झुक्याचं कुठून डोकं चाललं आणि त्यानं फेसबुक तयार केलं देव जाणे!
लिफ्ट मध्ये असताना आपला मजला यायचाय का? काढ फेसबुक, बोलता बोलता मित्राला फोन आला, काढ फेसबुक. हॉटेल मध्ये जेवण यायचंय का? काढ फेसबुक. सकाळी विधींना जाताना - काढ फेसबुक...
बघावं तिथे जो तो फेसबुक वर. प्रत्येकाला मोहात पाडण्यासारखं आहे तरी काय ह्या फेसबुक मध्ये?
हे विश्वनिर्मात्या,
वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या
उंच शिखरावर पोहोचून
वैयक्तिक स्वातंत्र्याचा असीम श्वास घेत
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संज्ञाप्रवाह रक्तात मिसळून
ताशी हजारो प्रकाशवर्षे वेगाने वाहत
निघालो आहोत आम्ही
आमच्या जन्मस्थळाकडे...
होत चाललो आहोत आदिम...
हा असुरी वेग
आवेगाने
करतोय नामशेष
आम्ही स्वाभिमानाने उत्क्रांत केलेली
यच्चयावत आदमखोर संस्कृती
तिच्या धार्मिक परिप्रेक्ष्यांसह...
आणि मला दिसतंय लख्खपणे
की
या भूतलावर लवकरच
होईल प्रचंड तंत्रोद्भव तांडव
मायक्रोसॉफ्ट विण्डोज् सेव्हन ६४ बिट (Windows 7 64 Bit) ऑपरेटिंग सिस्टीम सध्या वापरत आहे. त्यावर सर्विस पॅक १ इन्स्टॉल कसा करावा?
नेटवर शोधाशोध करुन खालील तीन फाईल्स डाऊनलोड केल्या पण त्यापैकी कुठलीच रन होत नाही.
windows6.1-KB976932-X64
Windows6.1-KB947821-v34-x64
windows6.1-KB976932-X86
त्याकरिता नेटवरील कुठल्या साईटवरुन कोणत्या फाईल्स डाऊनलोड करुन घ्याव्यात?
तसे केल्यास स्पीड वाढेल का? लायब्ररीतील (माय डॉक / माय व्हिडीओ / माय म्युझिक) फाईल्स आणि फेवरिट्स / बुकमार्क्स इत्यादी डिलीट होतील का?
आर्किमिडीजचं नाव घेतलं की बहुतेकांना त्याचा शोध नक्की काय होता ते भले सांगता येणार नाही पण तो नग्नावस्थेत युरेका! युरेका! (खरा उच्चार युरिका आहे म्हणे) ओरडत रस्त्यातून पळाला होता हे डोळ्यासमोर नक्की येईल! पाठ्यपुस्तकं रंजक करण्यासाठी ज्या गोष्टी घालतात नेमक्या त्याच जन्मभर लक्षात रहातात. असो! आर्किमिडीजने बरीच उपयुक्त यंत्रं बनविली त्यातलंच एक आर्किमिडीजचा स्क्रू आहे!
एक रास्त शंका :
फिंगरप्रिंट सेन्सर वापरून आपण आपला मोबाईल अनलॉक करतो ...
म्हणजे तो फिंगरप्रिंटचा डिजिटल डाटा मोबाईलमध्ये सेव्ह असतो ...
चायनीज सर्व्हर्स कडून हा डाटा हॅक झाला तर... ( जे की सहज शक्य आहे कारण बहुतांश भारतीय चायनीज मोबाईल वापरतात व त्यांचा क्लाऊड स्टोरेज चीनमध्ये आहे .)
अशा परिस्थितीत आपल्या इतर माहितीसह सेन्सिटिव्ह असा फिंगरप्रिंट डाटा आपण चायनीज मोबाईल कंपन्याच्या ताब्यात देत आहोत . समजा एखाद्या व्यक्तीचा आधार नंबर या चायनीज हॅकर्स ना मिळाला व सोबत त्याचा फिंगरप्रिंट डाटा ही मिळाला तर ?
आपली ऑनलाईन सुरक्षा आपणच धोक्यात आणत आहोत का ?
इंटरनेट वर टाईमपास सॉफ्टवेअर्स मधे बराच वेळ घालवला . नवरा आणि बायको दोघांचेही फोटो दिले की त्यांचे होणारे बाळ कसे दिसेल ? बायकोच्या जागी सेलेब्रिटीजचे फोटो टाकून पाहीले. दोघांच्या चेह-यासारखा एक तिसराच चेहरा बनायचा.
अजून एक सापडले त्यात नवरा किंवा बायको, दोघांपैकी एकाचेही चित्र दिले तरी चालायचे (लग्न न झालेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त). ज्यांचे बाळ ऑलरेडी आहे त्यांचे बाळ मोठे झाल्यावर कसे दिसेल असे एक सॉफ्टवेअर होते. तर बाळाचा आणि बाबाचा / आईचा फोटो देऊन मोठेपणी ते कसे दिसेल असेही एक सॉफ्टवेअर होते.
ईपुस्तके आणि मराठी साहित्य
हल्ली बरीचशी मराठी पुस्तके विशेषत: प्रसिध्द कादंबर्या PDF स्वरुपात व्हॉटसअॅपवरुन फिरत आहेत. याबद्दलच थोडी माहिती हवी आहे.या संदर्भाने खालील माहिती मिळाल्यास सर्वांनाच उपयोग होईल.
१) अशा प्रकारे दुसर्या व्यक्तीने लिहिलेल्या किंवा ते पुस्तक छापणार्या प्रकाशन संस्थेच्या परवानगीशिवाय त्या पुस्तकांच्या PDF फाईल्स बनवणं आणि वितरित करणं हा गुन्हा आहे का?
२) समजा ठराविक लोकसंख्येला अशी PDF फाईल पाठवणं हा गुन्हा नसेल तर ती संख्या किती?
३) ही मर्यादा अोलांडल्यास भारतीय कायद्यान्वये काय शिक्षा होऊ शकते?
टेलिग्राम या अॅप वर विविध माहितीपूर्ण खजिन्याने भरलेले ग्रूप्स व चॅनल्स असतात . त्यात विविध विषयांवर माहिती व चर्चा होत असते .
विविध विषयाना वाहिलेल्या ग्रूप्स च्या लिन्क्स बद्दल इथे चर्चा केल्यास आभारी राहीन . विषेशतः आध्यात्मिक साधना व मेडिकल अॅड्व्हाईस इत्यादि