चाइनीज apps साठी पर्याय कोणते?

Submitted by Srd on 30 June, 2020 - 00:44

चाइनीज apps वापरण्यावर बंदी आणली सरकारने म्हणजे नक्की काय हे कळले नाही.
पण आपण काही वापरत असू तर त्यास पर्याय शोधणे आले. त्यापैकी काही-

१) Camscanner ला पर्याय

एखाद्या फोटोमधील उतारा पिडिएफमध्ये बदलण्यासाठी वापरत होतो. पावती वगैरे असल्यास ती ठळक करण्याची सोय होती. यामध्ये एक गैर म्हणजे पिडिएफमध्ये 'made by camscanner' हा वाटरमार्क येतो. याला हा पर्याय पाहा.
Fast Scanner
https://play.google.com/store/apps/details?id=com.coolmobilesolution.fas...

२) Shareit ला पर्याय
वाइफाई फाईल ट्रानस्फरसाठी
गूगलचे 'files' app आहे पण ते चुकून आपल्या विडिओ फाईल्स आणि फोटोही उडवते.
एक 'Dukto' app होते ते आता स्टोरवर नाही.
बरेच जण Shareit वापरतात त्यास पर्याय -
Jio Switch
https://play.google.com/store/apps/details?id=com.reliance.jio.jioswitch

३) UC web चे UCbrowser हे video download साठी अतिशय उपयुक्त app आहे. कारण यासाठी लागणारी
savefrom.net site फक्त ucbrowser मध्येच चालते. पण त्यास पर्याय सापडला नाही..
तसा एक पर्याय होता तो विंडोज फोनचा. पण तो इतिहासजमा आहे.

४) dolphin browser कुणी वापरतात का? तोही चाईनीज आहे असं वाटतं Changyou.com चा आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

savefrom.net site फक्त ucbrowser मध्येच चालते. पण त्यास पर्याय सापडला नाही..>>> Opera, Firefox मध्ये चालते की व्यवस्थित.

त्या तिन्ही ब्राउजरमध्ये साईट 'wants to send you notification' असा pop up येऊन पुढे सरकत नाही. तिथे block / cancel काहीच क्लिक होत नाही. ही अडचण आली, येते. किंवा रिडिरेक्ट होते कुठेतरी. ( मोबाइलमधून मी करतो.) काही सेटिंग्ज चुकत असेल. Edge मध्येही तसेच.

आता प्रश्न असा ( youtube / youtube go वर डाऊनलोड होतो मग) की विडिओची फाइल कशाला?
- पेनड्राईवमध्ये टाकून टीवीवरती पाहू शकतो.

Camscanner ला पर्याय>>>>>>>> Adobe Scan हा पण चांगला पर्याय आहे CamScanner साठी

Shareit ला पर्याय>>>>>>> गुगल चे फाईल अ‍ॅप

UC web चे UCbrowser हे video download साठी अतिशय उपयुक्त app आहे. कारण यासाठी लागणारी
savefrom.net site फक्त ucbrowser मध्येच चालते. पण त्यास पर्याय सापडला नाही..>>>>>>>>> गुगल क्रोम वर चालतंय की व्यवस्थित

गूगलचे 'files' app आहे पण ते चुकून आपल्या विडिओ फाईल्स आणि फोटोही उडवते.>>>>>>>>> Files is a file management app for file browsing, media consumption, storage clean-up and offline file transfer.

storage clean-up हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. जोपर्यंत आपण सिलेक्ट नाही करत तोपर्यंत डिलीट नाही होत काही.

जोपर्यंत आपण सिलेक्ट नाही करत तोपर्यंत डिलीट नाही होत काही.
नवीन Submitted by संशोधक

होय. पण पटकन हात लागला टच स्करीनवर आणि एक चांगला विडिओ उडाला माझ्या ट्रिपचा. त्यामुळे धास्ती घेतली.

-------------
धन्यवाद film आणि संशोधक. आता save from dot net चा पॉप अप अडकतो तो कसा जाईल ते शोधतो.
Desktop page केल्यावर pop-up गेला. पण कोणतेतरी क्याश क्लिनर किंवा रमी पेज लॉटरी येते डाऊनलोड करायला. एकूण कठीण आहे.

"शेअर इट" ला पर्याय साऊथ कोरीया च "सेन्ड अनिव्हेअर"
फ्री आहे गुगल आप स्टोअर वर मी गेला महीनाभर वापरतोय!!