रान स्वप्न

Submitted by अमेलिया on 13 September, 2012 - 02:25

इथे कसा मातीला या हिरवा ओला रंग मिळे
निळ्या नभा वाहू नेत निळे जळ झुळझुळे

रानभर पक्षी करे नाच नाचरी धिटाई
घर त्याचे वागवीत तरुवर सळसळे

चंद्रवेडे स्वप्न पडे लाजणाऱ्या लतिकेला
चांदण्याच्या चुंबनाने काया तिची हुळहुळे

कळीवरी रानभऱ्या भ्रमराची गुणगुण
रोमांचून उमलणे कसे काय तिला कळे?

धावणारी पायवाट करीतसे काय गूज
बांधून घे संगतीस मखमाली तृण-मळे

आसमंती चहूकडे रंग कसे वर्णू जावे
दिठीतले स्वप्न त्याचे माझ्या मनी येऊ मिळे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रवेडे स्वप्न पडे लाजणाऱ्या लतिकेला
चांदण्याच्या चुंबनाने काया तिची हुळहुळे
>>
वाह वाह!
आवडलीच Happy

छान Happy