हर्ट यांचे रंगीबेरंगी पान

वेळ

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

बाळा, आई होता होता
खोप्यातील मी चिऊ झाले
दोरीवरचा मी काऊ झाले
आकाशातील मी घार झाले
झाडीतला मी कोकीळ झाले
पिंजर्‍यातील मी पोपट झाले
बाळा, तुझ्यासाठी मी पक्षिण झाले..

कासवाची मी पाठ झाले
सशाचे मी कान झाले
हरिणीचे मी पाय झाले

विषय: 
प्रकार: 

जेवनाचे संगीत..

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

भुकेजल्या पोटी मी स्वैपाकघरात पाय ठेवला
तशी सगळी भांडी नाचू लागली गाऊ लागली..
परात म्हणाली, 'मला उचल अन् पिठ मळवं'
कढई म्हणाली, 'घेऊन मला कडेवर, हळूच ठेव आचेवर'
कुकर म्हणाले, 'हवा मला अंबेमोहोर, सुंगध दरवळेल घरभर'

विषय: 
प्रकार: 

आईच डोरलं..

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

लग्नात तिला पितळेचं डोरलं मिळालं. काळ्या मण्यांची पोथ आणि त्यामधे शिंपल्याच्या आकारच इवलसं डोरलं. पितळेच असूनही ती फार जपायची त्याला. स्नानाला जाताना अलगद गळ्यातून काढून पाणी लागू न देता भिंतीवर ठेवायची. हळूहळू ते चपायला लागलं म्हणून त्यात तिनी लाख भरली. मग ते कसं चपणार! अधुनमधुन चिंचेच्या वा शिकेकईच्या पाण्यानी त्याला घासून चकचकीत करायची. आईला सारखी आस होती बाबा तिला कधीतरी सोण्याच डोरलं घेऊन देतील म्हणून. पण मग इतकी अपत्य झाल्यानंतर तिने ही अपेक्षा केली नाही की तिला सोण्याच डोरलं मिळेल म्हणून. मी दुसरीत असेल, तेंव्हा बाबांना दिवाळीचा बोनस मिळाला आणि त्यांना वाटल आईसाठी डोरलं कराव.

विषय: 
प्रकार: 

गुणसुत्र

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

गुणसुत्र..

शृंगार रसाने ओतप्रोत भरलेल्या
अनेक रात्रीच्या मिलनानंतर
आपल्या प्रेमाचे फलित म्हणून
तुझा एक शुक्राणू अन्
माझा एक बिजाणू
येऊन भेटलेत परस्परांना
आणि रुजू लागले इवलूसे अंकूर
ह्या उदराच्या चिमुकल्या पिशवीत..

प्रकार: 

बालकवींचा श्रावणमास.. बारोमास..

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

मध्यावर आलेल्या शरद ऋतुच्या गुलाबी थंडीला आणि निळ्याभोर अभ्ररहीत आकाशाला खोलवर भरून आलेल्या हृदयाने निरोपाचे उसासे टाकत कसाबसा टाटा करून पहिल्यांदाच सिंगापोरला आगमन केले त्यावेळी ह्या चिमुकल्या बेटावर हिरवीकंच, पावसाने स

विषय: 
प्रकार: 

भारतीय घराचे स्फ़ुट..

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

माणसाच्या मुलभुत गरजांमधे तशा सर्वच गरजा धडपड करुनच प्राप्त होतात. अन्न वस्त्राची बरोबरी करण्या इतपत सक्षम होणार्‍या कित्येकांना घर उभे करण्यासाठी मात्र तपातूनच जावे लागते.

विषय: 
प्रकार: 

एक घर आसपास

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

जेंव्हा मला आपले एकटे राहणे अपरिहार्य आहे असे वाटले त्यावेळी मी घर बघायला सुरवात केली. होतो त्या घरात अगदी जीव गुदमरुन जात असे. शेवटी धुमसत धुमसत का होईना माझ्या मनानी घर शोधायचेच असा निर्णय घेतला.

विषय: 
प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

Pages

Subscribe to RSS - हर्ट यांचे रंगीबेरंगी पान