एच वन - बी विसा साठी कन्सल्टंट बद्दल माहिती हवी आहे

Submitted by रंगासेठ on 14 October, 2016 - 08:44

नमस्कार

मी पुढील वर्षी एच वन-बी विसा साठी अर्ज करणार आहे. मी आधी एकदाही परदेशी कामानिमित्त प्रवास केला नाही. सध्याच्या नियमांनुसार कुणीतरी स्पॉन्सर असावा लागतो जो तुम्हाला अमेरिकेत नोकरी देईल. एक मार्ग म्हणजे आपण ज्या कंपनीत काम करतोय तीच कंपनी विसा फाइल करते आणि त्याच कंपनीतर्फे अमेरिकेत काम करणे. यात विसा प्रोसेसिंगचा सगळा खर्च कंपनीच करते. उदा. Infy/TCS/Cognizant यातील कर्मचार्‍यांना मिळणारी संधी.

दुसरा मार्ग म्हणजे स्वतः पैसे खर्च करुन अर्ज करणे, ज्यात एक भरवशाचा कन्सल्टंट शोधणे, नंतर त्याच्या मदतीने आपल्याला तिकडे नोकरीची संधी देणारा स्पॉन्सर शोधणे असा आहे.

मी अर्थातच दुसर्‍या मार्गाबद्दल विचारतोय. माझ्या काही सहकार्‍यांनी कन्सल्टंट तर्फे अर्ज केलाय आणि सध्या त्यांच्या विसाची प्रक्रिया सुरु आहे. पण त्या कन्सल्टंटचा अनुभव अजून बेभरवशाचाच असा आहे. तसेच या विसाला मोठे ग्लॅमर असल्याने असे अनेक कन्सल्टंट उगवलेत आणि कित्येक लोकांना फसवुणिकेचे अनुभव आलेत.

त्यामुळे मी अशा कन्सल्टंटच्या शोधात आहे जो या प्रक्रियेत पारदर्शक असेल आणि पैशाचा अपहार अथवा फसवणुक करणार नाही. जी कागदपत्रं जमा करावी लागतात त्याची पोचपावती देणं, USCIS कडून काही निर्णय अथवा माहिती आली तर ती देणं, लॉटरीत नाव आलं नाही तर जी काही रक्कम परत मिळणे अपेक्षित असते ती योग्य कालावधीत देणे इ. इ. विसा मिळणे न मिळने हे लॉटरी वर आहे त्यामुळे ती अपेक्षा कन्सल्टंट कडून नाहीच.

तर कुणी माबोकर भारतातून अशा कन्सल्टंट मार्गाने H1-B विसाप्राप्त झाला/झाली असेल तर मला मदत करा. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एच १-बी नोकरीसाठी असतो. तुम्ही अमेरिकेत नोकरीसाठी येणार असाल तर जी कंपनी नोकरी देणार आहे किंवा नोकरीसाठी अमेरिकेत पाठवणार आहे, ती एच १-बी करेल. तसं नसेल, तर तुम्ही एच १-बी कशासाठी करणार ते कळलं नाही.

हे 'कन्सलटंट्स' मार्फत एच १-बी वगैरे सगळा लबाडीचा मामला आहे. त्याच्या नादी लागू नका असा माझा सगळ्यांनाच कळकळीचा सल्ला आहे.

एच १ च्य नियमाप्रमाणे - जर एखाद्या अमेरिकेतल्या कंपनीला विशिष्ट कामासाठी स्किल्ड वर्कर तिथे न मिळाला तर एच १ व्हिसा वर बाहेरच्या देशातून स्किल्ड वर्कर आणता येतो. मुदलात कंंपनीकडे त्या माणसासाठी काम/ जॉब अस्तित्वात नसेल तर नुस्तेच व्हिसा करणे कायदेशीर नाही. तरीही बर्‍याच देसी कन्सल्टिंग फर्म्स नियम धाब्यावर बसवून हे उद्योग करतात. व्हिसा करून अमेरिकेत आणायचे आणि मग त्या माणसाला प्लेस करायचे - पण हे इल्लीगल आहे.

दुसरा मार्ग कदाचित डाईस, इन्डिड वरून जॉबला अप्लाय करणे, मुलाखत वगैरे झाली तर एचवन हवा आहे हे सांगणे . मग त्या कंपनीला तुम्ही योग्य उमेदवार वाटलात तर ती एचवन स्पॉन्सर करेल हा एक जरा अवघड मार्ग आहे कदाचित.

बेस्ट वे कॅनडासाठी अप्लाय करा , मायबोलीवर कॅनडाचे काहीजण आहेत ते अधिक माहिती देऊ शकतील , वीजा / PR मिळणं अमेरिकेपेक्षा बरचं सोपं आहे म्हणे . खखोकॅजा.

>>दुसरा मार्ग कदाचित डाईस, इन्डिड वरून जॉबला अप्लाय करणे, मुलाखत वगैरे झाली तर एचवन हवा आहे हे सांगणे ..मग त्या कंपनीला तुम्ही योग्य उमेदवार वाटलात तर ती एचवन स्पॉन्सर करेल हा एक जरा अवघड मार्ग आहे कदाचित.

हा मार्ग मी वापरला होता २ वर्षांपूर्वी. माझ्या क्षेत्रात अमेरिकेत खूप चांगल्या पोझिशन्स असतात.. पण एच१ ची प्रोसेस बेभरवशाची, आणि लांबलचक (लॉटरी लागली तरी इंटरव्ह्यू ते जॉइनिंग मधे दहाएक महिन्यांचा काळ), त्यामुळे बर्‍याच कंपन्या बाहेरचे लोक घेण्यास फारश्या उत्सुक नसतात. तरी मला एका कंपनीत मिळाला जॉब, पण आपल्याला लॉटरी कुठली आलीय लागायला Happy (आणि अमेरिकेबाहेरुन उच्चशिक्षण घेतलं असेल तर ते एच१ च्या advanced degree lot मधे धरत नाहीत!)

मी कॅनडा म्हणणार होतो पण अमेरिका विचारलं आणि कॅनडाची माहिती दिली की लोकं घालून पाडून बोलतात हो, Wink Proud

व्हिसा करून अमेरिकेत आणायचे आणि मग त्या माणसाला प्लेस करायचे - पण हे इल्लीगल आहे.>> पण अशी खोऱ्याने माणसं आहेत ना? काही गोंधळ झाला तर लीगल कॉन्सिक्वेन्सेस एम्प्लोयरला होतील का एम्प्लोयी ला? अर्थात येणाऱ्या माणसाला लगोलग बाहेर जावं लागणं हा ही मोठा धोका असतोच म्हणा.

अमित Lol

बरोबर आहे अमित. ती पद्धत चुकीची नाहीये पण मैत्रेयी म्हणत आहे त्याप्रमाणे बरीच एम्प्लॉयर्स त्याचा गैरफायदा घेऊन कमी पगारात नोकर्‍या लावून देतात. ते इल्लिग आहे. आणि परत तू म्हणत आहेस तसं एम्प्लोयर सहसा गोत्यात येऊ शकतो पण मग एम्प्लॉयीची पण अडचण होऊ शकते.

>>हे 'कन्सलटंट्स' मार्फत एच १-बी वगैरे सगळा लबाडीचा मामला आहे. त्याच्या नादी लागू नका असा माझा सगळ्यांनाच कळकळीचा सल्ला आहे.>> १००% अनुमोदन.
पाहण्यात आलेल्या टिपिकल केसेस म्हणजे, कन्सल्टन्टस बायोडाटा मधे वाट्टेल ते लिहुन खोटी नोकरी दाखवतात, जुगाड करून व्हिसा जमवतात. आणि मग अमेरिकेत आल्यावर अशा दोन तीन जणांना एकत्र एका अपार्टमेंट मधे रहायची सोय करून देतात आणि खरी नोकरी मिळेपर्यंत बसवून ठेवतात. पगार म्हणून थोडे पैसे देतात आणि त्यातलेच वर खर्चासाठी / फी म्हणून कापून घेतात. मग जी "खरी" नोकरी मिळते त्यासाठी स्कील्स काहीच्या काही वाढवून सांगितली असल्यामुळे त्या अपेक्षा पूर्ण करताना वाट लागते आणी बर्‍याचदा कन्सल्ट्न्टला पगारातला "कट" द्यावा लागतो. तेव्हा कन्सल्टन्टस पासून सावधान. मध्यंतरी अश्या काही कन्सल्टींग कंपन्यांचे ऑडीट करून खरे स्वरूप बाहेर आल्यावर लोकांना डीपोर्ट केल्याची बातमी वाचली होती. USCIS चे ह्या बाबतचे नियम खुपच कडक झाले आहेत आणि कसून चौकशी होते आहे.
तेव्हा TCS / Infy सारख्या कंपनीतून खरी नोकरी मिळवूनच या. किंवा बॅग्झ ह्यांनी केल्याप्रमाणे अमेरिकेतील कंपनीत थेट अप्लाय करून नोकरी मिळवायचा प्रयत्न करा.

आणि हो अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार असेल तर सद्ध्या ग्रीन कार्ड मिळायला १५-२० वर्ष लागत आहेत हे ध्यानात ठेवा. (शुन्यातूनच सुरुवात करायची असेल तर त्यापेक्षा कॅनडा, जर्मडा, सिंगापूर जास्त चांगले हे माझ वैयक्तिक मत आहे)

आणखी एक. कॅनडा किंवा इतर देशातून कालांतराने ट्रीटी मार्फत अमेरिकेत काम करायचं असेल तरी ग्रीन कार्ड स्टेजला जायला एच १ हाच मार्ग आहे आणि ती रांग जन्म झालेल्या देशाप्रमाणे लागते. नागरिकत्त्व असलेल्या देशाप्रमाणे नाही.

चौकट राजाने लिहिलेल्या केसेस माझ्याही पहाण्यात आहेत. कंपन्यांनी २ किंवा ३ बेडरूम अपार्टमेन्ट्स रेन्ट ने घेऊन ठेवणे, नंतर त्यात ८ , १० कितीही लोकांना ठेवणे. खोटे रेस्युमे, खोटा पगार . असंख्य भानगडी करतात या कंपन्या.

अमेरिकेत नोकरीला जायचं असेल तर खालील ऑफिशिअल मार्ग आहेतः
(to the best of my knowledge :D)

१. आधी तिकडे शिकायला (PG) जायचं. मग काहीतरी OPT वगैरे असताना नोकरी करता येते आणि मग एच१ ला अर्ज करता येतो (Advanced degree lot). मला नक्की प्रोसेस माहीत नाही. (मला एका रिक्रुटरने "एक पीएच्.डी. झालीय, पण ती भारतातून, मग आता तू अमेरिकेत येऊन अजून एक पीएच्.डी. कर.. मग आम्ही तुला consider करू" असा मोलाचा सल्ला दिला होता! खरं सांगतेय.)
२. अमेरिकन कंपनीत नोकरी + एच१ मिळवणे.
३. एल२
४. एच४ आणि मग काही नियमांअंतर्गत EAD
५. अमेरिकन कंपनीच्या अमेरिकेबाहेरील ऑफिसात १+ वर्ष नोकरी नि मग एल१
६. ओ१ म्हणून पण एक विसा असतो
७. अमेरिकन नागरिकाशी लग्न (त्यात पण काय नियम आहेत माहीत नाही)
आणखी काही लीगल मार्ग असतील तर मला माहीत नाहीत.

मी असे बरेच भारतीय (दक्षिण) पहिलेत ज्यानी तुम्ही सांगितलेल्या मार्गाने (२) प्रवेश केलाय आणि आता चांगला जम बसलाय त्यांचा. माझा एक माजी रुम्मेट १-२ वर्षापुर्वी असाच कंसल्टंसी कडून आलेला.

डायरेक्ट स्पॉन्सर मिळणे थोडे अवघड आहे. रिस्क घेणारच असालतर २रा मार्ग सोपा आहे.

The Truth:
जर लाँग-टर्म राहाय्चा प्लान असेल तर, किमान १ वर्षाचा managerial अनुभव घेउन या. त्यासाठी ४-५ वर्षे वाट पाहावी लागली तरी चालतील.

"रिस्क घेणारच असाल" - रिस्क?? बेकायदेशीर आहे ते. निदान पब्लिक प्लॅटफॉर्म वर तरी त्याची भलामण करू नका.

धन्यवाद सर्वांना. Happy
उशिरा प्रतिसादाबद्द्ल क्षमस्व. कॅनडा पीआर आणि डाइस चे पर्याय पण पाहतो. नाहीतर इथला एम्प्लॉयरच बदलून पाहतो. Happy सेटल होण्याचा विचार नाही, आणि आता उच्चशिक्षणासाठी नोकरी सोडणं पण शक्य नाही.