बऱ्याचदा काम करताना आपल्याला एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्सची गरज पडते. त्यानुसार आपण ती ऊघडतो. पण ती सर्व आपण लगेच बंद करतोच असे नाही. कारण वेळोवेळी त्यांची आवश्यकता लागते. उदा. मी आता पेजेस मध्ये काम करत आहे. पण काही पॅरा हे मी नोटस् मध्ये ठेवल्याने ’Notes’ उघडलेले आहे. मला मधे मधे स्क्रिन-शॉट वापरायचे असल्याने 'Photos' हे अॅप पण ओपन केलेले आहे. मला फोटोबकेट मधल्या काही लिंक हव्यात त्यामुळे ’Safari' ओपन आहे. स्क्रिनशॉट एडीट करण्यासाठी 'PhotoScape' ओपन आहे. ImageOptim सुरु आहे. अगोदरचे QuikTime Player ओपन आहे. प्रत्यक्षात मी Pages मध्ये काम करत असलो तरी ही सगळी ॲप्स बॅकग्राउंडला ओपन आहेत.
डिट्टो टिव्ही हे app कसे वापरायचे आहे.... चांगले आहे का.... टिव्ही पाहत नसल्याने अशा apps कधी वापरले नाहीत....dish tv सारखे monthly package असते कि कसे....याबाबत माहिती हवी आहे......ज्यांच्याकडे आहे त्यानी कृपया सांगा....
इस्ट इंडिया कंपनी सरकारने १७७६ साली मिलिटरी विभागाची निर्मिती केली. तिथून वाटचाल करत करत १९४७ मध्ये स्वतंत्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रीमंडळात ह्या खात्याचे पहिले कॅबिनेट मंत्री होते श्री बलदेव सिंग. १९४७ ते १९५५ तिनही संरक्षण दलांना कमांडर ऑफ़ चीफ़ होते. १९५५ त्यांना मध्ये चीफ़ ऑफ़ आर्मी स्टाफ़, चीफ़ ऑफ़ नेव्हल स्टाफ़ आणि चीफ़ ऑफ़ एअर स्टाफ़ असे म्हटले जाऊ लागले.
सद्ध्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली खाती येतात :
फेसबुक महिमा
फेसबुक खरच हानिकारक आहे कां?

सोशल प्रस्फोट!
मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाने आयोजित केलेल्या भाभा अणू संशोधन केंद्रभेटीत सहभागी व्हायची संधी श्री. तुषार देसाई यांच्यामुळे लाभली. अणुशक्तीनगरात वसलेली ही निसर्गरम्य जागा बाहेरून येता जाता कित्येकदा पाहिली होती. पण आत प्रवेश मिळत नाही हे माहीत असल्याने आतला परिसर पाहण्याची खूप उत्सुकता होती. अनासाये संधी मिळतेय म्हटल्यावर मी ऑफिसचे काम बाजूला ठेऊन आधी या संधीचा लाभ घ्यायचे ठरवले.
काल रात्री पार्कींगमध्ये कार पार्क केल्यावर एकाबाजूची काच चुकून उघडी राहीली. आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर काय कारमध्ये खूपच डास शिरलेले दिसले. सगळी दारं उघडून फडक्याने डास घालवण्याचा प्रयत्न केला, बरेच गेले पण बरेच या सीट खालून त्या सीट खाली, दाराला असलेल्या सामान ठेवायच्या खोबणीत जाऊन बसू लागले.
स्पेस एक्स या इऑन मस्कच्या कंपनीने आज फाल्कन हेवी हे अवाढव्य यान आज अंतराळात फेकले. त्याची दोन साइड बूस्टर रॉकेट सिन्क्रोनाइज्ड डाइवर्ससारखी भूतलावर अप-राइट लँड झाली. मस्कची स्वतःची टेस्ला रोडस्टर या यानाच्या पेलोडमध्ये होती जिचे अंतराळात पृथ्वीच्याभोवती भ्रमण करतानाचे विड्डिओ केवळ अवर्णनीय.
स्पेस एक्स व मस्कच्या संपूर्ण चमूचे प्रचंड अभिनंदन.
इथे विडिओ बघू शकाल
https://youtu.be/sB_nEtZxPog
गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत.