जुना सारीपाट आता रंगवून पुन्हा डाव मांडलाय,
साऱ्याचाच कसा हल्ली दिखावा झालाय...
मांगल्याचे प्रतिक ठरणारी दारातली रांगोळीही
करू लागलीय वेब सफर,
like dislike ची चढाओढ करत मिरवू लागलीये स्टेटस...
आज काल आंब्याच्या तोरणालाही अगदी मिळू लागलेत करोडो shares,
कौटुंबिक सोहळयांना येऊ लागलये फॉरेन संस्कृतीची लहर...
आतुकली भातुकली जाऊन kitchen सेट आलाय,
भावला भावलीच्या लग्नाचा गोडवा जाऊन लिविंग चा ट्रेंड आलाय...
डोळे लुकलूकणाऱ्या बाहुल्यांचा केव्हाच झाला makeover,
बार्बी आणि diseny princes ने त्यांना केलं केव्हाच गारद...
मी मनावर स्वतःच्या अनेक
लादले नियम, घातले निर्बंध
पण प्रत्यक्षात त्यातला एकही
मनाला पाळता आला नाही
जसा जन्मला तो
लोभस पण संधीसाधू विचार
तसा लगेच मनाला तो
जाळता आला नाही
कोणाची तरी समस्या
कोणाला तरी प्रसिद्धी मिळवून देत होती
आणि खरं सांगू
त्या क्षणी मलाही तो मोह
टाळता आला नाही
काहीच सुचेना आता
शब्दांनी पाठ फिरवली
वरवरचे माझे दुःख
लिहून शाईही सुकली
कुजबुजू लागले कागद
वाऱ्याशी काहीबाही
वृत्तांनी संग सोडला
मात्रांना लागली घाई
निरोपही न घेता माझा
यमकही निघाली जेव्हा
सगळेच निसटले होते
मजला हे कळले तेव्हा
माझ्या सोबत हे सारे
जगले होते स्वच्छंदी
क्षणभंगुर दाद मिळवण्या
मी केले त्यांना बंदी
-©अभिजीत गायकवाड