केवायसी अपडेट - १
मिलिंद आज विशेष खुशीत होता. थोड्या वेळापूर्वीच पगार जमा झाल्याचा बँकेकडून एसेमेस आला होता. पुढच्या आठवड्यात माधुरीचा वाढदिवस असल्याने, आज ऑफिसमधून घरी न जाता, शॉपिंग ला जायचा त्याचा बेत होता. तसं त्याने माधुरीला सांगितलं होतं. शहरातल्या नामांकित ज्वेलरी शॉप बाहेर ती त्याची वाट पहात उभी होती. खूप दिवसांपासून तिला हिऱ्याचं नाजूकसं मंगळसूत्र हवं होतं. तिच्या या वाढदिवसाला त्यानं तिला ते गिफ्ट करायचं ठरवलं होतं. ऑफिसमधून निघण्याच्या तयारीत असतानाच, त्याचा फोन वाजला. मोबाइल स्क्रीन वर अनोळखी नंबर झळकला. त्याने फोन घेतला.
नमस्ते मित्रांनो
आपण सगळे इंजिनेर / सी ये किंवा बाकी शिक्षणात advanced अर्थात अधिकांश गणित शिकला असाल पण जे १० पर्यन्त चे गणित आहे त्याचा किती वेळा उपयोग झाला आहे ?
कदाचित बेरीज वजाबाकी चा उपयोग खरेदी करताना झाला
चला आत्ता अधिक उपयोग करू
किती लोकांकडे jio चे सिम आहे
सगळ्यात स्वस्त प्लॅन कोणता ?
सगळ्यात स्वस्त डेटा कोणत्या प्लॅन मध्ये ?
नुसते calling साठी प्लॅन घ्याचा तर स्वस्त कोणता पडेल?
सांगा
साधे गणित आहे
आजच्या दिवसाला jio चे सर्व प्लॅन खालील प्रमाणे आहेत
किशोरची 'किमया' रोबोटिक्स
...... 'अर्हंत' 'अवंतिका' चा हात हातात घेऊन थिरकत होता. 'तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये' या रोमँटिक गाण्यावर! ते दोघेही टेरेस वर होते.'अर्हंत' टेरेस फ्लॅटला राहायचा तेराव्या माळ्यावर. 13 बी नंबरच्या फ्लॅटमध्ये! अमावस्येची ती रात्र होती. त्यामुळे आकाशात सर्वत्र काळोख होता.'शशी' ढगांच्या आड कुठेतरी गडप झाला होता. मंद वारा वाहत होता. त्या मंद वाऱ्याची गार झुळूक दोघांच्याही मनाला स्पर्शून जात होती.जणू सौहार्दाचे नाते जडले होते त्या दोन जीवांमध्ये! आज अर्हंत चा वाढदिवस होता. रविवार 13 एप्रिल. अर्हंतने अवंतिका चा हात हातात घेतला आणि म्हणाला.
आजकालचं जग पूर्वीसारखं नाही, पुर्वी माणसं जवळ होते, आणि मोबाईल चा जन्म झाला नव्हता, मित्र मैत्रिणी हाकेच्या अंतरावर होते. जुन्या गोल डायलच्या फोन वरुन संभाषण चालायचं. रांँग नंबर शी सुद्धा आपुलकीनं बोलणं व्हायचं. एकमेकांच्या घरी सणांना जाऊन, भेटीचा आनंद असायचा. दिलखुलास गप्पा रंगायच्या. क्वचित सुट्टीच्या दिवशी पत्ते, कँरम, चेस चा डाव रंगायचा. शेजारी पाजारी जायला यायला बंधन नसायचं. पुरुष मंडळी आवरुन कामावर गेले की बायका उन्हाळी कामे एकमेकांच्या मदतीने करायच्या. स्वयंपाकविषयक पुस्तकांवर चर्चा व्हायच्या. पदार्थांची देवाण घेवाण व्हायची. फिरायला जाताना ग्रुपने जाणं व्हायचं.
सुएझची सुटका
(उर्फ ‘चल ले चल खटारा खिंचके’)
अनिता बेंगलोर मध्ये राहणारी एक स्मार्ट सॉफ्टवेअर इंजिनियर. दिवाळीची खरेदी म्हणून तिने लेटेस्ट मॉडेल ची फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन खरेदी केली. जुनी टॉप लोडिंग वॉशिंग मशीन विकण्यासाठी म्हणून लोकल न्यूज पेपर मध्ये जाहिरात दिली. तीन-चार चौकशीचे फोन येऊन गेले. चौकशी करणाऱ्यांना तिने दहा हजार रुपये किंमत सांगितली. काहींना सेकंड हँड वॉशिंग मशीनची ती किंमत जास्त वाटली. बाकीच्यांना बहुतेक त्या वॉशिंग मशीनच्या खरेदीत इंटरेस्ट नसावा. उगाच चौकशी करायला त्यांनी फोन केला असावा, असं अनिताला वाटलं. मात्र त्या दिवशी ज्या व्यक्तीचा फोन आला, त्याला खरोखरीच वॉशिंग मशीन घेण्याची निकड असावी.