Submitted by am_Ruta on 12 June, 2020 - 18:23
जुना सारीपाट आता रंगवून पुन्हा डाव मांडलाय,
साऱ्याचाच कसा हल्ली दिखावा झालाय...
मांगल्याचे प्रतिक ठरणारी दारातली रांगोळीही
करू लागलीय वेब सफर,
like dislike ची चढाओढ करत मिरवू लागलीये स्टेटस...
आज काल आंब्याच्या तोरणालाही अगदी मिळू लागलेत करोडो shares,
कौटुंबिक सोहळयांना येऊ लागलये फॉरेन संस्कृतीची लहर...
आतुकली भातुकली जाऊन kitchen सेट आलाय,
भावला भावलीच्या लग्नाचा गोडवा जाऊन लिविंग चा ट्रेंड आलाय...
डोळे लुकलूकणाऱ्या बाहुल्यांचा केव्हाच झाला makeover,
बार्बी आणि diseny princes ने त्यांना केलं केव्हाच गारद...
मैदान जाऊन टोलगंज राक्षस उभारले जातात,
मात्र प्ले स्टेशन वर मैदानी खेळ खेळून मेडल्स जिंकले जातात...
थोडं का होईना पुन्हा थोडं जगुया,
आपल्यातला यांत्रिकतेला माणुसकीने बदलवूया....
- am_Ruta
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात हे..छानच
क्या बात हे..छानच
काळानुसार झालेला आपला (अ
काळानुसार झालेला आपला (अ)विकास अचुक टिपलाय! पुलेप्र!
I m ruta
I m ruta
आपल्या कवितेवरून आपण आधुनिक कवी आहात!
बदलत्या परिस्थितीशी अनुषंगिक आहे!
पण कवितेमध्ये थोड यमक जुळवत चला!
पुढील कव्यासाठी शुभेच्छा!
वा, मस्त
वा, मस्त
@चंद्रमा प्रयत्न नक्की करेन,
@चंद्रमा प्रयत्न नक्की करेन, पण काही वेळेस यमक जुळण्यापेक्षा त्या मांडलेल्या वाक्यांचा अर्थ बदलू नये इतकाच विचार असतो मनात कविता करताना...
अक्षरीवलंय, मन्या, तेजो
अक्षरीवलंय, मन्या, तेजो धन्यवाद!!!