निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव्.............दहावा भाग...... सर्व निसर्गप्रेमी मित्रमैत्रीणींनो .हार्दिक अभिनंदन.
लेसन क्र.१- सोनालिस , या सुंदर फुलांचं नाव काय आहे???

काही महिन्यांपूर्वी माझा एक मित्र श्री. श्रीराम वैद्य हिमाचल प्रदेशात भटकंतीसाठी गेला असताना धरमशाला जवळील नड्डी या गावात त्याला हे लोभस फूल सापडले (मधमाशीसह)........ नाव माहित नाही - जाणकार सांगतीलच.......

सर्व नि प्रेमींना अनेक शुभेच्छा.........

phpf8aH40PM.jpgphp0ZuIvCPM.jpg

अरे, १०वा भाग सुरू झाला? सर्वांचेच अभिनंदन!!!!!
मी आपला अ‍ॅडमिनकडे वशिला लावणार होतो. ९व्या भागाच्या एक्स्टेंशन्साठी. Proud

आशुतोष०७११ - यांनी दिलेले प्र चि हे सक्क्युलंट प्रकारातील वनस्पतीचे असून Crassulaceae ही फॅमिली (कूळ) असून Aeonium या जिनसमधील आहे. या प्रकारातील वनस्पतींचे आकार व बहुरंगी फुले फारच चित्तवेधक असतात. आकाराने तशी छोटी व कमी पाणी लागणारी ही वनस्पती अनेक घरांची (दिवाणखाने व बागा) शोभा वाढवताना दिसू लागलीये.
खूप धन्यवाद आशुतोष.

दहाव्या भागाबद्द्ल सर्वांना हार्दिक शूभेच्छा!

ishu 091.jpg

साधना, अभिनंदन!
अनिल, धन्यवाद. सोनाली,मधु, आशुतोषदा, शशांक मस्त आहेत फुल.
शशांक तुम्ही टाकलेल फुल डार्क रेड पॉपीचे आहे.

धन्यवाद उजू.
सर्वांनी टाकलेले फोटो अतिशय सुंदर, सर्वांना धन्यवाद.
Crassula columnaris , family crassulaceae - दक्षिण आफ्रिकेत सापडणारी एक सुंदर सक्क्युलंट वनस्पती, साधारण ४ से मी व्यास असलेल्या या वनस्पतीची पाने कशी एकमेकांवर घट्ट लपेटून घेतल्यासारखी. फार म्हणजे फारच हळू वाढणारी वनस्पती, आणि फुले यायला तर १० वर्षे लागतात. याच्या लाल-केशरी पुष्पगुच्छाला सुवासही असतो गोडसर. (फोटो व माहिती -आंतरजालावरुन साभार)

crassula_columnaris_01.jpgcrassula_columnaris_04.jpgcrassula_columnaris_03.jpg

जिप्सी - अरे, माझा मित्र गेला होता हिमाचल प्रदेशात, त्यालाच माहित असणार नक्की ते फूल, रोपटे कसे दिसत होते ते...
पण हा तू टाकलेला फोटो पहाता तेच असणार ते..... व उजूने नाव दिलंय म्हणजे सर्व ( फूल, रोपटे यांचा) अभ्यास करुनच असणार.... तरी त्या मित्राला विचारतो आजच... बाकी तू काढलेला फोटो अगदी झक्कासच - खास जिप्सी इष्टाईल....

शशांक, अहो मी अजून बालवाडीतच आहे हो. असे काही बोलून मला लाजवू नका.
पॉपीचे बोटॅनिकल कुळ आहे papaveraceae. बोटॅनिकल नाव-papaverआणि ह्या लॅटिन बोटॅनिकल नावाचा अर्थ आहे- Sleep bringing poppy. विकीपिडियावर सांगितले आहे की ऑपियम पॉपी म्हणजेच आपली खसखस.
शशांक, जिप्सी तुमच्या फोटोत आहे ते papaver rhoeus. हे युरोप आणि आशियात कॉमनली आढळणारे आहे.ह्या रानफुलाच्या- पॉपीच्या नावातील ग्रीक शब्द rhoeus मूळ rho ह्या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ आहे रेड-लाल. ह्याची मूळ पण लालसर असतात.ह्याचे दुसरे प्रचलित नाव आहे कॉर्न पॉपी किंवा फिल्ड पॉपी. तसेच ह्याचे अजून एक प्रचलित नाव आहे फ्लॅनडर पॉपी.
वेर्स्ट्न बेल्जियम मधल्या फ्लॅनडर येथील शेतात, रानात सहजपणे फुलणारी हि रानफूल पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धामुळे फुलूच शकली नाहित.युद्ध संपल्यानंतरच ही फुल सर्वत्र दिसली.म्हणून तिथे ह्या फुलांना युद्ध संपल्याच प्रतिक मानतात. John McCrae'sच्या "In Flanders Field" ह्या कवितेची सुरवातपण ह्या फुलांवरच आधारीत आहे- "In Flanders fields the poppies blow,......".
बर्‍याचदा ह्याच्यात आणि ऑपियम पॉपीमधला फरक लक्षात येत नाही.
ऑपियम पॉपी पासून पॉपी सीडस् मिळ्तात जे खातात. opium poppy seeds -source of narcotics,morphine.
भारतात ऑपियम पॉपीचा वापर मेडिसिन्स बनवण्यासाठी करतात , तसेच बियांचा वापर खाद्य म्हणून करतात.

चमकी, हे कदंबाचे फूल आहे.

शशांक, छान माहिती. नुसतेच बघता ही वनस्पती दगडासारखी दिसत आहे.

सगळ्यांची सुंदर फुले.

आपल्या नि ग वर अनेकजण असे असतील की ज्यांना बायनॉमिअल सिस्टिम माहिती नसेल. (कृपया कोणी गैरसमज करुन घेऊ नये.) मी खाली एक उदाहरण देत आहे ज्यात हे सगळ्यांना पटकन कळू शकेल.

Papaver rhoeas हे असे टायपायचे Papaver rhoeas. Papaver ही जिनस (genus) याचे पहिले अक्षर कायम कॅपिटल व दुसरे स्पिसिज (species) याठिकाणी rhoeas हे आहे. जेव्हा ही नावे लिहिताना (टाईपताना) इटॅलिक्स (अक्षर तिरके होते) मधेच लिहायची व जेव्हा हे इटॅलिक्स शक्य नस्ते तेव्हा याला अंडरलाईन करायचे (कागदावर लिहिताना). हे याचे सार्वत्रिक नियम आहेत. जगभर याचा वापर केला जातो.
Papaver rhoeas किंवा असे
Papaver rhoeas.
------------ ---------

कुठल्याही सजीवाकरता ही बायनॉमिअल सिस्टिम वापरतात. आपण मानव म्हणजे - Homo sapiens
आंबा Mangifera indica , मांजर Felis domesticus, विषमज्वर (टायफॉईड) जंतू - Salmonella typhi

जरा गूगलवर पहाणे म्हणजे सर्व खाचाखोचा कळतील - सोपे आहे हे सर्व. या पद्धतीमुळे जगात कुठेही गेले तरी जो सजीव आपल्याला वर्णन करायचा तो तोच असेल. कारण देशपरत्वे (स्थानपरत्वे) नावे बदलतात व गोंधळ होऊ शकतो. शक्यतो ही सर्व नावे लॅटिन भाषेतून घेतली आहेत. बहुतेक नावातून त्या त्या सजीवाचे वैशिष्ट्य दाखवले जाते तर काही वेळेस एखाद्या संशोधकाचे वा स्थळाचे नावही वापरले जाते. वर्गीकरण करताना मग पुढे फॅमिली (कूळ), ऑर्डर असे सर्व येते.
एकदा का या नावांची सवय झाली की सोपेही जाते व नावातला अर्थ लक्षात येऊ लागताच त्याची वैशिष्ट्येही डोळ्यासमोर येतात - तसा खूप मजेचा प्रकार आहे हा....
वर्गीकरणाबाबत अजून कोणी जाणकार अधिक माहिती देऊ शकतील.

एखादा क्लास घेतल्यासारखे मी बोअर तर केले नाही ना - न आवडल्यास जरुर कळवा - मला बिल्कुल राग येणार नाही याची खात्री बाळगा.
आवडल्यास पुढे काही उदाहरणे देऊन सांगेन.

अरे व्वा. वविच्या १०व्या वाढदिवसानंतर निगचा १०वा भाग. सद्ध्या माबोवर १०ची चलती आहे म्हणायची. Happy

शशांक इथ अशा चांगल्या गोष्टींचा क्कोण्ण्णाला राग येत नाही. येउद्यात की अजुन माहिती. काय निगप्रेमींनो?

शशांक इथ अशा चांगल्या गोष्टींचा क्कोण्ण्णाला राग येत नाही. येउद्यात की अजुन माहिती. काय निगप्रेमींनो? >>>>> +१००

लगेच Papaver rhoeas असे (प्रतिमा) गुगलून पाहीले. तर त्याच डार्क रेड पॉपीचे दर्शन. आता शिकायला मजा येईल.

वर शशांक म्हणतात तसे अजून एक गमतीशीर उदाहरण आहे प्राजक्ताच्या बोटॅनिकल नावाचे.

प्राजक्ताला बॉटनीत म्हणतात निक्टॅन्थस अर्बोर ट्रिस्टिस! (आपलं प्राजक्त किंवा पारिजातक छान आहे नै?) Nyctanthes arbor tristis पण या बोटॅनिकल नावाची फोड अशी आहे रात्री उमलणारा आणि- टपटप अश्रू गाळणारा! कारण याची फुलं इतकी नाजूक आहेत; की सूर्योदयानंतर लगेच झाडापासून गळून पडतात जणू काही झाड अश्रूच गाळतंय!! बोटॅनिकल नावांची अशी एक वेगळीच गंमत असते. आणि अशी फोड समजली की ती नावं अवघड न वाटता त्यांची पण मजा घेता येते. (हे माझं वै.म आहे बरं का)

Pages