मराठी कविता संग्रह पाठवा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या एका परिचिताने अंबेजोगाईत हा उपक्रम सुरु केला आहे. मायबोलीकरांना याबाबत माहिती द्यावी म्हणून इथे लिहित आहे.
याबद्दल लोकसत्तेमध्ये आलेली बातमी http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=536...

मराठी कविता संग्रह पाठवा-

अंबेजोगाई ही आद्यकवी मुकुंदराजांची भूमी.
येथेच त्यांनी रचला मराठी कवितेचा पहिला ग्रंथ विवेक सिंधु .
त्यानंतर मराठी कवितेचा अखंड प्रवाह सुरु आहे .
या साडे आठशे वर्षात मराठी कवितेचे रूपांतर एका महानदीत झाले आहे.

मुकुंदराजांच्या गावात मराठी कवितांचे ग्रंथालय व्हावे असा संकल्प
27 फेब 2010 रोजी मराठी दिनाच्या निमित्ताने आम्ही केला .
अंबेजोगाईची मसाप आणि पत्रकार संघाने कार्यक्रम आयोजित केला होता.

या उपक्रमाची सुरुवात ,
या वर्षी मुकुंदराज यात्रेच्या वेळेला ( डिसेंबर 2010 )
मराठी कविता संग्रहांचे प्रदर्शन भरविणार आहोत .
किमान 1000 कविता संग्रह या प्रदर्शनात मांडावेत असा आमचा प्रयत्न आहे.

माझ्या जवळचे सुमारे 130 कविता संग्रह देऊन मी तयारी सुरु केली आहे. त्यापाठोपाठ नागपुर व लातुर इथुनही कवितासंग्रह मिळाले आहेत. काही कवींनी आपले कवितासंग्रह या उपक्रमासाठी दिले आहेत. पहिल्या १० दिवसांतच ५०० ग्रंथ जमा झाले आहेत.

तुमच्या जवळचे मराठी कविता संग्रह तुम्ही दिले तर हां प्रकल्प पूर्ण होइल.
कोणाही कवीचा कविता संग्रह चालेल
1) कविता संग्रह मराठी भाषेत असावा
2) पुस्तकाची किम्मत, टपाल खर्च वा अन्य कोणताही खर्च दिला जाणार नाही.
3) अंबेजोगाईत कवितेचे ग्रंथालय स्थापन झाल्यानंतर सर्व पुस्तके या ग्रंथालायाकडे सुपूर्त केली जातील.
4) खालील पत्यावर कविता संग्रह पाठवावे -
अमर हबीब, परिसर प्रकाशन, अम्बर, हौसिंग सोसाइटी,
अम्बाजोगाई .-431517 ( जिल्हा. बीड )
5) पुस्तके पठविने अशक्य असेल तर वरील पत्त्यावर कळवावे, आम्ही ती नेण्याची व्यवस्था करू.
6) पुस्तकांच्या देणगीदाराच्या नावाची नोंद ठेवली जाईल.

मराठी कवितेसाठी सुरु केलेला हां प्रकल्प तेंव्हाच सिद्ध होईल जेंव्हा मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक
उत्स्फूर्तपने आपल्या जवळचे कविता संग्रह स्व -खर्चाने पठावतील किंवा घेउन जाण्यास सांगतील.
तुम्ही आपले योगदान द्या..ही विनंती

अमर हबिब
परिसर प्रकाशन
अंबेजोगाई

प्रकार: 

श्री अमर हबीब साहेब,
त्या दिवसाचा(२७ फेब्रु.) मी पण साक्शीदार आहे. उपक्रम खुपच छान आहे.आमच्या परीने आम्ही निश्चीत मदत करु.

छान आणि स्तुत्य उपक्रम.

तशी मला त्यांची मला वैयक्तिक मेल पण मिळाली.
(माझा एकही कवितासंग्रह अजुनपर्यंत प्रकाशित झालेला
नाही हे श्री अमर हबिबांना माहीत असतांना) Happy

मी निश्चल रामैया माझा ''आयुष्यसुता तुझ्याचसाठी '' या नावाचा चारोळीच पुस्तक पाठवल तर चालेल ना! my mobile No. 9860904100