द ग्रेट बॅरियर रीफ अ‍ॅट रिस्क!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

द ग्रेट बॅरियर रीफ अ‍ॅट रिस्क!

गेल्या शनिवारी ऑस्ट्रेलियातील जगप्रसिद्ध बॅरियत रीफ हे जागतिक वारसा म्हणुन जाहीर झालेले नैसर्गिक क्षेत्र एका चिनी जहाजाच्या अपघातामुळे धोक्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातुन निर्यात होणारा कोळसा चीन ला घेउन जाणारे हे जहाज, 'शॉर्टकट' मार्गे ऑस्ट्रेलियाहुन चीनकडे निघाले होते. या परिसरातील अनेक कोळसा खाणीतुन कोळसा वाहुन नेणारी जहाजे अशाच प्रकारे 'शॉर्टकट' मारत असतात हे आता समोर आले आहे. त्या जहाजातुन होणार्‍या तेल गळतीमुळे येथील प्रवाळ बेटे धोक्यात सापडले आहेत. येथील पर्यावरणवाद्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधान अन विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देउन या प्रकाराला जबाबदार असणार्‍यांना कठोर शिक्ष देण्याचे सुचवले आहे.

ऑस्ट्रेलियात अवैध मार्गाने येणार्‍या परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करुन ठेवण्यासाठी 'ख्रिसमस बेटा'वरील तुरुंग अपुरे पडत असल्याचे दिसते आहे. येथील तटरक्षक दलांना दररोज एक नवीन बोट ऑस्ट्रेलियन किनार्‍यावर अंदाजे १०० लोकांना गैरमार्गाने घेउन येताना आढळते आहे. नुकतेच यातील काही लोकांना मुख्य भुमीवर आणुण ठेवले गेले. यावर विरोधी पक्षआंनी खुपच टिका केली. कारण बेटावर असणारे नागरिक जर मुख्य भुमीवर आले तर त्यांचे हक्क अन अधिकार हे नव्याने तपासुन पहावे लागतील अन त्यांना येथील रहिवासाचा परवाना अथवा नागरीकत्व देण्यासाठी भाग पडु शकते.

सध्या ऑस्ट्रेलियाला निर्वासितांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावतो आहे. इराक, अफगाणिस्तान अन श्रीलंके तुन असंख्य निर्वासित इकडे येत आहेत. कालच येथील सरकारने अफगाण अन श्रीलंकन निर्वासितांचे कागदपत्र तपासणीचे काम अनुक्रमे सहा अन तीन महिने थांबवाण्याच अनिर्णय घेतला. यामुळे आता जे निर्वासित लोक स्थानबद्ध केलेले आहेत त्यांना त्यांच्या अर्जांवर निर्णय मिळण्यासाठी अधिक काळ थांबावे लागेल.

२००२ ते २००६ या काळात स्पेन मध्ये राहत असताना दररोज टीव्हीवर असेच आफ्रिकन निर्वासित अन अवैध नागरिक पकडल्याच्या बातम्या दिल्या जात असत. आताही ऑस्ट्रेलियन टीव्हीवर नेहमी यावर चर्चा चालु असते.

सर्वच प्रगत देशांना/राज्यांना(?) निर्वासित अन अवैध मार्गाने येणार्‍या नागरिकांचा प्रश्न सतावतो आहे. अन त्यामुळे तेथील भुमिपुत्रांच्या अस्मितांना धुमारे फुटत आहेत. एकुणच सर्वत्र भुमिपुत्र अन उपरे अश्या संघर्षाला नवीन परिणाम प्राप्त होत आहेत. विकासाची 'बेटे' निर्माण होण्यापेक्षा 'सार्वत्रिक' विकास होणे हाच यावरचा अंतिम उपाय असु शकतो. सर्वच देशांतील/राज्यांतील नेतृत्वाला यावर सातत्याने विचार अन कृती करणे आवश्यक आहे.

विषय: 
प्रकार: