खाणे

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

काय खावे काही कळत नाही
वजन माझे वाढत नाही;
सुपं पिणार्‍यांचे कळेना
वजन कसे उतरत नाही!!!!

पाच किलोचा पिल्सबरी
पंधरा दिवस पुरत नाही
पातेलंभर डाळभाजी
चमचाभर उरत नाही!

बालपणीचे छायाचित्र
जुने मुळीच वाटत नाही;
शाळेतील मित्र मात्र
ओळखायला येत नाही!!!!

मुस्तफातील काचणार्‍या बॅगा
पेलता पेलत नाही, तरी
Wet-Market मधील भाज्यांचा
मोह काही आवरत नाही!

गाठोड्यातील जुने कपडे
अंगात कधी दाटले नाही
शिंप्याच्या वहीतले माप
वीस वर्षात बदलले नाही!

ताई म्हणते चर्तुभूज हो
एका हातानी 'ती' भरवेल
दुसर्‍या हातानी तू खाशील
वेईंग मशीनचे काटे
एकदम टोकाला पोचतील!

-बी

Wet-Market मधील भाज्यांचा
मोह काही आवरत नाही! >>

ताई म्हणते चतुर्भुज हो >

बी राव. व्हा चर्तुभूज आता.

बी, अशी सिच्युएशन काशी वर्षापूर्वी होती. आता पारडं फिरलंय. Sad

रोज दोन केळी खात जा म्हणजे वजन वाढेल.

रोज सकाळी वाटीभर पन्चाम्रुत खा!!

असं वाटतंय की माझीच गोष्ट लिहीली आहे. माझं पण असंच आहे. किती प्रयत्न केले तरी वजन काही वाढत नाही. शेवटी मी कंटाळुन आता नादच सोडुन दिला आहे. वाढलं तर वाढलं, नाही तर नाही. Sad
- सुरुचि

आर्च, वजन वाढत नसलं ना की काही फॅटी खाल्लं तरी काहीही परिणाम होत नाही. तसंच वजन कमी करावं लागणार्‍यांचंही.

खरंच नशिबवान आहात बी तुम्ही, आम्ही नुसता श्वास घेतला तरीही आमचं वजन वाढतं. Sad

माझं पण असंच आहे. महत्प्रयासाने २ किलो वाढवल!! आता नाद सोडून दिला आहे...... Happy

च्च! सगळे प्वाईंट मिस करताहेत.. शेवटचं कडवं वाचा लोकहो.. Wink

बी, ताईचं ऐकतोस ना तू सगळं? Proud
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!

बी, कधी मग ? अ‍ॅ अ‍ॅ Happy
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

बी, वजन वाढणार नसेल तर 'चतुर्भुज' झालात तरी वाढणार नाहीच,स्वानुभवाने सांगतोय.
हां आता समाजातले वजन वाढवायचे असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो Proud
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

हां आता समाजातले वजन वाढवायचे असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो >>> संमाजातले वजन वाढेल म्हणजे काय वाढेलच, ए बी चा "अहो बी काका होईल"

बाकी कविता छान आहे

रोज सकाळी एक ग्लास दूध आणि दोन अडी, दिवस भर आबरगबर खात जा म्हणजे तूझे वजन वाढेल.

>>आबरगबर खात जा >> कसं किलो मिळतं म्हणे हे आबरगबर?... Proud

बी तुला वजनाची चिंता आहे का शेवटच्या कडव्याची? Wink

तुला वजनाची चिंता आहे का शेवटच्या कडव्याची? >> तुझे वजन काय रे टण्या ? Lol

बी, तुझा नक्की कुठल्या दुखाला वाचा फोडायचा प्रयत्न आहे? कारण मलाही टण्यासारखा प्रश्ण पडलाय. नक्की चतुर्भुज व्हायची चिंता आहे काय? ती चिंता सोडलीस तर वजन पटकन वाढेल. Happy
पण आयडीया चांगली आहे, इथे ही कविता लिहून , ती कविता वाचून कोणी 'ओ' द्यायची शक्यता नाकारता येत नाही. Happy

बी
छान जमलीय कविता

माझा आणी आमच्या ह्यांचा पण सेम प्रोब्लेम आहे. चतुर्भुज होवुन वर्षे झालीत केळी, तुप, आईस्र्कीम.. सगळ हादडुन पाहिल पण फरक नाही. Sad

दक्षिणा,तूला माहित नाही ते काय किलो मिळते.आगरगबर म्हणजे जे आवडत नाही ते खाणे त्याचबरोबर जे आवडते तेही खाणे.

बी... अरे इथे सगळ्यांना उलटी चिंता असते -- वजन कमी का होत नाही म्हणून ! सुखी आहेस मित्रा Happy

कायतरीच, ह्या बी चं!
हे मात्रं खरय! चतुर्भूज होच तू... 'बी' चं कधी झाड होईल कळणार पण नाय तुला Happy

'बी' चं कधी झाड होईल Lol
-----------------------------------------
सह्हीच !

'बी' चं कधी झाड होईल कळणार पण नाय तुला >> Lol भारी

'बी' चं कधी झाड होईल कळणार पण नाय तुला !! Happy Happy
झकासच ! मस्त !!!
Happy

हे भन्नाट आहे बी !

हे मात्रं खरय! चतुर्भूज होच तू... 'बी' चं कधी झाड होईल कळणार पण नाय तुला
>>>> दाद Rofl

बी! सहीच!काही खरं नाही! ...:)

Pages