ChatGPT: विचारा तर खरं

Submitted by अतुल. on 11 December, 2022 - 03:33

सध्या ChatGPT चा बराच बोलबाला आहे. हे खूप मोठ्या माहितीस्त्रोतावर प्रशिक्षण दिलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल आहे. याची बुद्धिमत्ता खरेच वाखाणण्याजोगी आहे. म्हणून तर सध्या ते फार चर्चेत आहे. ज्यांची उत्तरे वर्णनात्मक आहेत किंवा ज्या समस्या सोडवायला अनेक पायऱ्या (steps) असतात अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा तो देतो. संगणकाचे अल्गोरिदम लिहिण्यापासून कविता करण्यापर्यंत अनेकविध प्रश्न आपण त्याला विचारू शकतो आणि त्याची तो उत्तरे देतो. अनेकांनी आजवर असे प्रश्न त्याला विचारलेलेही आहेत. जसे कि रजेचा अर्ज कसा लिहावा, मूळ संख्या (primary numbers) शोधण्यासाठीचा अल्गोरिदम लिहून दे, तुला या xyz नेत्याविषयी काय माहिती आहे, मानवी ह्र्दय कसे काम करते ते सांग इत्यादी. हे विस्मयचकित करणारे आहे.

आता तुम्ही म्हणाल गुगल केल्याने या प्रश्नांची उत्तरे मिळतात. पण हे गुगल चे सर्च इंजिन नव्हे कि जे इन्टरनेट शोधून त्याधारे माहिती पुरवते. हा प्रशिक्षित यंत्रमानव आहे. त्याला इंटरनेटचा एक्सेस नाही. जी माहिती त्याला देऊन प्रशिक्षित केले आहे त्या आधारे तो एखाद्या मानवाने उत्तर दावे तसे उत्तर देतो ही त्याची खासियत आहे. येणाऱ्या काळात माहिती तंत्रज्ञान कोणत्या दिशेने जाणार आहे याची ही चुणूक आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा Happy

मी अनेक प्रश्न विचारत असतो त्याला.
उदाहरणार्थ:
हा एक प्रश्न आणि त्याचे त्याने दिलेले उत्तर (अर्थात, हे क्रोम मधून मराठी भाषांतर केलेले आहे. ChatGPT ला अजून मराठी तितकेसे कळत नसल्याने मूळ प्रश्नोत्तर इंग्लिशमध्ये होते):

मर्यादा:

१. जसे वर उल्लेख केलाय कि याला इंटरनेटचा एक्सेस नाही. त्यामुळे चालू घडामोडींवर तो उत्तरे देऊ शकणार नाही (जसे कि आता यानंतरची मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारी फ्लाईट कधी व कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकणार नाही)

२. त्याला अजून मराठी कळत नाही. त्याचे प्रशिक्षण मुख्यत्वे इंग्लिशमध्ये झाले असल्याने तुम्ही जर त्याला मराठीत माही विचारले तर एक तर तो काहीतरी गमतीशीर उत्तर देईल किंवा मला प्रश्न समजला नाही म्हणून सांगेल.

३. हा खूप मोठ्या माहितीवर प्रशिक्षित यंत्रमानव असल्याने जसे मानवाकडून उत्तर देण्यात चुका होतात तशा याच्याकरवी सुद्धा होऊ शकतात Happy पण म्हणून लगेच 'मग काय उपयोग?' असे वाटून घेऊ नका. तो शिकतोय आणि तुमची उत्तरे देता देता स्वत:ला प्रशिक्षित सुद्धा करतोय. उत्तर पडताळून पहा (नेटचा वापर करून वगैरे) आणि काही चूक असल्यास तसं अभिप्राय त्याला दया

Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओळख आवडली. Happy
ज्यांची उत्तरे वर्णनात्मक आहेत किंवा ज्या समस्या सोडवायला अनेक पायऱ्या (steps) असतात अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा तो देतो.>>>>हे विशेष वाटले. गूगलपेक्षा विस्तृत वाटतेयं.

हे मस्त आहे. अगदी कविता, गोष्टी वैगरे पण करतं हे. चाटबॉट.. मजा येते... मागच्या आठवड्यात आमचं मीटींग मधे हेच चाललेलं हाहा...

प्रश्न: तुम्ही कृपया चॅटजीपीटीच्या फायदे आणि बाधकांवर ५०० शब्दांचा लेख लिहू शकता का?

ChatGPT:

नक्कीच! ChatGPT च्या साधक आणि बाधकांवर चर्चा करणारा 500 शब्दांचा लेख येथे आहे:

ChatGPT हे OpenAI द्वारे विकसित केलेल्या GPT (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) भाषेच्या मॉडेलचे एक प्रकार आहे, जे प्रश्न आणि सूचनांच्या विस्तृत श्रेणीसाठी मानवासारखे प्रतिसाद निर्माण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. ChatGPT हा एक चॅटबॉट आहे जो संभाषणात्मक संदर्भात प्रतिसाद निर्माण करण्यासाठी या भाषेच्या मॉडेलचा वापर करतो आणि त्याची भाषा समज आणि योग्य प्रतिसाद निर्माण करण्याची क्षमता सुधारण्यासाठी मजकुराच्या मोठ्या डेटासेटवर प्रशिक्षित केले गेले आहे.

ChatGPT च्या मुख्य साधकांपैकी एक म्हणजे प्रश्न आणि प्रॉम्प्टच्या विस्तृत श्रेणीला मानवासारखे प्रतिसाद निर्माण करण्याची क्षमता. हे वापरकर्त्यांना माहिती आणि सहाय्य प्रदान करण्यासाठी तसेच प्रासंगिक संभाषणात गुंतण्यासाठी एक प्रभावी साधन बनवू शकते. ChatGPT वेळोवेळी शिकण्यास आणि सुधारण्यास सक्षम आहे, याचा अर्थ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि सहाय्य प्रदान करण्यात ते अधिक प्रभावी होऊ शकते.

ChatGPT चा आणखी एक प्रो म्हणजे विषय आणि संदर्भांची विस्तृत श्रेणी हाताळण्याची क्षमता. मजकुराच्या मोठ्या डेटासेटवर प्रशिक्षित केल्यामुळे, ChatGPT ला भाषेची व्यापक समज आहे आणि ती विविध विषयांवर प्रतिसाद निर्माण करू शकते. हे एक अष्टपैलू साधन बनवते जे प्रश्नांची उत्तरे देणे, माहिती प्रदान करणे किंवा प्रासंगिक संभाषणात गुंतणे यासह विविध उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते.

तथापि, ChatGPT ला काही मर्यादा आणि संभाव्य तोटे देखील आहेत. ChatGPT च्या मुख्य मर्यादांपैकी एक म्हणजे ती मानवी भाषा आणि समज यांचे परिपूर्ण मॉडेल नाही आणि ते काहीवेळा पूर्णतः अचूक किंवा योग्य नसलेले प्रतिसाद निर्माण करू शकते. हे प्रशिक्षित केलेल्या डेटामधील मर्यादा किंवा भाषा मॉडेलमधील त्रुटींसह विविध घटकांमुळे असू शकते.

ChatGPT चे आणखी एक संभाव्य नुकसान म्हणजे ते कार्ये स्वयंचलित करण्यासाठी किंवा मानवी कामगारांना बदलण्यासाठी वापरले जाऊ शकते, ज्यामुळे रोजगार आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. ChatGPT आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता साधने मानवी कार्य वाढवण्यासाठी आणि वर्धित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, परंतु या साधनांचा रोजगार आणि अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणामांचा विचार करणे आणि ते जबाबदार आणि नैतिक पद्धतीने वापरले जात असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

एकंदरीत, ChatGPT हे एक शक्तिशाली आणि उपयुक्त साधन आहे ज्यामध्ये अनेक संभाव्य साधक आहेत, परंतु त्याच्या मर्यादा ओळखणे आणि ते जबाबदार आणि नैतिक अशा प्रकारे वापरणे महत्त्वाचे आहे. ChatGPT आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा समाजावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडेल की नाही हे ते कसे वापरले जातात आणि ते तयार करणाऱ्या आणि वापरणाऱ्या लोकांच्या कृतींवर अवलंबून असेल

दोन महिन्यांपूर्वी chatGPT बरोबर १-२ तास गप्पा मारलेल्या. त्यावेळी chatGPT कडूनच एक ५०० शब्दांचा लेख लिहून घेतला होता. तो वर दिला आहे

डेंजरस प्रकार दिसतो आहे. मी विचारलेल्या काही प्रश्नांना लोणकढ्या थापा मारल्या.
एका भाजीची रेसिपी शोधत होतो. चॅटजीपीटी ने अगदी डिटेलमध्ये ऑथेंटिक वाटेल अशी रेसिपी सांगितली पण. पण ती रेसिपी पाहून मला थोडा डाउट आला. मग मी त्याला 'पेरूच्या पानांची' भाजी कशी करायची असं विचारलं. एक्झॅक्टली तीच रेसिपी 'पेरूच्या पानांची भाजी' म्हणून सादर Happy
मग 'नारळांच्या पानांची भाजी' विचारली. परत पेरूच्या जागी नारळ टाकून तीच रेसिपी सादर Rofl Rofl थोडक्यात आपण शाळेच्या पेपरात काही येत नसताना दहा बारा ओळी क्लेव्हर वर्डिंग करून उत्तर लिहिल्याचा आभास निर्माण करायचो त्यातला प्रकार आहे.

पेश है... 'झावळ्यांची भाजी'
मी: How to make coconut leaves sabzi
चॅट जीपीटी:
Coconut leaves sabzi is a traditional Indian dish that is made using fresh coconut leaves, onions, tomatoes, and a few other spices. Here's a recipe to make coconut leaves sabzi:

Ingredients:

10-12 fresh coconut leaves
1 onion, finely chopped
1 tomato, finely chopped
1/2 tsp cumin seeds
1/2 tsp mustard seeds
1/4 tsp turmeric powder
1/4 tsp red chili powder
Salt to taste
2 tbsp oil
Instructions:

Clean the coconut leaves and chop them into small pieces.

Heat oil in a pan and add cumin seeds and mustard seeds. Let them splutter.

Add chopped onions and sauté until they turn golden brown.

Add chopped tomatoes and cook until they turn soft.

Add turmeric powder, red chili powder, and salt to taste. Mix well.

Add chopped coconut leaves and stir well.

Cover the pan and let it cook for about 10-15 minutes on low heat.

Check if the coconut leaves are cooked properly. If they are not, then cook for a few more minutes.

Once done, turn off the heat and serve hot with rice or chapati.

Your coconut leaves sabzi is now ready to be served. Enjoy!

मोरोबा
छान exploration....
थोडक्यात आंब्याची साल वडाला लाव वडाची साल पिंपळाला लाव....
बहुतेक कोडिंग करणारो आपलो मालवणी असा...काय ता? ््
घाराणो घातलेलो.... Happy

आता जरा नीट वाचलं 'झावळ्यांची भाजी' Rofl
यात मात्र त्याची बिचाऱ्याची काही चूक वाटत नाही हां Lol "असतील खात बुवा आपल्याला काय" असे म्हणून एखाद्या खानसाम्याने मुकाट्याने सांगेल त्या गोष्टीची भाजी करून द्यावी तसे याने सुद्धा मुकाट्याने रीसिपी लिहून दिली Lol
पण तो शेवटी जनरली सांगतो हो "शक्यतो कुणी खात नाही तेंव्हा आपल्या जबाबदारीवर खा" इथे तसे त्याने सांगितलेले दिसत नाही.

झावळ्याची भाजी...चीन मध्ये खास प्रसंगी कोवळ्या बांबू कोंबांची भाजी करतात तसं वाटलं असेल बिचाऱ्याला.
त्याला पापडाचा खर्डा किंवा दोडक्याच्या शिरांची चटणी विचारा अतुल.

आज गुरुपौर्णिमा. आज ChatGPT ह्या गुरु मुळे मला Time Dilation आणि Twin Paradox समजायला मदत झाली. आजवर माझे याबाबत चुकीचे समज होते त्यांचे निराकरण झाले:

माझे गैरसमज व निराकरण थोडक्यात:

गैरसमज १: एखादी व्यक्ती आपल्या तुलनेत प्रचंड वेगाने (समजा प्रकाशाच्या जवळपासचा वेग) आपल्यापासून दूर जात असेल तर Time Dilation मुळे त्या व्यक्तीचे वय आपल्याला आपल्यापेक्षा कमी गतीने वाढताना दिसेल. म्हणजे उदाहरणार्थ, आपल्या एक वर्षांनी त्याचे वय मात्र आपल्याला फक्त सहा महिन्यांनीच वाढलेले दिसेल. याचाच दुसरा अर्थ त्या व्यक्तीला आपले वय त्याच्यापेक्षा जास्त वाढताना दिसेल. उदाहरणार्थ, त्याच्या एक वर्षांनी आपले वय मात्र त्याला दोन वर्षांनी वाढलेले दिसेल.

निराकरण: गती हि सापेक्ष असल्याने आपल्या दृष्टीने त्याचा वेग जेवढा आहे तेवढाच वेग त्याच्या दृष्टीने आपला आहे. त्यामुळे Time Dilation जसे आपल्याला जाणवते तसेच त्यालाही जाणवेल. म्हणजेच त्या व्यक्तीचे वय आपल्याला आपल्यापेक्षा कमी गतीने वाढताना दिसेल, आणि त्याला सुद्धा आपण त्याच्यापेक्षा कमी गतीने वाढताना दिसू. उदाहरणार्थ, आपल्या दृष्टीने जेंव्हा आपले एक वर्ष झालेले असेल तेंव्हा आपल्याला त्याचे वय फक्त सहा महिन्यांनीच वाढलेले दिसेल. आणि त्याच्या दृष्टीने जेंव्हा त्याचे एक वर्ष झालेले असेल तेंव्हा त्याला आपले वय फक्त सहा महिन्यांनीच वाढलेले दिसेल.

गैरसमज २: कालांतराने जेंव्हा ती व्यक्ती थांबेल (म्हणजेच त्याचा वेग आपल्या इतकाच होईल) तेंव्हा ती आपल्या तुलनेने खूप तरुण राहिलेली असेल

निराकरण: जोवर गतीत असते तोवर ती व्यक्ती Time Dilation मुळे आपल्याला आपल्यापेक्षा तरुण दिसेल (आणि त्यांना आपण). कालांतराने जसे जसे तिचा वेग कमी होईल तसे Time Dilation सुद्धा कमी कमी होऊन तिचे वय वाढत जाईल, व ती पूर्ण थांबल्यावर (म्हणजेच त्याचा वेग आपल्या इतकाच होईल तेंव्हा) ती आपल्याच वयाची झालेली दिसेल. त्या व्यक्तीचे सुद्धा आपल्याबाबत हेच निरीक्षण असेल.

गैरसमज ३: कोणी जर आपल्यापेक्षा खूप जास्त वेगाने अवकाशात जाऊन काही काळाने परत आला तर तो आपल्यापेक्षा तरूण असेल.

निराकरण: हे गैरसमज २ शी संबंधित आहे. जोवर आपल्यापेक्षा खूप जास्त वेगाने ती व्यक्ती अवकाशात प्रवास करत असेल तोवरच ती आपल्याला (आणि आपण त्यांना) आपल्यापेक्षा तरुण दिसेल. पण जेंव्हा परत पृथ्वीवर येऊन गती कमी होऊन थांबेल तेंव्हा तिचे वय वाढत जाऊन ती आपल्याइतकीच होईल (त्या व्यक्तीलासुद्धा आपले वय वाढत जाऊन आपण त्यांच्याइतकेच होताना दिसू)

गुरु सोबत झालेल्या तपशीलवार चर्चेची लिंक:
https://chat.openai.com/share/e89782dc-2cc6-45ea-98d7-f42b71f7a194

हे खरेच डेंजर प्रकरण आहे अतुल. आमच्याकडे (लॉ फर्म) हलली जे intern येत आहेत ते हे वापरतात, बेसिक माहिती मिळतेच मिळते. एक कलिग म्हणाली की चक्क प्लेंट सुद्धा ड्राफ्ट करून मिळते, बेसिक गोष्टी फीड केल्या की. हे खरेच डेंजर आहे. म्हणजे ड्राफ्टींग, रिसर्च ही स्किल आहेत खरेतर. पण हे असे (बेसिक का होईना) रेडिमेड मिळणार असेल तर अवघड आहे. नवोदितांचे जॉब धोक्यात येतील काय याने???

लंपन - प्रत्येक केस मधे स्पेसिफिक न्युआन्सेस असतात. ते सगळे कसे येतात अशा ड्राफ्ट्स मधे? काही टेम्प्लेट्स असतात त्या ठीक आहेत -म्हणजे उदा: नोकरीतून कमी करण्याविरोधात दाखल करायची याचिका. याचा बहुतांश मसुदा तोच असेल पण त्या त्या केस मधले स्पेसिफिक्स फक्त त्याच्याशी संबंधित लोकांनाच माहीत असतील ना?

एक कलिग म्हणाली की चक्क प्लेंट सुद्धा ड्राफ्ट करून मिळते >> प्लेंट? टायपो आहे का? कंप्लेण्ट?

खरे आहे येणाऱ्या काळातली आव्हाने फार वेगळी असतील. हा (रोबोट) आता प्रश्नाची उत्तरे देतोय, गाड्या चालवतोय, वर्णन दिल्यावर चित्रे काढतोय. उद्या (म्हणजे अगदी नजीकच्या काळात) कविता लिहिणे, सिनेमाची पटकथा लिहिले हे सुद्धा करू लागेल.

(मराठी कविता तर आत्ताच तो करू लागलाय मोडक्यातोडक्या: Lol )
https://chat.openai.com/share/43d876ee-08e0-404c-9324-8bdcc6ab7adb

म्हणजे, संगणक येण्यापूर्वी जसे "यांत्रिक कामे संगणक करेल" म्हटले जायचे, बरेच जॉब धोक्यात येतील म्हटले जायचे. आताही तेच आहे फक्त "यांत्रिक" शब्दाची व्याख्या फार पुढे गेली म्हणायची Lol

याबद्दल मी एक फार चपखल वाक्य वाचले आहे: "एआय तुमचा जॉब घेणार नाही. पण एआय वापरणारे घेतील". जेथे जेथे कामात ए आय वापरणे शक्य आहे तेथे वापरले जाईल. कॉम्प्युटर क्षेत्रातील लोकांना हे नवीन नाही - पण याचा वापर कामात जे चांगल्या रीतीने करू शकतील त्यांना उलट फायदाच होईल असे मला वाटते.

फारेंड मी तिच्या कडून insolvency and bankruptcy code खालचे कोणते तरी डॉक्युमेंट ऐकले आणि प्लस CPC खालची प्लेंट (complaint नाही). उद्या ऑफिस मध्ये जाऊन ते फॉरमॅट बघतोच. ज्युनिअर पबलीक बेसिकच काम करून देते ना मग मला जर अगदी बेसिक फॉरमॅट मिळाला तर मग त्यांची गरज उरणार का? रिसर्च साठी तर मी कितीतरी रात्री ऑफिसात काढल्यात, रेफ्रंस पुस्तके, केसेस आणि commentaries अन काय काय. आता हे chat जर रिसर्च रेडीमेड देणार असेल तर... Sad

ओके. मला प्लेण्टचा अर्थ माहीत नाही पण बाकी मुद्दा लक्षात आला. तेच मी आणखी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. या अल्गॉरिदम्सची क्षमता त्यांना जो डेटा फीड केला गेला आहे त्यावर व त्यातून ते काय अर्थ काढू शकतात (जे त्या अल्गॉरिदमचे मुख्य काम आहे) त्यावर आहे. कॉमन टेम्प्लेट्स वापरून जे केले जाते ते सोडले तर इतर बाबतीत तुम्हाला मसुदा मिळू शकतो पण अचूक पाहिजे तसे मटेरियल मिळेल असे नाही.

अर्थात तुमच्या कामात्/क्षेत्रात नक्की काय सहजपणे यातून मिळवता येइल याची माहिती तुम्हालाच जास्त असेल. मी इतर वाचले/पाहिले त्यावरून जनरल अंदाज लावतोय.

>> "एआय तुमचा जॉब घेणार नाही. पण एआय वापरणारे घेतील"

हे सुद्धा थोड्या काळासाठी सुरू राहील. कारण मुळात "जॉब" म्हणजे आपले कौशल्य वापरून सेवा देणे. सगळीच कौशल्ये उद्या जर एआय ने रिप्लेस केली (भावनिक सुद्धा) तर माणसाला माणसाच्या कोणत्याही सर्विस ची गरज पडणार नाही (?)

Pages