वृक्षपरीचे दर्शन
कर्नाटक राज्यातील उत्तरकन्नडा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील जंगलात भटकायचा योग चालून आला होता. ह्या सदाहरित घनदाट जंगलातून काली नदी वाहते. नदीवर मोठे धरण सुद्धा बांधले आहे. हे जंगल अतिशय समृद्ध असून पश्चिम घाटात असलेली मुबलक जैवविविधता येथे बघायला मिळते. वाघ, बिबट, हत्ती, महाधनेश तसेच किंग कोब्राचा इथे अधिवास आहे.
अनुबंध
माणसामाणसात अनुबंध
असे जुळावे
जसे फुलपाखरू
पानांफुलांवर खेळावे
अलगद उतरावे
कुठल्याही पानाफुलावर
ना पानांना वेदना
ना जखमा फुलांना
गाजावाजा न करता
द्यावे जे द्यायचे
घ्यावे जे घ्यायचे
ना कोणी दाता
ना कोणी याचक
सगळ कसं कोमल
आणि नितळ
© दत्तात्रय साळुंके
'आपण सर्व जण लहानपणापासूनच एक उत्तम शिकारी असतो' हे माझे वक्तव्य तुम्हांस फारच धाडसाचं वाटतंय ना!! तर मग आठवा बरं! आपल्या बालपणी आपण किती किड्यामुंग्यांच्या शिकारी केल्यात ते!!! कसं त्यांना एका फटक्यात चारीमुंड्या चित केलंय. कसं त्यांना दोरा बांधून घरभर फिरवलंय. कसं त्यांच्यावर झडप टाकून, त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना बाटलीच्या पिंजऱ्यात बंदीवान केलंय. हो ना!?
Owl Butterfly (Caligo memnon)


"The butterfly effect" ...
एक जानेवारीची सकाळ निसर्गाच्या सानिध्यात, फुला-फुलांमभून मध गोळा करत भिरभिरणाय्रा फुलपाखरांच्या सहवासात गेली तर त्यापेक्षा नवीन वर्षाची सुंदर सुरवात आणखी ती काय होणार. ड्युटीच्या तासांमुळे थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनचे बारा वाजलेच होते, पण त्यामुळे सकाळी मात्र साडेपाच वाजताच जाग आली. पनवेलवरून ठाणे-ओवळा ईथे पोहोचायला जवळपास दिड तास लागतो, ट्रॅफिक मधे फसल्यावर किती वेळ लागेल याचं कॅलक्युलेशन करून घरातुन जरा लवकरच निघालो. आदल्या दिवशी मि. राजेंद्र ओवळेकरांकडे बोलणे झालेच होते. सूर्यकिरण आल्याशिवाय फुलपाखरे येत नाहीत त्यामुळे त्यांनी सकाळी ९:३० पर्यंत पोहचायला सांगितले होते.
प्रचि ०१

प्रचि ०२
c
प्रचि ०३

प्रचि ०४
![]()
माहुली परिसर........शहापूर येथील, एक दिवस... फुलपाखरांसमवेत !!!
दिनेशदा >> हे कोणते झाड आहे ज्याच्या सभोवती इतक्या प्रकारची फुलपाखरे भिरभिरत होती !!!




पुण्यात इकडे-तिकडे फिरण्यासाठी मी बस किंवा रिक्षाचा वापर करतो. बर्याचदा रिक्षा हाच पर्याय पुण्याच्या बस-कंपनीच्या “एक्स्ट्रा”ऑर्डिनरी कारभारामुळे सोयिस्कर वाटतो .. आणि इतरवेळी आपला जो मार्ग असतो तो कोणत्याही बस-मार्गामधे येत नसल्याने रिक्षा हा एकच पर्याय स्वतःचं वाहन नसलेल्या कोणाही माणसांपुढे उरतो. मीं अश्या लोकांमधे येत असल्याने मी रिक्षाने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून लॉ कॉलेज रस्त्याकडे जाण्यासाठी एक रिक्षा मिळवून आत बसलो. मला जिथे जायचं होतं ती कांचन गल्ली रिक्षाचालकाला माहित असल्याने मला फारसं काम उरलं नव्हतं .. मी प्रथम इकडे-तिकडे पाहात होतो ..