर्शनांमध्ये मिळतात. मी खुप सार्या की चेन्स घेत॑ल्यात अशा प्रकारच्या.... छान दिसतात.

अरे, बांद्र्याला रेक्लेमेशनला ( लिलावती जवळ) जी handicraft ची प्रदर्शने भरतात, त्यात असतात ही खेळणी ... मी मार्च मध्ये एका प्रदर्शनात गेले होते तेव्हाही होती. मला वाटते आता दिवाळीच्या थोडे अगोदर प्रदर्शंनांना सुरूवात होईल.

सध्या एक चालू आहे बांद्रा रिक्लेमेशनला. २४ तारखेपर्यंत आहे. मी पाहिलं नाही अजून. पेपरात वाचलय.

बंगळुरूला स्टेट हॅन्डीक्राफ्ट चे जे कावेरी दुकान एमजी रोड जवळ आहे त्या बाहेर मिळतात ही चन्नपटनाची खेळणी. पण सावंतवाडीची जास्त सुरेख असतात आणि क्रिएटिव्ह पण!

अमि, अच्छा. हे तर मला सहज शक्य होईल. रैना आताही आहे काय, या शनिवारी किंवा रविवारी बघतो.
धन्यवाद.

सावंतवाडीसारखेच सांगली-मिरजेहून जयसिंगपुरला जाताना, पुलाच्या अलीकडे (नदीच्या सांगलीच्या बाजूला) तीन-चार सुतार आहेत. तिथेही अशीच सुंदर (सावंतवाडीला जास्त सुंदर मिळतात) खेळणी वाटतात. मी मध्ये बरीच आणली होती.

Pages