तंत्रज्ञान

डिजिटल भारतासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन

Submitted by अभिकल्प on 28 January, 2018 - 11:23

गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत.

तुम्ही कोणत्या ऑनलाईन सर्विसेस वापरता?

Submitted by योकु on 23 January, 2018 - 13:55

आजकाल आपण सगळेच भरपूर इंटरनेट वापरतो. त्यानुषंगानी वेगवेगळ्या ऑनलाईन सर्वीसेसही वापरतो, उदा. नेटफ्लिक्स. तर त्याबद्दलच्या चर्चेकरता हा धागा.
- कुठल्या सर्वीसेस तुम्ही वापरता?
- का? काय चांगलं वाटलं
- एखादी सर्वीस का सोडली/अन-सबस्क्राईब केली?

शब्दखुणा: 

ब्लेड

Submitted by आंबट गोड on 3 January, 2018 - 02:55

आय ए एस च्या इंटरव्ह्यू मधे विचारलेला एक प्रश्न :
दाढीच्या ब्लेड चे डिझाईन विशिष्ट पद्धतीचे - नागमोडीच का असते? काही विशेष कारण ?
मला तरी याचे समाधान कारक उत्तर माहिती नाही म्हणून मायबोली करांना विचारत आहे.

blade.jpg

ही मधली वेलबुट्टी अशीच का असते? साधी स्लिट चालली असती किंवा /आणि मधे फक्त एक होल ज्यात रेझर फिट होईल.

डिजिटल डिटॉक्स

Submitted by मी_किशोरी on 19 December, 2017 - 00:13

सरत्या वर्षाला गुडबाय म्हणून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्वचजण सज्ज झालो आहोत. नवीन वर्षात प्रवेश करताना आपण नेहमीच जग कसं आधीपेक्षा जास्त आधुनिक, प्रगत झालं, आपल्या वैयक्तिक आयुष्यात वर्षभरात काय गोष्टी घडल्या, किती प्रगती झाली इ. गोष्टींचा आढावा घेतो. उद्यम जगताच्या अशा आढाव्यामध्ये ज्या गोष्टींनी सगळ्यात जास्त इम्पॅक्ट-परिणाम घडवला अश्या गोष्टी बघितल्या तर नक्कीच पहिल्या तीन गोष्टींपैकी एक असेल ती म्हणजे टेक्नॉलॉजी .

२०१८ मधिल टॉप १० स्ट्रॅटेजीक टेक्नॉलॉजी ट्रेंड्स

Submitted by मी_किशोरी on 19 December, 2017 - 00:03

गार्टनर इंक. ही एक अमेरिका स्थित जगातील अग्रगण्य संशोधन व सल्लागार संस्था आहे. ही संस्था इन्फरमेशन टेक्नॉलॉजी संबंधित विविध नवनवीन प्रकारचे येणारे तंत्रज्ञान, कुठल्या तंत्रज्ञानाचा किती प्रमाणात वापर होतो, त्यामुळे उद्योग जगाला तसेच जनसामान्यांना काय फायदे आणि तोटे होतात, कुठल्या संस्था त्यावर कशा प्रकारे काम करत आहेत या सर्व गोष्टींचा खोलवर अभ्यास करते. सर्व माहितीचे विश्लेषण करून, मिळणाऱ्या इन्साईट्स - अंतर्ज्ञान उद्योग व व्यवसाय जगताला पुरवत असते. प्रमुख आय. टी. कंपन्या या माहितीचा उपयोग त्यांच्या पुढील काळातील तंत्रविषयक स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी नियमितपणे करत असतात.

रुंबा

Submitted by विद्या भुतकर on 30 November, 2017 - 23:33

काल आमच्या घरी एक नवीन मशीन आलं, iROBOT Roomba. गेल्या दोनेक वर्षांपासून ऐकलं होतं आणि लोकांकडे पाहिलंही होतं. खरं सांगायचं तर कॉलेजपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा माझा आवडता विषय. माणसाचा मेंदू एका सेकंदात किती विचार करतो आणि किती निर्णय घेतो याचा अंदाज AI शिकताना येतो. समजा, तुम्ही गाडी घेऊन एका चौकात उभे आहात, आता तुमचा ग्रीन सिग्नल लागणार पुढच्या पाच सेकंदांत, समोरच्या बाजूचे लोक अजूनही जात आहेतच, शेजारी उभा राहिलेला गाडीवाला नुसता पेटलाय कधी एकदा रस्ता पार करतोय यासाठी, तुम्ही त्याच्याकडे, त्याच्या मागे असलेल्या मुलीकडे, समोर उभ्या असलेल्या काकूंकडे बघता.

सूत्रावकाश

Submitted by नरेंद्र गोळे on 22 November, 2017 - 06:24

’सूत्रावकाश’ म्हणजे ’आभासी वास्तवाचे अवकाश’.

उद्या,
५ वी जागतीक ’सूत्रावकाश’ परिषद दिल्लीत सुरू होत आहे.
India to Host 5th Global Conference on Cyber Space (GCCS- 2017)

तुमच्याच संगणकावरुन परग्रहवासीय शोधा!

Submitted by अभि_नव on 17 September, 2017 - 04:51

आजकाल प्रत्येकाकडे एकतरी लॅपटॉप / डेस्क्टॉप संगणक असतोच. आपण काही आपले संगणक २४ तास वापरत नाही. आपल्या वयक्तीक संगणकाच्या याच रिकाम्या (Idle) वेळेचा वापर करुन आपण काही संशोधन किंवा समाजोपयोगी कामं करु शकतो. यासाठी आपल्याला आपल्या संगणकाचा रिकामा वेळ व त्याची गणक शक्ती ( Computing Power) याचे एक स्वयंसेवक म्हणून योगदान द्यायचे आहे. त्यातले परग्रहवासीय शोधण्याचे काम कसे करावे ते या लेखात बघु. या व्यतिरिक्त इतर कोणत्या संशोधन कामाला तुमचा रिकामा संगणक वापरता येईल त्याची यादी लेखाच्या शेवटी दिली आहे.

Pages

Subscribe to RSS - तंत्रज्ञान