"श्रेया ! अगं उठ ना !! सात वाजून गेलेत. तुला कॉलेजला नाही जायचं का?"
मम्मा च्या आवाजाने श्रेया जागी झाली.
"Shit यार !! अलार्म कसा नाही झाला ? की मलाच ऐकायला आला नाही??"
स्वतःशीच बोलत तिने मोबाईल उचलला. काही हालचाल दिसत नसलेला मोबाईलचा ब्लॅक स्क्रीन पाहून ती वैतागली. "हे काय ? रात्री झोपताना तर चांगला 79% चार्ज होता. आता पूर्ण डिस्चार्ज ??"
चार्जर शोधून तिने मोबाईल चार्जिंगला लावला आणि बाथरूममध्ये शिरली.
दिनकर राव आज आनंदात होते. थोड्या वेळापूर्वी पेन्शन जमा झाल्याचा बँकेकडून एसेमेस आला होता. चांगल्या मार्क्स नी ग्रॅज्युएट झालेल्या त्यांच्या नातीला, सुमेधाला लॅपटॉप घेऊन देण्याचे त्यांनी कबूल केले होते. अचानक त्यांचा मोबाईल फोन वाजला. स्क्रीन वर अनोळखी नंबर झळकला. त्यांनी फोन घेतला.
"गुड इव्हिनिंग सर ! मी बीएसएनएल ऑफिस मधून बोलतेय.."
"बोला..."
"सर, आपलं केवायसी अपडेट पेंडिंग आहे. त्यासंदर्भात कॉल केलाय..."
"तुम्ही उद्या कॉल करा ना..आत्ता मी घाईत आहे..."
रामपूर ते स्टॅनफोर्ड - मनुची कहाणी
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरेच आहे. मनुच्या बाबतीत तसेच झाले. रामपूर च्या शाळेत आठवीत शिकत असलेल्या मनुला शाळेतल्या पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगवेगळे सायन्सचे प्रयोग करून पाहण्यात जास्त रस होता आणि यासाठी गरज होती एका मायक्रोस्कोपची. आता मायक्रोस्कोप हवा म्हटल्यावर मनू कामाला लागला. मायक्रोस्कोप कसा काम करतो हे शोधून काढल्यावर त्याने चक्क आपल्या भावाच्या चष्म्याची भिंगे काढून मायक्रोस्कोप बनवला. अर्थात हे प्रताप लगेच उघडकीस आले पण मनुने सृजनशील अभियांत्रिकीचा पहिला धडा गिरवला!
व्हाट्सएप ट्रॅप
रविवारची मस्त सकाळ. आजचा दिवस आरामात घालवायचा, असा विचार करून दामिनी कॉफीचा मग हातात घेऊन न्यूज पेपर वाचत बसली होती. अचानक तिची नजर एका बातमीवर स्थिरावली.
"द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन ला अटक"
लक्षपूर्वक तिने ती बातमी वाचली. ज्या ग्रुप ॲडमीन ला पोलिसांनी काही व्हॉट्सऍप वापरकर्त्यांच्या तक्रारीवरून अटक केली होती, त्याचं नाव वाचून ती चक्रावली. आयुष अजय सिंघवी ???
त्यादिवशी प्रोजेक्ट जरा फारचं पेटलं होतं. सकाळी ९ वाजल्यापासून सर्वात मोठी कॅान्फरस रूम १२ तासांसाठी बुक झाली होती. नेहमी ११ वाजता निवांत येणारी नेहा १०:५८ ला धावतपळत पोचली होती.
तिला डेस्कवर न जाता डायरेक्ट कॅान्फरस रूम मध्ये यायचा मेसेज ब्लॅकबेरी वर आला होता.
अग्नी-5 या भारताच्या दीर्घपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची 27 ऑक्टोबर 2021 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पाच हजार किलोमीटर दूरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
फोटो माॅर्फिंग
रविवारची मस्त सकाळ. खिडकीतून आत येणार्या गार वार्याने दामिनी ला जाग आली. तिने साईट टेबल वर ठेवलेला मोबाईल उचलून वेळ पाहिली. पावणे सात झाले होते. तास-दीड तास अजून झोप काढावी, या विचाराने पायाशी पडलेली चादर तिने अंगावर ओढून घेतली. पुन्हा झोपायचा प्रयत्न करत असतानाच, मोबाईलची रिंग वाजली.
दामिनी : सायबर गुप्तहेर
सकाळची कामं आटोपल्यावर मयुरीने मोबाइल वर फेसबूक उघडले. रीतेशची फ्रेंड रिक्वेस्ट होती. लगेच तिने Confirm बटन दाबून रिक्वेस्ट accept केली आणि उत्सुकतेने रीतेशचे प्रोफाइल पाहू लागली. फोटोत दिसणारा, आलिशान बंगल्यासमोर, होंडा सिटी कार सोबत उभा असलेला रीतेश पाहून तिच्या काळजात कळ उठली. दहा वर्षांपूर्वी चे दिवस तिला आठवले. नाशिक मधील एका नामांकित कॉलेजमध्ये बीएससी च्या शेवटच्या वर्षात शिकणारी मयुरी, आपल्या सौंदर्य आणि हुशारीमुळे बऱ्याच मुलांची ड्रीम गर्ल होती. त्यातीलच एक होता रीतेश.
चार वर्षांपूर्वी एक इमेल आली . IIM अहमदाबाद येथील प्रोफेसर पद्मश्री अनिल गुप्ता यांनी स्थापन केलेल्या Gujarat Grassroots Innovation Augmentation Network संस्थेच्या समर स्कुल ची. माझ्या डिपार्टमेंट च्या चौथ्या वर्षात जाणाऱ्या चार मुलींना त्यांच्या departmental mentor नी थोडे समजावून त्यात भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यासाठी एका महिन्यासाठी अहमदाबाद, गांधीनगर येथे जाऊन राहावे लागणार होते. या चारही मुलींची घराची परिस्थिती सामान्य असल्याने विशेष बाब म्हणून त्यांचा सारा खर्च तेथील संस्था उचलणार होती. त्यांच्या पैकी एकीचे वडील त्यांना अहमदाबाद ला सोडून परत आले.