एच वन - बी विसा साठी कन्सल्टंट बद्दल माहिती हवी आहे
Submitted by रंगासेठ on 14 October, 2016 - 08:44
नमस्कार
मी पुढील वर्षी एच वन-बी विसा साठी अर्ज करणार आहे. मी आधी एकदाही परदेशी कामानिमित्त प्रवास केला नाही. सध्याच्या नियमांनुसार कुणीतरी स्पॉन्सर असावा लागतो जो तुम्हाला अमेरिकेत नोकरी देईल. एक मार्ग म्हणजे आपण ज्या कंपनीत काम करतोय तीच कंपनी विसा फाइल करते आणि त्याच कंपनीतर्फे अमेरिकेत काम करणे. यात विसा प्रोसेसिंगचा सगळा खर्च कंपनीच करते. उदा. Infy/TCS/Cognizant यातील कर्मचार्यांना मिळणारी संधी.
दुसरा मार्ग म्हणजे स्वतः पैसे खर्च करुन अर्ज करणे, ज्यात एक भरवशाचा कन्सल्टंट शोधणे, नंतर त्याच्या मदतीने आपल्याला तिकडे नोकरीची संधी देणारा स्पॉन्सर शोधणे असा आहे.
विषय:
शब्दखुणा: