वेब डिझाइन शिकायला मदत हवी आहे

Submitted by मसाला on 29 August, 2022 - 21:53

मला थोडी मदत हवी आहे. मला Ruby on Rails, bootstrap, web design कुणी शिकवू शकेल का? आठवड्यात १ दा, साधारण अर्धा तास ऑनलाईन शिकवणी अशी अपेक्षा आहे. योग्य मोबदला देण्यात येईल.
भारतातील विविध NGO बद्दल पोर्टल बनवायचा माझा विचार आहे. कृपया संपर्क करावा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कोर्सेरा माहीत नाही कसे आहेत पण युडेमीचे मी Rob Percival चा 'कम्प्लीट वेब डेव्हलपमेन्ट' कोर्स केला होता. फार सुरेख शिकवतात ते. क्रिस्प!!
बाकी पायथॉन वगैरे माहीत नाही.

Uedmi चा Python कोर्स मी नुकताच सुरू केलाय.
सुरवाती वरून तर चांगला वाटतोय.

कोर्सेरा, युडेमी वगैरे कुठे शिकायचे ही अडचण नाहीये. एक चांगला mentor मिळणे ही खरी महत्त्वाची आणि अवघड गोष्ट आहे. एकदा DHH ने (David Heinemeier Hansson) स्वतः माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले होते, पण दरवेळी ते शक्य होत नाही. ऑनलाईन वर्गात शिकणे आणि अनुभवी व्यक्तीकडून, प्रत्यक्ष बोलून शिकणे यात फरक आहे.

मी यातला नाही. पण सहज
१) यूट्यूबवर
शोधल्यावर हा एक दिसला
https://youtube.com/c/tutsplus

२) रेडीमेड पेजेझ टेम्प्लेटस
हीच वापरायची,मजकूर बदलायचा.

करून पाहिलं का?


शीर्षकात वेब डीझाईन असा उल्लेख आहे. परंतू, मजकूरात ROR, Bootstrap यांचा उल्लेख आहे.
हे दोन्ही थोडे वेगळे अहेत. तुम्हाला डिझाईन शिकायची आहे की कोडींग? कामाच्या ठिकाणी वेब डिझायनर्स जे फक्त डिझाईन, थीम, कलर्सची निवड, ई. तयार करतात, ते वेगळे असतात. हे डिझाईन प्रत्यक्ष उतरवणारे प्रोग्रामर वेगळे असतात. त्यातही frontend, backend व fullstack असा फरक असतो .


फक्त एनजीओची वेबसाईट तयार करणे हा एकच उद्देश आहे का? तसे असेल तर हे काम वर्डप्रेस/ड्रुपल मधे त्यांचे प्लगिन्स व थीम वापरुन कमी वेळात व कमी श्रमात होईल. त्यासाठी खास शिकवणी लावण्याचीही गरज नाही.

Full stack development. Prefer to use a framework for rapid development.

I use Drupal for my personal website. I know that Drupal has a steep learning curve.