मराठी भाषा गौरव दिन २०२३

मराठी भाषा गौरव दिन २०२३ समारोप

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 2 March, 2023 - 21:08

मायबोलीकरांच्या सहभागाने आणि प्रोत्साहनामुळे यंदाचा मराठी भाषा गौरव दिन सोहळा दणक्यात साजरा झाला. एकूण ४ उपक्रम, ५ खेळ आणि साहित्यिकांच्या स्मरणार्थ विशेष आमंत्रित लेख यांसह भरगच्च कार्यक्रम २५ जुलै ते १ मार्च ह्या दिवसांत घेतले गेले. मराठी भाषेच्या प्रेमाखातर अनेकांनी उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली.

मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. - anudon

Submitted by anudon on 2 March, 2023 - 15:44

प्रिय सखी,

हे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटेल याची मला खात्री आहे. इतक्या वर्षांनी मला तुझी आठवण झाली,
म्हणून रागावशील ही. पण तो राग घालवायला मी काही ह्या जगात नसेन. आपल्या कॉलेजमधल्या
मैत्रीला जागून मी ही माझी मर्मबंधातली ठेव तुझ्या सुपूर्द करते आहे. ह्या ठेवीबद्दल ह्या जगात कुणालाही
न सांगता निघून जाणं मला जमलं नाही. आपलं आयुष्य जरी काळावरचा बुडबुडा असलातरी, तरी
त्यात दिसलेल्या सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या पाऊलखुणा मागे ठेवण्याचा मोह होतोच, नां?

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन २०२३ -' द स्टोकर' - फ्रान्झ काफ्का - साजिरा - भाग २

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 1 March, 2023 - 10:17

स्टोकरला वाटलं, आपण चीफ इंजिनियर शुबलबद्दल केलेली कुठचीही एक तक्रार त्याला अद्दल घडवण्यासाठी पुरेशी ठरेल. नंतर मात्र त्याच्या लक्षात आलं, आपण घामाने डबडबतो आहोत. कॅप्टनसमोर धड नीट काहीही आपल्याला सांगता आलेलं नाही आणि आपली दयनीय अवस्था झालेली आहे. कॅप्टन गप्प बसलेला पाहून साशंक झालेला चीफ अकौंटंट नक्की काय करावं हे न कळून स्वतःही चडफडत गप्प बसला होता. तिथला तो नोकरही कॅप्टन नक्की काय बोलतो किंवा आदेश देतो; याची उत्सुकता असल्यागत कॅप्टनच्या तोंडाकडे पाहत राहिला.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन २०२३-खेळ पुस्तकांचा- शीर्षक ओळखा

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 28 February, 2023 - 11:34

Screenshot_20230228_110105.jpg
मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
एवढ्या मोठ्या वाचनालयात आमची पुस्तकं हरवली आहेत म्हणजे थोडी ऐकल्यासारखी वाटतात पण नेमकं नावं आठवत नाही. मग आम्ही जी अक्षरं आठवतात ती एका कोष्टकात गोळा केली आहेत. त्यातून तुम्हाला योग्य शीर्षक आठवून, आमचं हरवलेलं पुस्तक शोधायचं आहे. प्रत्येक संच हा दहा पुस्तकांचा आहे.
चला तर मग ,
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेळूया हा पुस्तकांची नावं शोधायचा खेळ. बघू कुणाकुणाला ही नावं आठवतात !!!

मराठी भाषा गौरव दिन 'द स्टोकर'- फ्रान्झ काफ्का - साजिरा - भाग १

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 28 February, 2023 - 10:04

१८८३ साली प्रागमध्ये जन्मलेला फ्रान्झ काफ्का जेमतेम ४० वर्षं जगला. हा थोर लेखक आणि तत्त्ववेत्ता 'अस्तित्ववाद' या संकल्पनेच्या जनकांपैकी एक. जॉं पॉल सार्त्र, आल्बर्ट कामू, गॅब्रिएल गार्शिया ही काफ्काचा प्रभाव पडलेली काही मंडळी. या नावांवरूनच काफ्काचं मोठेपण लक्षात येतं. 'मेटॅमोर्फॉसिस' या एकाच जबरदस्त कथेने काफ्काला लोकप्रिय केलं. अनेक भाषांत अनुवादित झालेल्या या दीर्घकथेची आजही जगभर चर्चा होते. जगण्याचं प्रयोजन शोधण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी काफ्काने बरंच लिखाण केलं खरं; मात्र आपल्या मृत्यूनंतर ते जाळून टाकावं, असंही त्याने आपल्या ब्रॉड या मित्राला सांगून ठेवलं.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन २०२३ - शीघ्रकवितांच्या आनंदडोही २ आणि ३- प्रतिबिंब , रात्र आणि उषःकाल

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 28 February, 2023 - 06:06

बर्‍याच कवी व कलावंतांच्या बाबत असं होतं की त्यांच्या सुरुवातीच्या रचनांमध्ये त्यांच्या पूर्वसूरींची छाया दिसते. अनेकदा चित्रपटगीते ऐकताना त्यांच्या चाली या दुसर्‍या कुठल्या गीताची आठवण करून देतात. म्हणजे ते कलावंत या आधीच्या कलाकृतींची नक्कल करत असतात , असेच काही नाही. ते या कलाकृतींपासून प्रेरणा घेतात. अन्य कुणाला सुचलेल्या कल्पनेचे प्रतिबिंब त्यांच्या रचनेत उतरते.
शान्ता शेळके यांचे 'तोच चंद्रमा नभात ' हे गीत किंवा गदिमांच्या "दोन ओंडाक्यांची होते..." या ओळीं - यांचे मूळ संस्कृत श्लोकांत आहे.
ही एका परीने त्या मूळ रचनेला दिलेली दादसुद्धा!

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन - लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - anudon - उंबरठा

Submitted by anudon on 28 February, 2023 - 01:22

उंबरठा म्हटलं की ती आठवते, तिच्यासाठी नसलेलं तिचं घर आठवतं! जवळपास ३८ वर्षांआधी पडद्यावर साकारलेली तिची जेमतेम दोन तासांची गोष्ट आठवते!

सुरुवातीच्या एका मिनिटभरात भरलेल्या घरात ती आतून रिकामी आहे हे तिच्या १/२ अस्फुट वाक्यांवरुन खोलवर जाणवतं. तिचा वावर घरभर आहे पण तिची स्वत:ची अशी जागा ती शोधते आहे. कधी बाहेरच्या बागेतल्या पाळण्यावर, तर पोर्चच्या बाजूच्या बाकावर.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन २०२३ - जी ए कुलकर्णी - पिंगळावेळ - शंतनु बेडेकर

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 27 February, 2023 - 11:59

बहुतेक गंगाधर गाडगीळ जी.एं.ना दु:खाची काळी वर्तुळे गिरवणारा लेखक म्हणाले होते. जी.एं.नी खरोखर तीच ती दु:खाची वर्तुळे गिरवली. पण त्यांचे प्रत्येक वर्तुळ आपले स्वतंत्र अस्तित्व घेऊन लखलखत बाहेर आले. त्यांचे निळासावळा, हिरवे रावे, पारवा, रक्तचंदन, काजळमाया असे एकाहून एक सरस कथासंग्रह १९६० ते ७५ या १५ वर्षांत प्रकाशित झाले. यातल्या बर्‍याश्या कथा त्यावेळच्या नियतकालिकांतून, दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या होत्या. नियतकालिकांतील त्यांच्या सर्व कथा संग्रहातून प्रकशित झाल्या आहेत की काही रत्ने निसटून गेली ते माहीत नाही. उजवेडावे असा भेद करता येणार नाही इतके सरस त्यांचे सर्व कथासंग्रह आहेत.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शब्दशोध

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 27 February, 2023 - 08:03

मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शब्दशोध

आमचे काही शब्द हरवले आहेत. त्यांचा माग काढायचा आहे. पण त्यांच्या पाउलखुणा इतस्ततः विखुरल्या आहेत ; गूढ संकेतांसारख्या !
मायबोलीकर हरवलेल्या वस्तू , विशेषतः शब्द शोधण्यात किती पारंगत आहेत हे तर अखिल विश्वाला माहीत आहे.

चला तर मग! येताय ना शब्द शोधायला?

संच पहिला

कंसात शब्दातील अक्षरांची संख्या दिली आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मराठी भाषा गौरव दिन २०२३