मोबाईलमधील डेटा क्लिअर कसा करावा?

Submitted by वेलांटी on 16 July, 2020 - 07:00

माझ्याकडे तीनचार वर्षे जुना सॅमसंग गॅलक्सी ऑनफाईव्ह आहे. मोबाईलमधे स्टोरेज स्पेस कमी आहे. मेमरी कार्डमधेच सर्व डेटा मी सेव्ह करते. मात्र internal storage अतिशय कमी राहिले आहे. एकही नविन अॅप किंवा मोठी फाईल डाऊनलोड होत नाही. Settings-->storage--> अशा पाथने गेल्यास कॅश डेटा आणि miscellaneous असे दोन टाईप्स दिसतात. त्यापैकी कॅश मेमरी डिलिट करता येत आहे आणि नंतर स्पेस वाढलेलीही दिसतेय. मात्र miscellaneous या ऑप्शनपुढे जवळपास 1 GB डेटा use केल्याचे दिसतेय मात्र त्यावर क्लिक केल्यास आतमधे एकही फाईल दिसत नाही. त्यामुळे काही डिलिट करताच येत नाही. याशिवाय हा miscellaneous चा used space दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि मोबाईलची internal memory space कमी होत आहे. हा miscellaneous चा डेटा क्लिअर कसा करावा? आणि मुळात ही miscellaneous memory काय असते कुणी सांगू शकेल काय?
(राॅकेट क्लिनर वगैरे अॅपही वापरून पाहिले पण क्लिअर होत नाही.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Miscellaneous/temporary files म्हणजे कधीकधी apps नी तयार केलेले विडिओ, ओडिओ असतात ते काढले, apps काढली तरी मेमरीत कॉपी ठेवतात. फोन एखाद्या संगणकाला जोडून त्यातल्या फाइल्स पाहून काढता येतात अशी माहिती कळली. ( माझ्या नोकियाच्या इनफोमध्ये लिहिलं आहे. "To remove these files, connect to a computer.") नोकिया ६३०. Storage >> temporary files >> ४५० mb. >>The file types which are unsupported • To remove connect to a computer.
जाणकारांनी मत द्या.

फोन प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही, पण तुम्ही जे सांगताय त्यावरून दोन शक्यता वाटताहेत:
१. Miscellaneous मध्ये लपवलेल्या (hidden) फाईल असू शकतात.
२. Miscellaneous मधून पूर्वी कधीतरी डिलीट केलल्या फाईल्स Recycle Bin मध्ये असाव्यात (हि पुन्हा hidden असते)

उपाय: हे करून पहा:

१. Clean Master सारखे App वापरून पहा. ते या फाईल्स जरी हिडन असल्या तरी डिलीट करू शकते

२. File explorer सारखे App वापरून सुद्धा या फाईल्स डिलीट करू शकता
त्यायासाठी व्हिडीओ मध्ये दिल्यानुसार करून पहा
https://www.youtube.com/watch?v=tdqUWUbtMIs