तुटला आहे संपर्क;
जिद्द नाही अजून.....
एव्हड्या तेव्हड्या गोष्टीने
जाणार नाही खचून!
सहभागी प्रत्येक यशात
मग आज कुठे वेगळे?
प्रयोगातून नवीन शिकू
एकत्र मिळून सगळे
मंगळ असो, चंद्र असो,
हिंमत ठेवा शाबूत
प्रयत्नांती तुमच्या
विश्वही येईल काबूत
©मधुरा
मित्रांनो,
आपणापैकी बरेच जण नाईट शिप्ट करत असतील. नाईट शिप्टमुळे दिवसा आपल्याला झोपणे क्रमपाप्त, आवश्यक आहे. परंतु घरातील व्यक्ती, आजूबाजूचे लोकं हे सुद्धा आपल्याबरोबर नाईट शिप्ट करतात का? तर नाही.
बऱ्याच वर्षांपासून काही वैज्ञानिक कल्पना माझ्या डोक्यात घोळत आहेत. त्यातील पहिला किडा.
परवा आमच्या सोसायटीची जनरल मिटिंग झाली. ज्यात काही मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले त्यात सौर उर्जा वापरून सोसायटीसाठीची वीज निर्मिती करणे.
आमची सोसायटी (एकूण) खूप मोठी आहे. सोळा इमारती आहेत. पण प्रत्येक इमारतीची सोसायटी स्वतंत्र आहे. आमच्या एकट्या इमारतीत एकूण ८६ फ्लॅट आहेत. तर त्याबद्दल.
कुणी असा प्रकल्प जवळून पाहिला आहे, अभ्यासला आहे तर मला खालिल माहिती मिळू शकेल का?
पुण्यात, कोथरुडात, स्काईपद्वारे (व्यवस्थित, सलग, वारंवार डिस्कनेक्ट न होता, कमीत कमी लॅग असावा) संभाषण करणे (आठवड्यातून एक किंवा दोन तास) ही गरज आहे.
BSNL च्या सेवेला कंटाळून काही महिन्यांपूर्वीच त्यांची सर्विस बंद केलीये व आता एअरटेल व आयड्याच्या डेटा पॅकवर बाकी सर्व कामकाज व करमणूक उत्तम चालू आहे. पण स्काईपसाठी मात्र त्यात अडचण येते आहे. संभाषणात लॅग येणे, वारंवार डिस्कनेक्ट होणे असं वरचेवर होतं.
हॅथवे हे एक दुसरं ऑप्शन आहे पण ते भिंतीला भोक पाडून केबल आत आणतात आणि नुकतेच इंटीरिअरचे काम केलेले असल्यामुळे परत ठोकठोक, लोंबणार्या वायरी नको वाटतात.
झुक्याचं कुठून डोकं चाललं आणि त्यानं फेसबुक तयार केलं देव जाणे!
लिफ्ट मध्ये असताना आपला मजला यायचाय का? काढ फेसबुक, बोलता बोलता मित्राला फोन आला, काढ फेसबुक. हॉटेल मध्ये जेवण यायचंय का? काढ फेसबुक. सकाळी विधींना जाताना - काढ फेसबुक...
बघावं तिथे जो तो फेसबुक वर. प्रत्येकाला मोहात पाडण्यासारखं आहे तरी काय ह्या फेसबुक मध्ये?
हे विश्वनिर्मात्या,
वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या
उंच शिखरावर पोहोचून
वैयक्तिक स्वातंत्र्याचा असीम श्वास घेत
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संज्ञाप्रवाह रक्तात मिसळून
ताशी हजारो प्रकाशवर्षे वेगाने वाहत
निघालो आहोत आम्ही
आमच्या जन्मस्थळाकडे...
होत चाललो आहोत आदिम...
हा असुरी वेग
आवेगाने
करतोय नामशेष
आम्ही स्वाभिमानाने उत्क्रांत केलेली
यच्चयावत आदमखोर संस्कृती
तिच्या धार्मिक परिप्रेक्ष्यांसह...
आणि मला दिसतंय लख्खपणे
की
या भूतलावर लवकरच
होईल प्रचंड तंत्रोद्भव तांडव